Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत, पेरूची चटणी, पेरूचा गर, अननसाचा सीझन, टेस्टी ॲपल मिल्कशेक
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा.

    • खूपदा सीझनमध्ये अननस अत्यंत स्वस्त दरात मिळतात. अशा वेळी त्यांचा साठा करून ठेवणे आपल्याला शक्य नसले, तरी त्यांचा मुरंबा करणे सहज शक्य असते. एक किंवा दोन पिकलेले किंवा अर्धवट झालेले अननस सोलून, किसणीने किसून घ्यावेत किंवा बारीक चिरावेत. आवश्यकतेनुसार साखर घालून थोडा वेळ फ्रीजमध्ये किंवा तसेच ठेवावे. त्याला भरपूर पाणी सुटते. हे मिश्रण गॅसवर ठेवून त्याला अधूनमधून चमच्याने ढवळत रहावे. सर्व पाणी आटल्यानंतर त्यामध्ये सुंठ, वेलची, जायफळ या सर्वांची पूड टाकावी. मुरंबा तयार होतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    • पेरू स्वस्त आणि चांगले मिळतात, तेव्हा मोठे पेरू घेऊन त्याच्या फोडी कराव्यात. कूकरची एक शिट्टी करून पाणी न घालता वाफवून घ्याव्यात. गार झाल्यावर चाळणीवर गाळून घ्याव्यात. बिया आणि चोथा वर राहून घट्ट गर खाली पडेल. एक वाटी गराला पाव वाटी गूळ घालून एक चटका (उकळी) द्यावा. गार झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. मुलांना पोळी किंवा ब्रेडबरोबर देता येतो. तिखट-मीठ घालून फोडणी दिली, तर चटणी छान लागते. तसेच भाजलेले तीळ, खोबरे घालून मेथी-मिरचीच्या फोडणीने केलेले पंचामृत तर फारच रुचकर लागते. घट्ट गर फ्रीजमध्ये ठेवून हे आयत्या वेळेस करता येते.
    • एक ग्लास सफरचंदाचा शेक बनविण्यासाठी दोन मध्यम आकाराची सफरचंदे आदल्या दिवशी रात्री फ्रीजरमध्ये ठेवावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बर्फाप्रमाणे कडक बनलेली असतील. शेक करण्यापूर्वी दोन-अडीच तास ही सफरचंदे फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवावीत. आता ती उकडलेल्या टोमॅटोप्रमाणे एकदम मऊसर बनतील. ती हाताने उकलावीत (सोलून घ्यावीत) आणि त्यातील सर्व गर चमच्याने खरडून काढावा. त्यात दोन चमचे साखर, एक कप दूध घालावे आणि हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून काढावे. चवदार सफरचंदाचा शेक तयार होईल. या पद्धतीमुळे सफरचंदामधील गर एक कणभरही वाया जात नाही. अगदी मध्यभागीच्या बियांजवळीलही सर्व गर निघून येतो आणि शेक पटकन करता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…

    • फ्रूट सॅलडला नेहमीपेक्षा वेगळी आणि स्वादिष्ट चव आणायची असेल, तर त्यात सीताफळाचा बियाविरहित गर घालावा.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,  avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : लज्जतदार चटणी मिसळ!

    August 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    By Team AvaantarAugust 19, 2026

    नीलिमा खडतकर भातासाठी साहित्य तांदूळ (कुठलेही जुने तांदूळ घ्यावेत, भात फडफडीत हवा) – एक कप…

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    Recipe : लज्जतदार चटणी मिसळ!

    August 11, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 400
    • अवांतर 205
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 540
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 859
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.