Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 11, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 11 जून 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 21 ज्येष्ठ शके 1948; तिथि : एकादशी 22:36; नक्षत्र : रेवती 08:16;
    • योग : शोभन 24:59; करण : बव 11:52;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : मीन 08:16; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:15;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    कमला एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ग्रंथकार आणि इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे

    टीम अवांतर

    ग्रंथकार आणि इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म 5 ऑगस्ट 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे झाला. सातारच्या अनंतशास्त्री गजेंद्रगडकरांकडे त्यांनी संस्कृत विद्याभ्यास केला. नंतर पुण्यास येऊन काव्येतिहाससंग्रह  या जुन्या ग्रंथांच्या जीर्णोद्धारास वाहिलेल्या मासिकाच्या संपादनकार्यात मदत करू लागले. त्यामुळे त्यांना इतिहास संशोधनाची आवड निर्माण झाली. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापिलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते मिरजेच्या शाळेत शिक्षक झाले. त्यानंतरचे त्यांचे सारे आयुष्य मिरजेलाच गेले.

    इतिहाससंशोधन हे त्यांचे जीवितकार्य असले, तरी काव्य-नाटकादी साहित्यरचनाही त्यांनी केली. पंडिती काव्यरचनेचा आणि शीघ्रकवित्वाची आवड त्यांना विद्यार्थिदशेपासूनच होती. त्यांनी स्वत:ही काव्यरचना केली आहे. स‌मुद्र, यशवंतराय महाकाव्य आणि फुटकळ चुटके हे त्यांचे काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पितापुत्रांच्या संबंधांवर लिहिलेले गुणोत्कर्ष हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर इतिहाससंशोधन करीत असता, आवश्यक ते आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी त्यांनी बरेचसे नाट्यलेखन केले. तारामंडळ, चित्रवंचना, शिवसंभव, उग्रमंगल आणि देशकंटक ही त्यांची काही नाटकेही प्रसिद्ध झाली.

    नाना फडणवीसांचे चरित्र हे इतिहासक्षेत्रातील त्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर संशोधन-संपादन प्रकाशनाचे प्रचंड कार्य त्यांनी केले. 1897मध्ये ऐतिहासिक-लेख-संग्रह हे मासिक काढून ते तीन वर्षे चालविले. पटवर्धन जहागिरदारांच्या जुन्या चिटणीशी दप्तरांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांतून ऐतिहासिक लेख संग्रहाचे चौदा खंड तयार केले. पहिले अकरा खंड त्यांनी स्वत: आणि शेवटचे तीन खंड त्यांच्या निधनोत्तर त्यांचे चिरंजीव य. वा. खरे यांनी संपादिलेले आहेत.

    हेही वाचा – दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    अधिकारयोग अथवा नानास राज्याधिकार मिळाल्याचा इतिहास, इचलकरंजी संस्थानचा इतिहास, मालोजी आणि शहाजी, मराठी राज्याचा उत्तरार्ध (खंड पहिला) ही त्यांची इतर ग्रंथरचना. याशिवाय हरिवंशाची बखर अथवा पटवर्धन स‌रदारांच्या हकिकती या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले. 11 जून 1924 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – प्रचंड ऊर्जा आणि उत्साह याचा प्रत्यय येईल. काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल.  त्याचा परिणाम तुमच्या कामात आणि व्यवसायात स्पष्टपणे दिसून येईल. अपूर्ण कामे लवकर पूर्ण होतील. व्यवसायालाही गती मिळेल. नवीन भागीदारीचा विचार करत असाल, तर निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. संततीच्या आनंदासाठी नवीन वस्तूची खरेदी करण्याचा विचार होईल.

    वृषभ – एखाद्या कामाबद्दलची भीती किंवा अनिश्चितता अस्वस्थ करेल, पण संयम ही तुमची सर्वात मोठी शक्ती असेल. व्यवहारात कोणाच्याही शब्दांना भुलू नका. इतरांच्या प्रभावाखाली येऊन घाईने निर्णय घेऊ नका. मालमत्तेच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. पाण्याशी संबंधित ठिकाणी सावधगिरी बाळगा.

    मिथुन – आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत बनेल. उत्पन्न वाढवण्याच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे आत्मविश्वासही वाढेल. सासरच्या मंडळींसोबतच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. कौटुंबिक बाबी घरापुरत्याच मर्यादित ठेवा.  लहानसहान गोष्टी गंभीर रूप घेणार नाहीत याची काळजी घ्या. भूतकाळातील चुकांमधून शिकणे खूप उपयुक्त ठरेल.

    कर्क – दिवस प्रगती आणि सहकार्याने भरलेला असेल. वरिष्ठांच्या पाठिंब्याने कामे लवकर पूर्ण होतील. संततीला दिलेली वचने पाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवहारात नवीन करार होतील, तेव्हा कागदरत्रं नीट वाचून स्वाक्षरी करावी. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, परंतु सहाकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळील. याची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल.

    सिंह – नशीबाची साथ मिळेल, रखडलेली कामे पुढे सरकताना दिसतील. कोणत्याही कामात आधी अडथळे आले असले तरी आता मार्ग मोकळा होईल. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळा. सभोवतालच्या लोकांबद्दल सावध रहा. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी दिवस अनुकूल असेल. व्यवसायात नवीन संकल्पना राबवून पाहू शकता, यश मिळण्याची अधिक शक्यता आहे.

    कन्या – संतुलन आणि सावधगिरी या दोन्हींची सांगड घालावी लागेल. संततीच्या संगतीवर लक्ष ठेवा. गाडी चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कर्जाचा भार बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे हलके वाटेल. स्वतःच्या छंद आणि आवडीच्या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होईल.  आरोग्याची काळजी घ्या. जंक फूड खाण्याचे टाळा.

    तुळ – दिवस शांतता आणि आपलेपणाची भावना घेऊन येईल. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणावरही डोळे झाकून निर्णय घेऊ नका. जोडीदाराचा पाठिंबा मानसिक बळ देईल ज्यामुळे नाते अधिक दृढ होईल. संततीकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा, त्यातून प्रत्येकाच्या अडचणी समजू शकतील.

    वृश्चिक – विरोधकांवर तुमची मजबूत पकड राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक कामामुळे प्रवासाला जावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो.

    हेही वाचा – Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    धनु – दिवस व्यवसाय आणि करिअर या दोन्हीसाठी चांगला असेल. आरोग्यात सुधारणा जाणवेल. कोणाहीकडून पैसे उधार घेणे टाळणेच उत्तम. कामाच्या ठिकाणी बोलण्यात स्पष्टता ठेवा, अन्यथा गैरसमज पसरतील.. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने तुम्हाला आज योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

    मकर – कामात दिरंगाई करणे सोडून द्या, अन्यता प्रतिस्पर्धी वरचढ ठरतील आणि त्याचा फटका तुम्हाला बसेल. संततीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा; यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. जुनी देणी फेडली जाण्याची चिन्हे आहेत. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या हेतूंबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे ठरेल.

    कुंभ – मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसेल, यामुळे आत्मविश्वास, धैर्य आणि दृढनिश्चय वाढेल.  महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीसाठी आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक पूर्ण करा. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही कराल.

    मीन – विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढताच राहण्याची शक्यता आहे. एखाद्याकडे अडकलेला निधी परत मिळू शकतो. जोडीदाराच्या सहवासाने मनाला शांती मिळेल. तुमचे गोड शब्द लोकांना आकर्षित करतील, पण तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    June 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    By Team AvaantarJune 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 20…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    June 8, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 07 ते 13 जून 2026

    June 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026

    Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    June 10, 2026

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 324
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 450
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 692
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.