Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 18, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 18 एप्रिल 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 28 चैत्र शके 1948; तिथि : प्रतिपदा 14:11; नक्षत्र : अश्विनी 09:42;
    • योग : प्रीति 23:56; करण : बालव 24:31;
    • सूर्य : मेष; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 18:56;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    श्रेष्ठ समाजसुधारक महर्षी कर्वे

    टीम अवांतर

    आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे झाले. 1891मध्ये मुंबईतून ते बीए झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील पदाचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.

    पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले, पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी 1899 साली ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे 1900 सालापासून हा आश्रम सुरू झाला.

    हेही वाचा – तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने 1916मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे.

    महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. याशिवाय, संस्थांखेरीज ‘मुरुड फंड’, स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’, ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’, जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला ‘समता-संघ’ इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त 1915मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे. भारत सरकारने पद्मविभूषण (1955), भारतरत्न (1958) देऊन या शतायुषी महर्षीचा गौरव केला. 9 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होऊ शकते. एखादा नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा  अनुकूल असेल. मात्र घाई टाळणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबात तुमचा प्रभाव वाढेल.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागू शकते. भविष्यात त्याचे परिणाम सकारात्मक असतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आज अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल आणि सलोख्याचे संबंध टिकून राहतील. तब्येतीच्या दृष्टीने आहाराकडे लक्ष द्या.

    मिथुन – बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये कामाच्या ठिकाणी प्रगती करण्यास मदत करतील. कल्पना तुम्ही प्रभावीपणे मांडू शकाल. त्यामुळे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना प्रभावित करू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, कुटुंबासोबत वेळ घालवल्याने घरात आनंद आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगाभ्यास फायदेशीर ठरेल.

    कर्क – आजचा दिवस भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात, मात्र संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही ती हाताळू शकाल. सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक खर्च वाढू शकतो. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार आवश्यक आहे.

    सिंह – आजचा दिवस आत्मविश्वास आणि यशाने भरलेला असेल. नेतृत्व कौशल्ये आणि निर्णयक्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पुढे नेतील. वरिष्ठांकडून प्रशंसा आणि आदर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील, घरातील वातावरण आनंदी राहील.

    कन्या – कामाच्या ठिकाणी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. मेहनत आणि समर्पण सकारात्मक परिणाम देईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील. नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

    तुळ – आजचा दिवस संतुलन आणि सुसंवादाचा असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठींबा मिळेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल आणि नातेसंबंध गोड राहतील. आरोग्य सामान्य राहील; परंतु मानसिक शांती टिकवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा.

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक असेल. आज कुटुंबाकडून पाठींबा मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. कौटुंबिक जीवन अधिक घट्ट होईल आणि तुमच्यातील भावनिक नाते जास्त दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत, तणाव टाळा आणि ध्यान तसेच योगाची मदत घ्या.

    धनु – करिअर आणि शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांमध्ये प्रगती होईल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नोकरदारांनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कामानिमित्त प्रवास घडून येईल अशी शक्यता असून तो फायदेशीर ठरेल. आरोग्य सामान्य राहील.

    हेही वाचा – हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    मकर – आज कठोर परिश्रम आणि शिस्तीतून यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पण आणि जबाबदारीचे कौतुक होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करणे उत्तम ठरेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबरच पुरेशी विश्रांती आवश्यक आहे, हेही लक्षात ठेवा.

    कुंभ – आजचा दिवस नवीन संधी आणि सर्जनशीलता घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. आज काही नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. कौटुंबिक आयुष्य अधिक गोड होईल. मानसिकदृष्ट्या, तुम्हाला संतुलित आणि शांत वाटेल.

    मीन – आजचा दिवस आध्यात्मिक ऊर्जा आणि भावनिक संतुलनाचा असेल. कामाच्या ठिकाणी प्रगती हळूहळू होईल आणि तुमच्या मेहनतीला फळ येऊ लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात नात्यांमधील भावनिक बंध अधिक दृढ होतील. योग, ध्यान आणि नियमित दिनचर्या या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 17, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 एप्रिल 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 27…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 388
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 560
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.