दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 मे 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 16 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्थी 07:51; नक्षत्र : मूळ 15:52;
- योग : सिद्ध 25:11; करण : कौलव 21:03;
- सूर्य : मेष; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:01;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
- वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
चरित्रात्मक लेखिका वीणा गवाणकर
टीम अवांतर
मराठी साहित्यात चरित्र हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय करणाऱ्या लेखिका वीणा गवाणकर यांचा जन्म 6 मे 1943 रोजी पुण्याजवळच्या लोणी, काळभोर येथे झाला. त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून ग्रंथपाल पदवी प्राप्त केली. 1964 मध्ये त्या वयाच्या केवळ 23व्या वर्षी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्या.
याच नोकरीत संदर्भाचे ज्ञान आणि महत्त्व त्यांच्या लक्षात आले. घरापासून दूर एकटीने राहण्याच्या त्यांच्या विचारात स्वतंत्रता आणि ठामपणा हे गुण दिसले, तेच त्यांच्या लेखनासाठी देखील उपयुक्त ठरले. 1981 साली ‘एक होता कार्व्हर’ या अमेरिकन कृषितज्ज्ञावर लिहिलेल्या चरित्रात्मक पुस्तकाद्वारे वीणाताईंचा लेखन प्रवास सुरू झाला. मागच्याच महिन्यात या पुस्तकाची 50वी आवृत्ती बाजारात आली आहे. त्यानंतर वीणाताईंचा हा लेखन प्रपंच सुरूच राहिला. आतापर्यंत डॉ, आयडा स्कडर, डॉ.खानखोजे, डॉ. सलिम अली, रोझलिंड फ्रँकलिन, डॉ.रेमंड डिटमार्स, लीझ माइट्नर, विलासराव साळुखे, रॉबी डिसिल्व्हा, गोल्डा मायर, रिचर्ड बेकर यासारखे कृषितज्ज्ञ, अणुशास्त्रज्ञ, दीनदलितांचे सेवक, राजकारणी तसेच पक्षी वा सर्प सांभाळण्यासाठी आयुष्य वेचलेले, चित्रकार, पाण्याचे महत्त्व ओळखलेले द्रष्टे आणि असे आणखीही लोकसेवकांची चरित्रे वीणाताईंनी पुस्तक रुपाने वाचकांपर्यंत पोहोचवली.
हेही वाचा – तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम
एप्रिल 2022 मध्ये ‘अवघा देहचि वृक्ष जाहला’ हे त्यांचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आणि चाहत्या वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे दुसऱ्याच महिन्यात त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली! याशिवाय लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत येणाऱ्या रविवार पुरवणीतील ‘किशोरकुंज’चे देखील त्यांनी दोन वर्षे संपादन केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सातव्या संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ‘निर्मळ’ स्मरणिकेचे संपादनही त्यांनी केले. ‘एक होता कार्व्हर’ आणि ‘डॉ. आयडा स्कडर’ या पुस्तकांचेव नभोनाट्य रुपांतरही त्यांनी केले.
मराठी वाङ्मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार तीन वेळा त्यांना मिळाले आहेत, कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालाकडून कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार, मारवाडी संमेलनाद्वारे घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार, कै. एस. जी. वर्टी मेमोरियल ट्रस्टचा वर्टी सर पुरस्कार, मेहता पब्लिशिंग हाऊस फाऊंडेशनचा कमलाबाई ओगले साहित्य पुरस्कार, शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्य श्री पुरस्कार, याशिवाय एसएनडीटी विद्यापीठातर्फे ‘वुमन ऑफ द इयर 2013’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य सम्राट न. चिं. केळकर पुरस्कार, उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार, श्रीमती सरस्वतीबाई चोगले ज्येष्ठ साहित्यिका पुरस्कार अशाही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
2008 साली कोकण मराठी साहित्य परिषदेचे महिला संमेलन आणि 2017 साली जळगाव येथे झालेले पहिले पर्यावरण साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपदही वीणाताईंनी भूषवले आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – एकंदर ग्रहमान अनुकूल आहे. व्यावसायिकांना जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. घरी काहीतरी चांगले नियोजन करू शकता. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्या शब्दांनी प्रभावित होऊ नका. कौटुंबिक बाबींबरोबरच वैयक्तिक बाबींकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
वृषभ – अध्यात्म आणि धार्मिक कार्यांमधील तुमची आवड आज वाढेल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतील. तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. संततीच्या सकारात्मक निकालामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राग आणि शब्द नियंत्रणात ठेवा.
मिथुन – कोणत्याही कामात मनाचे ऐकावे लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. आज कोणताही प्रवास टाळा, कारण त्यातून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागू शकते.
कर्क – ग्रहस्थिती अनुकूल आहे. विशिष्ट ध्येय साध्य करण्यास तुमचा आत्मविश्वास मदत करेल. या काळात तुमचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात, जे फायदेशीर ठरेल. मात्र, अतिआत्मविश्वास हानिकारक ठरू शकतो. स्वत:च्या वागणुकीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. खर्च करताना जपून करा. कोणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणुकीची जोखीम पत्करू नका.
सिंह – आज तुम्ही स्वतःचा विचार कराल, स्वतःसाठी काम कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. अध्यात्मावरील श्रद्धा वाढेल. मात्र अहंकार आणि राग टाळा, कारण यामुळे जवळच्या लोकांशी असलेले नातेसंबंध बिघडू शकतात. वडिलोपार्जित जमिनीशी संबंधित बाबींबद्दल जास्त अपेक्षा ठेवू नका.
कन्या – व्यावसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे, मात्र सही करण्यापूर्वी कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल, पण वरिष्ठांसह सहकारी मदत करतील. आत्मविश्वास आणि मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा आणि नातेवाईकांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
तुळ – सामाजिक महत्त्व वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक उजळून निघेल. एखाद्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जात असाल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी काही लोकांना तुमच्या यशाचा हेवा वाटेल आणि ते विरोधात कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. सावध रहा.
वृश्चिक – वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगणे टाळा. कामाच्या ठिकाणी एखादे कठीण काम अचानक पूर्ण केल्याने आनंद मिळेल. मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा, कारण ते चोरीला जाऊ शकतात किंवा हरवू शकतात. बजेट नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात सतत निर्माण होणाऱ्या तणावाचा तुमच्या घरावर परिणाम होऊ देऊ नका.
हेही वाचा – फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!
धनु – काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल, ज्यामुळे तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडेल. जवळच्या व्यक्तीकडून होणारी टीका तुम्हाला निराश करू शकते. त्यामुळे, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांनी व्यवसायात पारदर्शकता राखणे आवश्यक आहे.
मकर – दीर्घकाळापासूनच्या चिंतेतून दिलासा मिळू शकतो. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा केल्यास योग्य तोडगा काढण्यास मदत होईल. सकारात्मक विचारांमुळे नवीन यश मिळेल. आर्थिक वाद होण्याची शक्यता आहे, बोलण्यात संयम ठेवा. व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या.
कुंभ – आजचा दिवस इतरांना मदत करण्यात जाईल. असे केल्याने मानसिक शांती मिळू शकते. तुमच्या विनम्र स्वभावामुळे नातेवाईक आणि समाजात तुमचा आदरही वाढेल. जास्त रागावणे आणि चिडचिड करणे टाळा, कारण यामुळे वाद होऊ शकतात. जे लोक कमिशनवर काम करतात, त्यांनी आज सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मीन – वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करावी, असा बेत कराल. तुमच्या मेहनतीमुळे एका कठीण कामात यश मिळेल. संवाद कौशल्यामुळे अनेक समस्या सोडवता येतील. आजचा दिवस संयम बाळगण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.


