Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 14, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 22 आश्विन शके 1948; तिथि : चतुर्थी 25:12; नक्षत्र : अनुराधा 28:02;
    • योग : आयुष्मान 20:38; करण : वणिज 12:16;
    • सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:18;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    विनायक चतुर्थी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    साहित्यिक सुभाष भेंडे

    टीम अवांतर

    संवेदनशील विचारवंत, मार्मिक विनोदकार आणि सामाजिक भान जपणारे साहित्यिक सुभाष भेंडे यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1936 रोजी गोव्यातील बोरी या गावी झाला. तर त्यांचे मूळ गाव होते केपे. गोव्यातील वातावरण, संस्कृती आणि स्थानिक जीवनशैली यांचा ठसठशीत प्रभाव त्यांच्यावर लहानपणापासूनच पडला.

    शिक्षणासाठी ते गोवा सोडून महाराष्ट्रात आले. सांगली, पुणे या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. पुढे अर्थशास्त्रात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि  मुंबईतील कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.  केवळ शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक आणि विचारप्रवृत्त करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख बनली.

    हेही वाचा – लॉकडाऊन

    पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त झाल्यानंतर गोमंतकीय साहित्याला एक नवा सूर, नवा रंग मिळू लागला. अनेक लेखक, कवी, विचारवंत पुढे आले. त्यात सुभाष भेंडे हे नाव विशेषत्वाने पुढे आले. लहानपणी झालेल्या संस्कारांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटलेले दिसते. गोव्याची माती, माणसं, परंपरा आणि बदलत्या काळाचे पडसाद त्यांच्या साहित्यकृतींमध्ये वारंवार बघायला मिळाले. गोव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेल्या ‘आमचे गोयं आमका जाय’ आणि ‘जोगीण’ या कादंबऱ्या त्यांचे गोव्याशी असलेले भावनिक नाते ठळकपणे दर्शवतात.

    साहित्यिक म्हणून सुभाष भेंडे यांनी कादंबरी, विनोदी लेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, नाटक, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये आपली स्वतंत्र छाप उमटवली. त्यांच्या लेखनाचा खरा गाभा म्हणजे त्यांची सहजता, माणुसकीची जाण आणि मध्यमवर्गीय मानसिकतेचे केलेले अचूक चित्रण.

    त्यांच्या लेखनात विनोद आहे, पण तो केवळ हसवण्यासाठी नाही तर त्या विनोदामागे जीवनातील विसंगती, समाजातील विरोधाभास आणि मानवी स्वभावातील अगम्य गुंतागुंत लपलेली जाणवते. त्यांनी लिहिलेला ‘गड्या आपुला गाव बरा’ हा लेख म्हणजे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेवारीनंतर लिहिलेला हा लेख केवळ त्यांचे परदेशातील अनुभवकथन नाही, तर आपल्या मातीची ओढ, आपल्या संस्कृतीतील जिवंतपणा याची दिलेली प्रामाणिक कबुली आहे. म्हणूनच कदाचित, या लेखाचा समावेश महाराष्ट्रातील बारावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात झाला.

    त्यांच्या ‘एक डोळे, सात गाळे’, ‘खुसखुशीत’, ‘गंभीर आणि गमतीदार’ यांसारख्या विनोदी लेखसंग्रहांमधून त्यांच्या लेखनातील मार्मिकता आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती लक्षात येते. ते विनोदी पद्धतीने लिहीत असत, मात्र तो विनोद हलकाफुलका, वरवरचा नव्हता. त्यामागे त्यांचा एक विचार असायचा, एक टोचणारी जाणीव असायची.

    बदलत्या काळात माणसाच्या जीवनमूल्यांमध्ये होणारी घसरण त्यांनी त्यांच्या नंतरच्या कादंबऱ्यांमध्ये नेमकेपणाने टिपली. ‘अंधारवाटा’, ‘उद्ध्वस्त’, ‘अगतिक आणि अदेशी’ अशा कादंबऱ्या वाचताना वाचकांना अनेकदा हे आपल्याच आयुष्याचं चित्र असल्याचा भास होतो.
    ‘ऐंशी दिवसात जगाची सफर’ सारख्या प्रवासवर्णनात त्यांनी केवळ प्रवासाचे भौगोलिक चित्रण केलं नाही, तर विविध संस्कृतींमधील साम्य, विरोधाभास, आणि भारतीय दृष्टिकोनातून केलेले निरीक्षण यातून एका जागतिक माणसाचं दर्शन घडवलं. मुलांसाठी जशा त्यांनी ‘दर्यावर्दी सिंदबाद’सारख्या रंजक गोष्टी लिहिल्या तसेच दुसरीकडे ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण’ सारखं अभ्यासपूर्ण लेखनही केलं.

    2003 मध्ये कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्याचबरोबर वळवयी येथे झालेल्या 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. 20 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस खूप आनंदाचा असेल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. व्यवसायात काही चढ-उतार होऊ शकतात, पण काळजी करण्याची गरज नाही. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आज घेतलेले कोणतेही निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. जर कोणाला तुम्ही पैसे उधार दिले असतील, तर त्यातील काही पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. गोड बोलणाऱ्या प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. महत्त्वाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

    वृषभ – आजचा दिवस समाधान, यश आणि आनंदाची एखादी बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाचा व्यावसायिक करार फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळायला लागेल. मोठे निर्णय घेताना, विशेषतः घर किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना, कुटुंबाशी चर्चा करणे उपयुक्त ठरेल. तुमच्या कामाची आणि प्रयत्नांची कार्यालयात चर्चा होऊ शकते, सहकारी तुमचे कौतुक करतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे काम पूर्ण झाल्याने मोठा दिलासा आणि समाधान मिळेल.

    मिथुन – आज, तुमची प्रतिभा आणि सर्जनशील विचार सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरतील. तुमच्या नवीन कल्पनांवर कामाच्या ठिकाणी चर्चा होऊ शकते. कला, लेखन, संगीत किंवा इतर सर्जनशील क्षेत्रांतील व्यक्तींना विशेष ओळख मिळू शकते. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुम्हाला अपमानित वाटू शकते, म्हणून तात्काळ प्रतिक्रिया देण्यापूर्वी आधी परिस्थितीचा विचार करा. प्रवासादरम्यान मिळालेली महत्त्वाची माहिती तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही शुभ संकेत मिळू शकतात.

    कर्क – आज तुमच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण होऊ शकतात, त्यामुळे घाईघाईने आर्थिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, परंतु समज आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकाल. सरकारी कामात किंवा कोणत्याही प्रलंबित प्रकल्पात प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, मनात आलेली एखादी नवीन कल्पना भविष्यातील यशाचा पाया बनू शकते.

    सिंह – आज, तुमच्यातील ऊर्जा, आत्मविश्वास आणि उत्साह तुम्हाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. नोकरदार जातकांना कौतुकाची थाप आणि सन्मान मिळू शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत परिस्थिती अनुकूल दिसत आहे, परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्या. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमध्ये स्नेह आणि जवळीक निर्माण करेल. आज केवळ स्वतःच्या भावनांवरच नव्हे, तर जवळच्या लोकांचे विचार समजून घेण्यावरही लक्ष केंद्रित कराल.

    कन्या – तुमची समज आणि सतर्कता यामुळे आज अनेक समस्यांपासून बचाव करता येईल. भागीदारीच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा आणि महत्त्वाच्या गोष्टींबाबत स्पष्टता ठेवा. एखादे जुने अपूर्ण काम पूर्ण केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. आरोग्याच्या किरकोळ समस्यासुद्धा अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे दैनंदिन कामांबाबत जागरूक रहा. महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज सुरक्षित ठेवा. एखादा जुना व्यवहार किंवा वाद आज मिटू शकतो, ज्यामुळे दीर्घकाळापासूनचा मानसिक ताण कमी होईल.

    तुळ – आज योग्य निर्णय तुमची सर्वात मोठी ताकद ठरतील. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि त्या तुम्हाला योग्य वेळी ओळखता येतील. मात्र एखादी आर्थिक बाब काहीशी चिंतेचे कारण ठरू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. भूतकाळातील एखादी चूक समोर येऊ शकते, परंतु त्यावर विचार करत बसण्याऐवजी त्यातून शिकणे अधिक चांगले आहे. परदेशात शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. संततीने मिळविलेले यश कुटुंबात अभिमान आणि आनंद आणणारे ठरेल.

    वृश्चिक – आज तुमच्याबद्दलच्या आदर आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. घरी एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची तयारी सुरू असू शकते, ज्यामुळे सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण होईल. कामाचा ताण जास्त असू शकतो, त्यामुळे थकवा जाणवू शकतो. मात्र तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर मांडणे टाळा. जर तुमच्या हातून चूक झाली, तर ती मान्य करण्यास संकोच करू नका. आज, तुमचा नम्रपणा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती असेल.

    हेही वाचा – ती आणि तो…

    धनु – आज तुम्ही उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. तुमच्या कौटुंबिक जीवनात एका नवीन सुरुवातीची किंवा सुखद बदलाची शक्यता आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, योग, व्यायाम किंवा नियमित दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या विवेकबुद्धीने एखादे कौटुंबिक प्रकरण सुटू शकते. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते. नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देईल, ज्यामुळे अनेक कामे अपेक्षेपेक्षा सोप्या पद्धतीने पूर्ण होतील.

    मकर – आज तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेण्याचा दिवस आहे. जर एखादी दीर्घकालीन आरोग्य समस्या त्रास देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी योग्य ते उपचार करा. कुटुंबात सलोखा राखणे हे तुमचे आज प्राधान्य असेल. कामाच्या ठिकाणी संयम आणि धैर्याने पुढे जा, कारण घाईने घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. आज प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करा. कधीकधी, परिस्थितीला थोडा वेळ देणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

    कुंभ – आज समाजात तुमची ओळख आणि आदर दोन्ही वाढू शकतात. सहकारी तुमच्या विचारांचे आणि कृतींचे कौतुक करतील. आर्थिक परिस्थितीही पूर्वीपेक्षा सुधारू शकते. नात्यांमधील दुरावा कमी होऊन जवळीकता साधता येईल, अशी चिन्हे आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमुळे मानसिक शांती मिळेल. दुसरीकडे काही अत्यावश्यक खर्च अचानक वाढू शकतात, त्यामुळे आपल्या बजेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

    मीन – आज आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला उत्साही वाटेल. जोडीदारासोबतचे तुमचे भावनिक नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे, तुम्हा दोघांनाही तुमच्या नात्यात एक नवेपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याच्या किंवा कनिष्ठ व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. वरवर पाहता कठीण वाटणारी कामेसुद्धा आज सोपी वाटतील. एकूणच, आजचा दिवस सहकार्य, समाधान आणि आनंदाने भरलेला असेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑक्टोबर 2026

    October 13, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरOctober 14, 2026

    करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत, कौशल्य आणि योग्य संधी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकेच काम करण्याचे वातावरणही…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑक्टोबर 2026

    October 13, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑक्टोबर 2026

    October 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    October 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    October 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 469
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 629
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 31
    • ललित 993
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.