दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 29 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 19 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : अष्टमी 11:55
नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 23:16, योग : सौभाग्य 26:45, करण : तैतील 22:55
सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : उत्तरायण, संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामगिरी सुधारेल. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. पैशाचा ओघ पूर्वीपेक्षा चांगला असेल, परंतु खर्चही त्याच प्रमाणात असेल. मार्केटिंग, मीडिया किंवा सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित लोकांसाठी अत्यंत अनुकूल दिवस आहे.
वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे. सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्रात असाल तर उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. पैशाचा ओघ चांगला राहील, परंतु पूर्वीच्या काही कर्जांमुळे बचत करणे शक्य होणार नाही.
मिथुन – खूप व्यग्र दिवस असेल. कार्यालयात कामाचा ताण वाढेल, त्यामुळे त्वरित निर्णय घेता येणार नाहीत. अनेक समस्या एकट्यानेच सोडवाव्या लागू शकतात. कायदेशीर किंवा वादग्रस्त बाबींशी संबंधित आर्थिक भार वाढू शकते.
कर्क – नशीबाची साथ लाभणार आहे. पदोन्नतीसाठी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु भावनिक निर्णय घेऊन गुंतवणूक करू नका. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी आहे.
सिंह – आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस शुभ असेल. मोठ्या प्रकल्पांच्या नियोजनात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होईल, मात्र अतिआत्मविश्वास किंवा अभिमान टाळा.
कन्या – व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाचे ओझे आणि जबाबदारीमुळे नको इतका ताण घ्याल. भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायात मतभेद उद्भवू शकतात. कार्यालयातील बॉसची वागणूक कठोर असू शकते, परंतु मेहनतीकडे दुर्लक्ष होणार नाही.
तुळ – पैसा आणि काम याबाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णयात घाई करू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखादा जुना सौदा अचानक रद्द होऊ शकतो.
वृश्चिक – मेहनतीचे फळ मिळेल. कार्यालयात एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकेल. इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक किंवा रासायनिक उत्पादनांच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना दिवस फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. फक्त बोलण्यात आणि वर्तनात संयम ठेवा.
धनु – आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. बँकिंग, शिक्षण, सरकारी सेवा किंवा संशोधन या क्षेत्रांतील व्यक्तींना फायदा होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वरिष्ठ मार्गदर्शकाचा सल्ला फायदेशीर ठरेल.
मकर – व्यवसायात अधिक व्यग्र राहाल, परंतु त्याच वेळी नफा होईल. भागीदारीतील जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला थोडी आर्थिक टंचाई भासेल परंतु दुपारनंतर अडकलेले पैसे मिळू शकतात.
कुंभ – पैसा आणि कारकीर्दीच्या बाबतीत अतिशय उत्तम दिवस असेल. स्थावर मालमत्ता, शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित कामात लाभ होईल. नोकरीत बदली किंवा नवीन प्रस्ताव येण्याची चिन्हे आहेत. आत्मविश्वासाच्या जोरावर नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
मीन – सर्जनशील लेखन, माध्यम किंवा रचना क्षेत्रातील जातकांच्या कारकिर्दीतील प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कार्यालयात अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
दिनविशेष
सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शहा
सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शहा यांचा जन्म गुजरातच्या जेतपूर शहरात 7 नोव्हेंबर 1922 साली झाला. विद्यापीठात शिकत असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत छोडो आंदोलनात सहहभाग घेतला होता. त्यांनी प्रामुख्याने मुले, महिला आणि वृद्धांसाठी काम केले आहे. इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्या मोठ्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक प्रमुख पदे भूषवली आहेत. तथापि, 1975मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (NDMC) पहिल्या अशासकीय अध्यक्षपदी नियुक्त केले होते. विद्याबेन यांनी 1979मध्ये ताश्कंद येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बाल वर्षाच्या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1992 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यांनी 12 वर्षे भारतीय बालकल्याण परिषदेचे (ICCW) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. विद्याबेन यांचे 19 जून 2020 साली दिल्ली येथे निधन झाले.