Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    September 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    September 4, 2026

    फोटो आणि परंपरा… काळाच्या आरशातले क्षण

    September 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 4, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 13 भाद्रपद शके 1948; तिथि : अष्टमी 24:13; नक्षत्र : रोहिणी 23:03;
    • योग : हर्षण 15:43; करण : बालव 13:20;
    • सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:52;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    श्रीकृष्ण जयंती (उपवास)

    जरा जिवंतिका पूजन

    कालाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    साहित्यिक, समीक्षक शंकर सारडा

    टीम अवांतर

    साहित्यिक आणि समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म 4 सप्टेंबर  1937 रोजी महाबळेश्वर येथे झाला. मराठी साहित्यविश्वात त्यांचे नाव अभ्यासू वृत्ती आणि सखोल समीक्षा यासाठी आदराने घेतले जाते. पत्रकारिता, समीक्षा आणि साहित्य अशा तीनही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. किशोरवयापासूनच त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती.

    वाचनाची बालपणापासून असलेली आवड आणि साहित्याची सखोल पारख यांनी त्यांना एक वेगळा दृष्टिकोन दिला. 1950 पासून त्यांनी सातत्याने बालसाहित्य लेखन सुरू केले, ज्यामुळे मुलांच्या साहित्यविश्वातही त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र त्यासोबतच पत्रकार देखील असल्याने दैनिकाच्या धकाधकीत बातम्या लिहिणे, भाषांतरे करणे, आणि त्याचबरोबर आवडीने पुरवणी संपादनाचे काम करणे — या माध्यमातून त्यांना वाचन, लेखन आणि सखोल समीक्षा यांचा व्यासंग साधता आला. पुस्तक परीक्षण फक्त परिचयापुरते मर्यादित न ठेवता त्यात अधिक सखोलता आणावी ही त्यांची भूमिका होती, आणि त्यांच्या लेखनातून ती स्पष्ट जाणवते. महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव होता.

    हेही वाचा – विभाला समजले दिरांचे कारनामे

    1968 च्या सुमारास ‘साधना’ साप्ताहिकाचे अतिथी संपादक म्हणून काम करताना त्यांनी ह. मो. मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षाखाली’ ही कादंबरी प्रकाशित केली. याशिवाय भा. रा. भागवत यांचा मानसपुत्र ‘फास्टर फेणे’ या व्यक्तिरेखेच्या जन्मामागेही सारडांचीच प्रेरणा होती. प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना हजेरी लावून तेथील घडामोडींचे बारकाईने वृत्तांकन करणारा पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता.

    ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सुरुवातीच्या काळात, रविवारच्या ‘मैफल’ पुरवणीला आकार देण्यात, साहित्याच्या क्षेत्रात ‘मटा’ची नाममुद्रा उमटवण्यात सारडा यांची मोठी भूमिका होती. पुढे त्यांनी विविध विभागीय संमेलने भरवण्यात जो पुढाकार घेतला, ती साहित्यप्रसारकाची भूमिका ही त्यांची मूळ वृत्ती होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांस्कृतिक पुढारपण मिळवून देण्यात ते एक प्रमुख होते. समीक्षणांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

    महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीतून सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणे गाजली होती. ‘मटा’ सुरू झाल्यानंतर त्याचं रूप घडवण्यात संपादक द्वा. भ. कर्णिकांना सारडा यांची चांगलीच साथ लाभली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे, वसंत बापट, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्यांना ‘मटा’शी जोडण्याचं महत्त्वाचे काम केले होते.

    शंकर सारडा यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या मुख्य संमेलनाखेरीज अन्य विभागीय संमेलने भरवण्याचा प्रघात पाडला. महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिले अभिजात साहित्य संमेलन, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन तसेच अंकुर साहित्य संमेलनांचे आयोजन त्यांनी केले.

    सारडा यांनी 60 हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचे समीक्षण केले आहे. टॉलस्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. 28 जानेवारी 2021 रोजी या व्यासंगी समीक्षकाचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – धावपळ आणि जबाबदाऱ्यांचा ताण आज थोडा जास्त थकवणारा असू शकतो, पण संयम तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. एखादा जुनाट आजार पुन्हा उद्भवू शकतो, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याच्या प्रत्येक पैलूची कसून तपासणी करा. इतरांवर अती अवलंबून राहिल्याने नुकसान होऊ शकते. आज तुमच्या कुटुंबाला दिलेले वचन पाळणे हे तुमचे प्राधान्य असू शकते.

    वृषभ – आजचा दिवस आनंद, मजा आणि नवीन सुरुवातीसाठी उत्तम ठरणारा असेल. तुमची सर्जनशील विचारसरणी इतरांचे लक्ष वेधून घेईल. त्यामुळे नवीन मित्रही मिळू शकतील. वाढत्या खर्चामुळे तुमच्या बजेटवर ताण येऊ शकतो, म्हणून विचारपूर्वक खर्च करा. अविवाहित जातकांचे विवाह ठरू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

    मिथुन – आज तुमचे शब्दच तुमची ताकद आणि कमजोरी दोन्ही ठरतील. सामाजिक कार्यक्रमात बोललेल्या कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, म्हणून बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. ऑनलाइन खरेदी करताना विशेष सावधगिरी बाळगा. मालमत्तेसंबंधी कोणताही निर्णय घाईने घेऊ नका; आधी आवश्यक चौकशी करा. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

    कर्क – आज सुखसोयी आणि कौटुंबिक आनंदात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. एखाद्या दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कष्टाचे फळ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. एका जुन्या व्यवहाराशी संबंधित बाब काहीशी चिंता निर्माण करू शकते. नवीन वाहन खरेदी करण्याची किंवा घरात मोठा बदल करण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे कुटुंबाचा उत्साह वाढेल.

    सिंह – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. शिवाय तुम्हाला अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. विद्यार्थ्यांनी शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यांच्या मतांना फार महत्त्व देऊ नका. उपासना आणि ध्यानधारणा यामुळे मनाला शांती मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक अडचणी हळूहळू कमी होत जातील.

    कन्या – तुम्हाला वाटणाऱ्या चिंता आईसोबत शेअर केल्याने आज तुम्हाला भावनिक दिलासा मिळू शकतो. गाडी चालवताना अधिक सावधगिरी बाळगा आणि घाई करणे टाळा.  जोडीदारासाठी काहीतरी खास खरेदी केल्याने तुमच्या नात्यातील प्रेम आणि जवळीक वाढेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींमधील संबंध अधिक दृढ होऊ शकतात. तुमचे कुटुंब तुमच्यासाठी असे काहीतरी आश्चर्यकारक नियोजन करू शकते, ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल.

    तुळ – आज तुमचे घर आनंद आणि शुभ घटनांचे साक्षीदार होईल. तुमच्या कष्टाचे फळ अखेर मिळेल आणि गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुमचा समजूतदारपणा त्यांच्या योजना यशस्वी होऊ देणार नाही. संततीविषयीची एखादी चांगली बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. एकूणच, आजचा दिवस सकारात्मक असेल आणि कुटुंबासोबत घालवलेले क्षण खास ठरतील.

    वृश्चिक – आज तुम्हाला काही नवीन कल्पना सुचू शकतात, ज्या तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतील. परदेशी व्यापाराबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांना भेटल्याने भविष्यात महत्त्वपूर्ण संधींचे दरवाजे उघडू शकतात. वडिलांच्या बोलण्याने तुम्हाला थोडे वाईट वाटू शकते, पण शांत राहणेच उत्तम. खूप काळापासून हरवलेली, तुमची आवडती वस्तू अचानक सापडल्याने तुमचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.

    हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    धनु – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. जोडीदार कोणत्यातरी गोष्टीमुळे नाराज असू शकतो, त्यामुळे वाद घालण्याऐवजी त्याच्याशी प्रेम आणि समजूतदारपणाने वागणे उत्तम ठरेल. उत्पन्नाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे अभ्यास करणे सोपे जाईल. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने प्रचंड आनंद होईल. घरी पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाऊ शकते.

    मकर – आज, सकारात्मक बदल तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतील. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे  कुटुंबातील आनंद वाढेल. तुमच्या मेहनतीमुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. स्वतःची जीवनशैली सुधारण्याचे प्रयत्नही यशस्वी ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंद मिळू शकतो. जोडीदारासोबत घालवलेले प्रेमळ क्षण तुमच्या नात्यात ताजेपणा आणतील.

    कुंभ – आजचा दिवस थोडा अस्थिर असू शकतो, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखा. प्रवास करताना किंवा स्थळदर्शन करताना, तुम्हाला भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणारी महत्त्वाची माहिती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी एखादा संघर्षाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो, परंतु शांत राहून परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. पालकांच्या आशीर्वादाने सुरू केलेले काम यशस्वी होऊ शकते. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची योजना देखील करू शकता.

    मीन – आज व्यवसायात काही आव्हाने येतील, पण संयम आणि योग्य रणनीतीमुळे यावर नक्कीच तोडगा निघेल. कोणाचाही सल्ला आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी, स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्या. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात. वैवाहिक जीवनात, एकमेकांना वेळ देणे आणि समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. आज वडिलांच्या आरोग्याची चिंता वाटू शकते, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. गरज असेल तर आवश्यक तपासण्या करून घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा

    September 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 3, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 12…

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा

    September 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    September 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    September 4, 2026

    फोटो आणि परंपरा… काळाच्या आरशातले क्षण

    September 3, 2026

    विभाला समजले दिरांचे कारनामे

    September 3, 2026

    आनंददायी शिक्षण

    September 3, 2026

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 421
    • अवांतर 206
    • आरोग्य 143
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 564
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 893
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    September 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 सप्टेंबर 2026

    September 4, 2026

    फोटो आणि परंपरा… काळाच्या आरशातले क्षण

    September 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.