दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 18 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वितीया 18:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 18:07
- योग : गंड 23:58; करण : तैतिल 07:52, वणिज 29:04
- सूर्य : सिंह; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:46
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
द्वितीया श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जुना मित्र सल्ला देऊ शकतो, तुम्ही तो अमलात आणला तर, धन लाभ होऊ शकतो. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी भागीदारांना ते पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील.
वृषभ – पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. व्यवसायात आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल.
मिथुन – कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. रागावर नियंत्रण मिळवा, अन्यथा आगीत तेल ओतले जाईल. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
कर्क – दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. नोतवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडले तसेच नवीन लोकांशी संपर्क होईल. प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील.
सिंह – आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आधार मिळू शकेल. घरातील कुणी व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसल्याने त्या व्यक्तीला आणि तुम्हालाही वाईट वाटेल.
कन्या – कार्यालयात तसेच घरच्या तणावांमुळे किंचित चिडचिडे बनाल. ऑफिसमध्ये आजची स्थिती समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जिथे बोलण्याची गरज नाही, तिथे बोलू नका. अन्यथा, तुमचीच चिंता वाढेल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल.
हेही वाचा – विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी
तुळ – आज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळावा लागेल. वेळेला पैशाइतपतच महत्त्व असल्याचे जाणून क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे.
वृश्चिक – आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देईल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य मिळेल.
धनु – टाळता न येण्याजोग्या काही घटनांमुळे अस्वस्थ व्हाल. परंतु त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. हुशारीने गुंतवणूक करा. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मौल्यवान ठरेल.
मकर – आज मेहनत केलीत तर, यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे फायदा होईल. आगंतुक पाहुणा आज घरी येऊ शकतो, परंतु त्याच्या आगमनाने आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल.
कुंभ – तुम्ही संवेदनशील असल्याने दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा. परिचयाची व्यक्ती पैसे उधार मागण्यास येऊ शकतो, ते देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा.
मीन – आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. व्यवसायात कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी सर्व लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करावे. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळे काही ठीक होईल.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
दिनविशेष
आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र
टीम अवांतर
आधुनिक हिंदी साहित्याचे जनक हरिश्चंद्र यांचा जन्म 9 सप्टेंबर 1850 रोजी सेठ अमीनमचंद यांच्या प्रतिष्ठित घराण्यात बनारस येथे झाला. 1880 मध्ये पंडित रघुनाथ, पंडित सुधाकर द्विवेदी, पंडित रामचंद्रदत्त व्यास इत्यादी हिंदी विद्वानांनी हरिश्चंद्रांना ‘भारतेंदु’ ही पदवी दिली. तेव्हापासून त्यांना ‘भारतेंदु हरिश्चंद्र’ असे गौरवाने म्हटले जाते. लेखन-वाचनाकडे त्यांचा लहानपणापासून ओढा होता. त्यामुळे बंगाली, पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, मराठी, गुजराती, इंग्रजी इत्यादी भाषांचे शिक्षण त्यांनी घरच्याघरी घेतले. हिंदी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. ते चांगले संघटनाकुशल आणि दूरदृष्टी असलेले पुरोगामी विचारांचे साहित्यिक होते. भारतेंदूंनी अनेक प्रकारची साहित्यनिर्मिती केली. त्यांनी हिंदी नाट्य-वाङ्मयाला नवे स्वरूप दिले. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. पाखंड विडंबन (1872) व वैदिकी हिंसा हिंसा न भवति (1873) या नाटकांत धार्मिक आणि सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रहार केले. त्यांच्या नाटकांची गद्यभाषा खडी बोली असून पद्य ब्रज भाषेत आहे. भारतीय तसेच पाश्चात्त्य नाट्यपरंपरांचा संगम त्यांच्या नाटकांत आढळतो. ‘नाटक’ या शीर्षकाचा एक गंभीर व विचार परिप्लुत निबंधही त्यांनी लिहिला आहे. भारतेंदुंनी स्वतःची नाटकमंडळी स्थापन केली, उत्तमोत्तम नाटके अनुवादित केली आणि करवून घेतलली. कधी कधी नाटकांत काम करून नाट्यव्यवसायाला प्रतिष्ठाही मिळवून दिली. भारतेंदूंनी कवी म्हणूनही मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या सुमारे 69 लहानमोठ्या कविता उपलब्ध आहेत. भारतेंदूंनी युगप्रवर्तक लेखकाचे काम यशस्वीपणे केले. धार्मिक आणि शृंगारिक परंपराधिष्ठित काव्यात देशप्रेम, समाजस्थिती, सुधारणा, राजकीय परिस्थितीवर उपहास इत्यादी विषय आणून हिंदी काव्याला आधुनिक बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1850 ते 1900 हा काळ ‘भारतेंदु काळ’ म्हणून हिंदी साहित्यात ओळखला जातो. 6 जानेवारी 1885 रोजी बनारस येथे त्यांचे निधन झाले.