दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 नोव्हेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 12 कार्तिक शके 1947; तिथि : त्रयोदशी 26:05; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 15:05
- योग : हर्षण 19:39; करण : कौलव 15:40
- सूर्य : तुळ; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:05
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
सोमप्रदोष
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस चांगला जाईल. करिअर आणि व्यवसायात नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते. काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता. खर्च नियंत्रित करावे लागतील, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवा. अन्यथा, एखाद्या सहकाऱ्याकडून दिशाभूल होऊ शकते. गुंतवणुकीच्या संदर्भात चांगली बातमी ऐकायला मिळेल.
वृषभ – आठवड्याच्या पहिल्या दिवशी एखादी आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. काही अपूर्ण इच्छा पुन्हा उफाळून वर येतील. नोकरदार जातकांना काही उत्तम संधी मिळू शकतात, चांगल्या नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. मात्र, कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळा.
मिथुन – दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. काही चांगल्या संधी हातातून निसटतील. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा, सावधगिरी बाळगा आणि स्वतःच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या. कोणत्याही प्रकल्पात पैसे गुंतवण्यापूर्वी खर्च नियंत्रित करा, काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क – एखादी हरवलेली गोष्ट शोधली तर सापडू शकते. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देखील दिवस चांगला आहे. रिअल इस्टेटशी संबंधित एखादा मोठा करार करू शकता. नोकरदार जातकांची दुसऱ्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यश मिळू शकते. नफाही चांगला होईल. अविवाहित जातकांना लग्नाच्या दृष्टीने काही चांगले प्रस्ताव येतील.
सिंह – दिवस फारसा अनुकूल नाही. अनेक अडचणी येऊ शकतात. कामात अनावश्यक अडथळे निर्माण होतील, ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सावध राहा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात मात्र, संततीशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकू येतील. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल.
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
कन्या – एखाद्या गोष्टीबद्दल मनात असणारा गोंधळ दूर होईल आणि सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकतो. नोकरदार जातकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण विचार न करता केलेल्या गुंतवणुकीमुळे नंतर पश्चात्तापाची वेळ येईल. बेरोजगार जातकांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.
तुळ – एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामात प्रगती होण्याची आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. काही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल ठरेल. नवीन संपर्क वर्तुळामुळे येणाऱ्या काळात व्यवसायात फायदा होईल.
वृश्चिक – काही वादांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. अशावेळी परिस्थिती संयमाने हाताळावी लागेल. कार्यालयीन समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षमता दाखवावी लागेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल, ज्यामुळे येणाऱ्या काळात गुंतवणुकीला हात लावावा लागू शकतो.
धनु – आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जुने काम पूर्ण झाल्यामुळे आनंद होईल. अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळेल. जास्त मेहनत करावी लागू शकते, परंतु त्यानंतरच यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल.
मकर – दिवस आनंदी असेल. योजना यशस्वी होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांसाठी दिवस नफा कमावण्याचा आहे. करिअर आणि व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील निष्काळजीपणा टाळा. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. वैवाहिक जीवन सुखी असेल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात, ज्यातून आणखी काही वेगळेच प्रश्न निर्माण होतील. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. संध्याकाळ मित्रांसोबत आनंदात घालवाल. कामाच्या ठिकाणी घेतलेले काही निर्णय खूप उपयुक्त ठरतील, ज्यामुळे येणाऱ्या काळात महत्त्वपूर्ण लाभ होतील. घरी काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. जे स्वयंरोजगार आहेत त्यांच्या नफ्याच्या संधी वाढतील.
हेही वाचा – लग्नाला यायचं हं… ते डिजिटल निमंत्रण!
मीन – दिवस संमिश्र असेल. काही नव्या संधी मिळू शकतात ज्याचे सोने कराल. भागीदारीत काम करू इच्छिणाऱ्यांना नफ्याच्या अधिक संधी येतील. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील इतर सदस्यांशी सल्लामसलत करा. आरोग्याच्या बाबतीतही दिवस संमिश्र असेल.
दिनविशेष
भारतीय रंगभूमीचे निर्माते पृथ्वीराज कपूर
टीम अवांतर
भारतीय रंगभूमीचे निर्माते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी लायलपूर (आता फैसलाबाद, पाकिस्तान) येथे झाला. पेशावरच्या एडवर्ड्स कॉलेजमधून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. लायलपूर आणि पेशावर येथे थिएटर कलाकार म्हणून त्यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली होती. त्यामुळे अभिनयातच करिअर करायचे त्यांनी नक्की केले. 1929 मध्ये दोन सिनेमांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर तिसरा सिनेमा ‘गर्ल’मध्ये त्यांना मुख्य कलाकाराची भूमिका मिळाली. ज्याद्वारे त्यांची ओळख निर्माण झाली. पृथ्वीराज कपूर यांनी दो धारी तलवार, शेर-ए-अरब आणि राजकुमार यासारख्या 9 मूक चित्रपटांमध्ये काम केले. मूकपटांमधील त्यांचा अभिनय लोकांना आवडला. त्यानंतर 1928 मध्ये त्यांनी मुंबई गाठली. येथे ते इम्पीरियल फिल्म्स कंपनीत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. 1931 मध्ये भारतातील पहिला बोलपट आलम आरा प्रदर्शित झाला. या ऐतिहासिक चित्रपटात पृथ्वीराज यांनी सहायक म्हणून तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतच्या विविध आठ टप्प्यांमधील भूमिका साकारल्या. पृथ्वीराज कपूर यांनी 1944 मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली. नाट्यवर्तुळात पृथ्वी थिएटरचे स्थान आजही अबाधित आहे. पृथ्वी थिएटरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भारतीय टपाल विभागाने दोन रुपयांचे एक टपाल तिकीट देखील जारी केले होते. ग्रँट अँडरसन थिएटर कंपनीत एक अभिनेता म्हणून देखील पृथ्वीराज कार्यरत होते. 1960 मधील मुघल-ए-आझम या सिनेमात त्यांनी मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांनी 1 रुपया मानधन घेतले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पृथ्वीराज यांच्या अभिनयाचे प्रचंड प्रमाणात कौतुक झाले. ‘कल, आज और कल’ या चित्रपटात पृथ्वीराज, मुलगा राज आणि नातू रणधीर अशा तिघांनी तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या. 1954 मध्ये पृथ्वीराज कपूर यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देण्यात आली. पुढे 1969 मध्ये पृथ्वीराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 29 मे 1972 रोजी बुलंद आवाजाच्या या अभिनेत्याचे निधन झाले. 1972 मध्येच त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.


