दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 18 जून 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 28 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्थी 18:59 ; नक्षत्र : पुष्य 11:32;
- योग : व्याघात 17:35 ; करण : वणिज 08:14; बव 29:53;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:17
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
गुरुपुष्यामृत योग
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग
टीम अवांतर
भारताचे महान ॲथलीट मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपुरा नावाच्या छोट्याशा गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानात आहे. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात पाकिस्तानमधील एका छोट्याशा खेड्यात झाली. तिथे त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतले, पण नंतर परिस्थिती बिघडत गेली आणि मिल्खा यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
1947 च्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत मिल्खा सिंग यांनी आपली आठ भावंडे आणि आई-वडील असे संपूर्ण कुटुंब गमावले. ते अनाथ झाले. हा धक्का पचवत ते दिल्लीला आपल्या बहिणीकडे आले. त्याआधी ते बराच काळ निर्वासितांच्या छावणीत राहिले. पुढे एका भावाच्या प्रोत्साहनाने त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला.
1951 मध्ये, चौथ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. सिकंदराबाद येथील इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेंटरमध्ये तैनात असताना त्यांची ॲथलेटिक्सशी ओळख झाली. नवीन भरती झालेल्यांसाठी अनिवार्य असलेल्या क्रॉस-कंट्री धावण्याच्या शर्यतीत सहावे स्थान मिळवल्यानंतर सैन्याने त्यांना ॲथलेटिक्समधील विशेष प्रशिक्षणासाठी निवडले.
हेही वाचा – स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!
मिल्खा यांनी 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिक खेळांमधील 200 मीटर आणि 400 मीटर स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 1958 मध्ये कटक येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये 200 मीटर आणि 400 मीटरमध्ये नवे विक्रम त्यांनी प्रस्थापित केले. आशियाई खेळांमध्ये त्याच खेळ प्रकारांमध्ये सुवर्णपदकेही जिंकली. त्यानंतर 1958 च्या ब्रिटिश एम्पायर आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे ते भारताकडून कॉमनवेल्थ गेम्समधील पहिले सुवर्णपदक विजेते ठरले. 2014 मध्ये विकास गौडाने सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी, मिल्खा हे त्या खेळांमध्ये वैयक्तिक ॲथलेटिक्स सुवर्णपदक जिंकणारे एकमेव भारतीय पुरुष होते.
1960 च्या एएए चॅम्पियनशिपमध्ये ब्रिटिश एएए चॅम्पियनशिपचे विजेतेपद त्यांनीच जिंकले. 1960 मध्ये पाकिस्तानात अब्दुल खलीकविरुद्ध यशस्वीपणे शर्यत पूर्ण केली. त्यावेळी तत्कालीन जनरल अयुब खान यांच्या शर्यतीनंतरच्या एका टिप्पणीमुळे त्यांना ‘द फ्लाइंग सिख’ हे टोपणनाव मिळाले.
1959 साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान करून भारत सरकारने गौरवले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनंतर त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला. मात्र स्वाभिमानी मिल्खा सिंग यांनी तो स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पंजाब विद्यापीठाने त्यांच्या एका दीक्षांत समारंभात, विद्यापीठाचे कुलगुरू आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मिल्खा सिंग यांना ‘खेलरत्न’ हा खिताब बहाल केला होता. मुंबईतल्या ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या शामियानावर संपन्न झालेल्या शानदार समारंभात, ‘इंडिया स्पोर्ट्स अॅवॉर्ड-2019चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिल्खा सिंग यांना प्रदान करण्यात आला.
मिल्खा सिंग यांनी आपल्या मुलीच्या मदतीने लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘द रेस ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या आधारे तयार झालेला ‘भाग, मिल्खा भाग…’ हा हिंदी चित्रपट भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांत लोकप्रिय ठरला. अशा या ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे 18 जून 2021 रोजी कोरोनामुळे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – संपूर्ण दिवस धावपळीचा आणि व्यस्ततेचा असू शकतो. अनेक कामे हातावेगळी करण्यासाठी तुमच्यासमोर येतील. मात्र प्रत्येक काम तातडीचे करायचेच आहे असे गृहीत धरून स्वतःला कामाला जुंपून घेण्याची गरज नाही. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. एखादी दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. पूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल.
वृषभ – आळस बाजूला सारून पूर्ण उत्साहाने पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे. जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि एका नवीन, महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात केली जाईल. सहकाऱ्यांचा उत्तम पाठिंबा मिळेल. बोलताना योग्य शब्दांची निवड करा, कारण अगदी लहानसहान गोष्टींवरूनही कार्यालयात वाद निर्माण होऊ शकतो. परंतु संयम आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळाल.
मिथुन – एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. जोडीदारासोबतचे गैरसमज संभाषणातून दूर कराल, ज्यामुळे नात्यात पुन्हा गोडवा येईल. वाहनाशी संबंधित एका किरकोळ समस्येमुळे खर्च अचानक वाढू शकतो, पण घाबरण्याची गरज नाही. अनावश्यक चर्चांमध्ये गुंतण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करणे उत्तम राहील.
कर्क – इतरांना मदत करण्याकडे आज कल असेल. बऱ्याच काळापासून समस्या निर्माण करणारे जुने व्यवहार आता मार्गी लागतील. कामात संयम आणि संतुलन राखणे आवश्यक असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रवासादरम्यान तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी अत्यंत फायदेशीर ठरेल.
सिंह – कामाच्या ठिकाणी किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. वडिलांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. सभोवतालच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नका, कारण कोणीतरी तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या आर्थिक प्रकरणामुळे चिंता निर्माण होऊ शकते, परंतु संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळण्यास मदत होईल.
कन्या – एखादी चांगली बातमी तुमचा दिवस खास बनवू शकते. व्यवसायात केलेल्या बदलांचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. नोकरदारांचे वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील आणि तुमच्यातील तणाव संपुष्टात येईल. कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळा. एखादा कठोर निर्णय घेताना जवळची व्यक्ती नाराज होऊ शकते.
तुळ – आज प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकावे लागेल. भूतकाळातील चुकांमधून शिकल्यास यशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विनाकारण सल्ला देणे टाळा आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. प्रवासात महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने कोणत्याही आर्थिक समस्या सोडवता येऊ शकतात, ज्यामुळे दिलासा मिळेल.
वृश्चिक – यश आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल होताना दिसेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या भावनांचा आदर केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. घरात मालमत्तेशी संबंधित चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यावेळी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. कोणत्यातरी चिंतांमुळे तुम्हीला अस्वस्थता येईल. संततीच्या शिक्षण आणि भविष्याबाबत एखादा मोठा निर्णय घ्याल जो त्यांच्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!
धनु – आजचा दिवस सुज्ञपणे निर्णय घेण्याचा आहे. संततीसोबत वेळ घालवल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कामाबद्दल वाटणारी कोणतीही चिंता हळूहळू दूर होईल. घरी पाहुण्यांच्या आगमनाने उत्साहात भर पडू शकते. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते . सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मकर – आजचा दिवस सुखद आणि फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंद मिळेल. शेअर बाजारातून किंवा गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होऊन तुम्हाला नवीन ओळख मिळू शकते. गुंतवणूक करताना, इतरांच्या मतांवर आधारित निर्णय घेणे टाळा. भागीदारीतून अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील.
कुंभ – आज तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल आणि तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. आईला दिलेले वचन पूर्ण करण्याचा आज प्रयत्न कराल.संतती त्यांच्या करिअर किंवा नोकरीबाबत तुमच्याकडे सल्ला मागू शकतात. व्यवसायात थोडेफार चढ-उतार येतील, पण स्वतःची विवेकबुद्धी तुम्हाला प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास मदत करेल.
मीन – आजचा दिवस आनंद, शांती आणि प्रसन्न क्षणांनी भरलेला असेल. कुटुंबासोबतचे जुने मतभेद मिटवण्यात यशस्वी व्हाल. कोणाबद्दलही मत्सर किंवा नकारात्मकता बाळगू नका. सकारात्मक विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. प्रवास करण्याची किंवा छंद जोपासण्याची संधी मिळू शकते. सरकारी योजनांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. संततीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल.


