Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 04 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 04 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 4, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 मार्च 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 13 फाल्गुन शके 1947; तिथि : प्रतिपदा 16:48; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 07:38
    • योग : धृति 08:52; करण : तैतिल 28:51
    • सूर्य : कुंभ; चंद्र : सिंह 13:45; सूर्योदय : 06:57; सूर्यास्त : 18:44
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वसंतोत्सव आरंभ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर

    टीम अवांतर

    प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर यांचा जन्म 4 मे 1849 रोजी जोरासाँको (कोलकाता) येथे झाले. ते देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध टागोर कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य होते. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे ते थोरले बंधू होते. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत ज्योतिरिंद्रनाथ यांचा मोठा हातभार होता.

    सुरुवातीला त्यांनी ललित कलांचे शिक्षण घेतले पण नंतर ते नाट्यगृहाकडे आकर्षित झाले आणि घरीच नाटकांचा सराव तसेच रंगमंचीय सराव  करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडून दिले. त्यांचे चुलत भाऊ गणेशनाथ यांनी 1865 मध्ये जोरासांको नाट्यशाळेची स्थापना केली होती.

    हेही वाचा – Bookshelf : ‘युद्ध जिवांचे…’ क्रूरतेचा भयानक संसर्गजन्य रोग!

    मायकेल मधुसूदन दत्त यांच्या ‘कृष्णकुमारी’ या पहिल्या नाटकात ज्योतिरिंद्रनाथांनी अहिल्यादेवीची भूमिका साकारली होती. त्यांनी लिहिलेली नाटके म्हणजे पुरुबिक्रम, सरोजिनी – ज्यात रवींद्रनाथांनी लिहिलेले एक गाणे आहे – अश्रुमती (अश्रूंमध्ये स्त्री) आणि स्वप्नमयी (स्वप्नाची स्त्री). ते एक उत्तम चित्रकार होते. याशिवाय त्यांनी शेक्सपियरचे ज्युलियस सीझर, मार्कस ऑरेलियसचे ध्यान, कादंबऱ्या आणि नाटके, इतिहास, तत्वज्ञान यांवरील पुस्तके इंग्रजी आणि फ्रेंचमधून बंगालीमध्ये अनुवादित केली. नंतर त्यांनी कालिदासाच्या शकुंतलासारख्या अनेक संस्कृत नाटकांचे बंगालीमध्ये भाषांतर केले.

    1869 ते 1888 या काळात ते आदि ब्राह्मो समाजाचे सचिव होते. याशिवाय त्यांनी कलकत्त्यात हिंदू मेळा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 4 मार्च 1925 रोजी झारखंडमधील रांची येथे ज्योतिंद्रनाथ यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवस संमिश्र असेल. दिवसाच्या पूर्वार्धात संकल्प पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळू शकते. दुपारी कामात काहीसे व्यग्र रहाल, मात्र सहकाऱ्यांसह वरिष्ठांकडूनही मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला लाभ देणारा असेल. जोडीदारासोबतची भावनिक जवळीकता वाढेल.

    वृषभ – आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. गांभीर्याने कामे करणे आवश्यक आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. बाहेरचे तेलकट-तिखट पदार्थ खाणे टाळा, अन्यथा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रांनी सांगितले म्हणून आंधळेपणाने कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करू नका.

    मिथुन – दिवस अनिश्चिततेने भरलेला असेल. काम मंद गतीने होईल. कामाचा उरक वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून मोलाच्या टिप्स मिळतील. तुमच्या कामाची दिशा ठरवण्यासाठी मित्र किंवा कुटुंबाची मदत घ्यावी लागू शकते. आर्थिकदृष्ट्या व्यावसायिकांना फार मोठा लाभ होणार नाही.

    कर्क – कामाच्या स्वरुपात बदल होऊ शकतो. कौटुंबिक तणाव कमी करण्यात तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणुकीबाबतचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकला. नोकरदार जातकांना थोड्याशा संशोधनाची आणि प्लॅनिंगची गरज असेल.

    सिंह – दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल. नवीन करारांवरील चर्चा पुढे सरकतील. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील लोकांना त्यांच्या योजनांचा पुनर्विचार करावा लागेल. कोणत्याही वादात अडकणे टाळा. त्यासाठी डोकं शांत आणि तोंड बंद ठेवणे आवश्यक आहे. एकीकडे गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी विचार सुरू असेल तर दुसरीकडे अचानक काही खर्च करावा लागेल.

    हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!

    कन्या – काही व्यक्तींच्या भेटीनंतर तुम्हालाही सकारात्मकता जाणवेल. नवीन व्यवसायासाठी सुरू असणाऱ्या वाटाघाटी प्रगतीपथावर असतील. नवीन काम सुरू करण्याआधी जुन्या कामांचा आढावा घेतलात तर त्यातून एखादी कल्पना सुचण्याची शक्यता आहे. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. तब्येत थोडी नरम गरम असेल, मात्र स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका.

    तुळ – कौटुंबिक मनोरंजन किंवा मेळाव्यांशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे खर्चात वाढ होईल. विरोधकांच्या योजना लवकर ओळखून त्यानुसार आपल्या चाली खेळाव्या लागतील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे काळजी घ्या‌, पथ्यपाणी सांभाळा. गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस फारसा चांगला नाही.

    वृश्चिक – याआधी कोणाला काही पैसे उसने दिले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन कराराला अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जुनी आश्वासने पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर दबाव असेल. कुटुंबात एखाद्या  कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल. संवाद हेच तुमचे सगळ्यात मोठे अस्त्र असेल, त्याचा काळजीपूर्वक वापर करा.

    धनु – कामाच्या जबाबदाऱ्या, मनोरंजन आणि कौटुंबिक नाती या सगळ्या आघाड्यांवर समान वेळ देण्याची  गरज आहे. त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, यातून चिडचिड वाढेल. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळेल. या पैशांचा योग्य विनियोग करण्याचे प्लॅनिंग करा. राजकीय क्षेत्रातील लोकांशी संपर्क वाढेल. याचा भविष्यात मोठा फायदा होईल.

    मकर – आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने कामे सोपी होतील. आज नातेसंबंधांमधील भावनिकता कमी झाल्याची जाणीव होईल, ज्यामुळे तुम्हाला निराशा वाटू शकते. नोकरीतील बदलांबद्दल जुन्या मित्रांशी चर्चा शक्य आहे. काही कारणांमुळे स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना काळजी घ्या अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

    कुंभ – अपेक्षांच्या दबावाखाली, भावनिक नातेसंबंध डळमळीत होतील. तुम्हाला काही मानसिक त्रास जाणवू शकतो. ध्यानधारणा अवश्य करा. विरोधकांच्या योजनांबाबत निष्काळजीपणा दाखवू नका. नवीन कामे सुरू करण्याऐवजी आज जुनी कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. टीम लीडर म्हणून आज उत्तम कामगिरी दाखवू शकाल. किमती वस्तू आणि मोबाइल फोन सांभाळून ठेवा.

    मीन – आरोग्याच्या समस्या कामावर परिणाम करणाऱ्या असतील. त्यामुळे योग्य ते उपचार वेळीच करा. सकारात्मक कौटुंबिक संबंध राखणे आज आव्हानात्मक असेल. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त होणारा प्रवास पुढे ढकलणे चांगले. आज गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेऊ नका. खरेदी करताना देखील आपल्या बजेटप्रमाणेच खर्च करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 28…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 388
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026
    Most Popular

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.