Sunday, February 15, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?

Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?

वरी तांदळाची खिचडी प्रकार – 1

साहित्य

  • वरी तांदूळ – दोन वाट्या
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट – एक वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • मिरच्या – पाच ते सहा
  • गूळ – चवीपुरते
  • जिरे – एक टीस्पून
  • लवंगा – दोन-तीन
  • दालचिनीचा तुकडा – एक इंच
  • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
  • ओले खोबरे – अर्धी वाटी
  • तूप – दोन चमचे

कृती

  1. तूप गरम करून त्यावर जिरे टाकून फोडणी करावी.
  2. फोडणीत मिरच्यांचे तुकडे घालावेत आणि त्यावर वरी तांदूळ परतावेत.
  3. चांगले परतल्यावर त्यात आधणाचे पाणी घालावे.
  4. वरी तांदूळ थोडे शिजत आल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ, गूळ आणि दाण्याचे कूट घालावे.
  5. लवंगा आणि दालचिनी भाजून, जाडसर कुटून घालावी आणि चांगली वाफ येऊ द्यावी.
  6. शिजून झाल्यावर त्यात थोडे तूप सोडावे आणि वर ओले खोबरे तसेच कोथिंबीर घालावी.
  7. या खिचडीत बटाट्याच्या फोडी पण घालतात.

हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…


वरी तांदळाची खिचडी प्रकार – 2

साहित्य

  • वरी तांदूळ – दोन वाट्या
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट – दीड वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चवीनुसार
  • तूप – फोडणीपुरते
  • जिरे – एक टीस्पून
  • मिरच्या – चार
  • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
  • ओले खोबरे – अर्धी वाटी

कृती

  1. वरी तांदूळ गॅसच्या मंद आचेवर परतून घ्यावेत.
  2. नंतर त्यात आधणाचे पाणी घालावे. तांदूळ मऊ आणि मोकळे असे शिजवून घ्यावेत.
  3. नंतर ते ताटात काढून मोकळे करावेत.
  4. त्यात शेंगदाण्याचे कूट घालावे.
  5. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी.
  6. त्यानंतर एका कढईत तूप घालून जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी.
  7. त्यात वरी तांदूळ घालून चांगली वाफ आणावी.
  8. खावयास देतेवेळी वरून कोथिंबीर आणि खोबरे घालावे. लिंबाची फोड बरोबर द्यावी.

हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो


वऱ्याची तांदळाची खिचडी प्रकार – 3

साहित्य

  • वरी तांदूळ – चार वाट्या
  • दाण्याचे कूट – दोन वाट्या
  • मिरच्या – पाच-सहा
  • कोथिंबीर – चिरलेली मूठभर
  • ओले खोबरे – अर्धी वाटी (किसलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चवीनुसार
  • जिरे – एक टीस्पून
  • तूप – एक चमचा

कृती

  1. वरी तांदूळ तांबूस भाजून घ्यावे.
  2. तांदळाच्या दुप्पट आधण पाणी घेऊन त्यात हे तांदूळ घालून झाकून ठेवावेत. वरचेवर ढवळावे.
  3. याप्रमाणे एक तास तांदूळ भिजत ठेवावेत. नंतर ते मोकळे होतील.
  4. नंतर तूप आणि जिऱ्याची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावेत.
  5. या फोडणीत वरी तांदूळ आणि दाण्याचे कूट घालावे.
  6. चवीला मीठ, साखर घालावी आणि परतून एक वाफ द्यावी.
  7. ही खिचडी साबुदाण्याच्या खिचडीसारखी होते.

(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,

avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!