Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 1, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 01 मे 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 11 वैशाख शके 1948; तिथि : पौर्णिमा 22:52; नक्षत्र : स्वाती 28:34;
    • योग : सिद्धि 21:12; करण : विष्टि 10:00;
    • सूर्य : मेष; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:00;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    महाराष्ट्र दिन

    पौर्णिमा समाप्ती रात्रौ 10:52

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मन्ना डे

    टीम अवांतर

    प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मन्ना डे यांचा जन्म 1 मे 1919 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते प्रबोधचंद्र डे. चित्रपटसृष्टीत मात्र ते मन्नादा या नावाने प्रसिद्ध होते. काका के. सी. तथा कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण होते. के. सी. डे आणि  उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून मन्नादा यांनी गाण्यांची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिकताना सलग तीन वर्षं त्यांनी संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी 1942 साली ते के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.

    मुंबईत के. सी. डे यांच्यासह खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास आणि  सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी काही काळ उमेदवारी केली.  एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.

    हेही वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    1943 मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिर्ग्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन करण्याची संधी मन्ना डे यांना मिळाली. मात्र, 1950 सालच्या मशाल चित्रपटातील ‘उपर गगन विशाल’ या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करून घेतला. हिंदीसह मराठी, गुजराथी, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पार्श्वगायन त्यांनी केले.

    जिथे जिथे रागदारीवर आधारलेली गाणी गाण्यासाठी मन्ना डे यांना पाचारण केलं गेलं तिथे त्यांनी त्या गाण्याचं सोनं केलं. याचं सर्वात मोठं आणि सर्वात ठळक उदाहरण म्हणजे ‘दिल ही तो हैं’मधल्या ‘लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे’ या गाण्याचं. हे गाणं हा मन्ना डेंच्या सिनेसंगीतातल्या गायकीचा परमोच्च बिंदू ठरावा. रागदारी गायनाचा असाच नजराणा मन्ना डेंनी पेश केला आहे तो मराठीतल्या ‘वरदक्षिणा’ या सिनेमात. या सिनेमातलं ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ हे गाणं मन्ना डेंनी ताकदीने गायलं आहे.

    मन्नादा यांच्या गाण्यावर शास्त्रीय संगीताचा शिक्का जरी बसलेला असला तरी सिनेमातली गाणी गाताना त्यांनी आपल्या गाण्यात वेळप्रसंगी लवचिकताही दाखवली होती. म्हणूनच ‘चलती का नाम गाडी’मधल्या गाण्यात मन्ना डे ‘मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा’ असा गमतीदार प्रश्न करू शकले, ‘तिसरी कसम’मधलं ‘चलत मुसाफिर’ हे लोकगीत ते तशाच रांगडेपणाने गाऊ शकले, ‘पडोसन’मधलं ‘एक चतुर नार कर के सिंगार’ हे  गाणं तितकंच किशोर कुमार यांच्या तोडीचं गाऊ शकले.

    मन्नादा यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल सरकारकडून 1971 साली पद्मश्री, 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2007 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2004 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून जीवनगौरव देऊन गौरवण्यात आले. याशिवाय, झनक झनक तोरी बाजें पायलिया (मेरे हुजूर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘ए भाय जरा देखके चलो’ (मेरा नाम जोकर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 24 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज दिवस चांगला जाईल. कुटुंबातील जुने वाद मिटल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. करिअरमध्ये चांगली कामगिरी कराल, नवीन उद्योग सुरू करण्याच्या संधी मिळू शकतील. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. आरोग्य सामान्य राहील.

    वृषभ – आजचा दिवस सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी कराल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील, पण खर्च जपून करा. एखाद्या खास व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरू शकते. नातेसंबंध चांगले राहतील.

    मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. काही प्रमाणात मानसिक चिंता वाटू शकते.

    कर्क – दिवस काहीसा आव्हानात्मक पण संतुलित असेल. नात्यांमध्ये किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात, पण सामंजस्याने सर्व प्रश्न सुटतील. कामात कठोर परिश्रम आवश्यक आहेत. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबासोबत काही वेळ घालवा. त्याने मनाला शांती मिळेल.

    सिंह – आजचा दिवस चांगला आणि संधींनी भरलेला असेल. नवीन व्यवसाय सुरू करणे यशस्वी ठरू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादा मित्र तुम्हाला मदत करेल. प्रेमप्रकरणात घाई करू नका, विचार करण्यासाठी  स्वतःला वेळ द्या.

    कन्या – कामाच्या ठिकाणी घाईने मोठे निर्णय घेणे टाळा. अन्यथा काही वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतात. अर्थात तसे झालेच तरी परिस्थिती अखेरीस निवळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. नातेसंबंधांमध्ये शांतता टिकवून ठेवा. आरोग्य चांगले असेल.

    तुळ – संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी एनर्जी कमी पडत असल्याचे जाणवेल. नवीन प्रकल्प सुरू करणे पुढे ढकलणे चांगले राहील. कौटुंबिक नात्यातून काही काळासाठी ब्रेक घेण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज भासू शकते.

    वृश्चिक – कामाच्या निमित्ताने प्रवासाच्या आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या संधी मिळू शकतात. जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. प्रेमाच्या बाबतीत जास्त अपेक्षा ठेवू नका आणि संयम बाळगा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते.

    हेही वाचा – नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    धनु – तुमचा दिवस सावधगिरीने पावले उचलण्याचा असेल. आर्थिक ताण येऊ शकतो, त्यामुळे शहाणपणाने निर्णय घ्या. नात्यांमधील वाद टाळा आणि समजूतदारपणा दाखवा. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे पुढे ढकलणे उत्तम ठरेल.

    मकर – कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, पण कठोर परिश्रमाने त्यावर मात कराल. नात्यांमध्ये लहानसहान गोष्टींवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, पण संवाद कायम ठेवा. प्रवास करताना आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

    कुंभ – खर्चावर नियंत्रण आणि बोलण्यात संयम बाळगा. आज कौटुंबिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात, परंतु नातेसंबंध स्थिर राहतील. आयुष्यात अशा एका नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो, जी तुमच्यासाठी आनंदाचे कारण बनेल. इतरांसोबत स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्या.

    मीन – कौटुंबिक जीवनात जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. एखादी खास व्यक्ती भेटू शकते, जिच्या मार्गदर्शनाखाली नवीन व्यवसाय सुरू करता येईल. कामाच्या ठिकाणी नफा आणि नवीन सौदे होण्याचीही शक्यता आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    April 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 एप्रिल 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 10…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    April 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 283
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 402
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 201
    • मैत्रीण 18
    • ललित 594
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.