Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विनातिकीट रेल्वेप्रवासाचे काही अनुभव, पण दुसऱ्यांचे!
    अवांतर

    विनातिकीट रेल्वेप्रवासाचे काही अनुभव, पण दुसऱ्यांचे!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 25, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    विनातिकीट, अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, TC, Without_ticket, railway_fine, Central_Railway
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अजित गोगटे

    मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल?

    रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे स्वत:चे काही अनुभव मागील लेखात दिले होते. आता दोन किस्से माझ्याशी संबंधित नसले तरी, माझ्या समक्ष घडलेल्या घटनांचे आहेत.

    साहेब, शांतूच्या लग्नाला यायचं हं!

    एक दिवस नाशिकला जाण्यासाठी कल्याण स्टेशनच्या तेव्हाच्या प्लॅटफॉर्म क्र. 1वर पहाटेच्या पहिल्या कसारा लोकलची वाट पाहात उभा होतो. आमची लोकल येण्यापूर्वी बाजूच्या प्लॅटफॉर्म क्र. 2वर कर्जतहून आलेली व्हीटीकडे (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) जाणारी पहिली लोकल आली. एवढया पहाटेही फलाटावर  जिन्यापाशी एक ‘टीसी’ उभा होता. आलेल्या लोकलच्या एका डब्यातून वारली / कातकरी आदिवासींचा एक 15-20 जणांचा समूह खाली उतरला. त्यांच्यात सर्वात पुढे डोक्याला बाशिंग बांधलेला नवरदेव, त्याच्यासोबत दोन करवल्या आणि इतर वर्‍हाडी मंडळी आणि सर्वात शेवटी पांढरी टोपी घातलेला एक वृद्ध आणि त्याच्यासोबत हातात मेणकापडाची पिशवी घेतलेला एक 12-14 वर्षांचा मुलगा होता.

    हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन

    ही मंडळी जिन्यापाशी आल्यावर ‘टीसी’ने त्यांना तिकीट विचारले. पुढच्या मंडळींनी हाताने मागे खूण केली आणि ते जिना चढून वर गेले. कदाचित, सर्वात मागून येणार्‍या वृद्धाकडे सर्वांची तिकिटे असतील असा विचार करून ‘टीसी’ने पुढच्या मंडळींना जाऊ दिले. तो वृद्ध जवळ आल्यावर…

    टीसी : आजोबा, सर्वांची तिकिटे आहेत ना तुमच्याजवळ, ती दाखवा.

    आजोबा : बाल्या, साहेबांना तिकटं दाखव की रं!

    आजोबांच्या सोबत असलेल्या बाल्याने हातातील पिशवीतून हार काढून साहेबांच्या गळ्यात घातला आणि हातात नारळ दिला!

    आजोबा : साहेब, आमच्या शांतूचं लगिन हाय सांजच्याला. नक्की यायचं हं!

    टीसी अवाक होऊन पाहात राहिला आणि त्याने त्या आजोबांना तसेच त्यांच्या सोबतच्या बाल्यालाही जाऊ दिले.

    नोकरी धोक्यात येण्याची भीती

    एक दिवस शेवटच्या कर्जत लोकलने रात्री 2.20 वाजता कल्याणला पोहोचलो. आमची लोकल प्लॅटफॉर्म क्र. 4वर आली होती. बाजूच्या फलाटावर बर्‍याच उशिराने आलेली सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस येऊन नुकतीच थांबली होती. लोकलमधून उतरलेले तुरळक प्रवासी आणि सिद्धेश्वरमधून आलेले प्रवासी जिना चढून वर जाऊ लागले. जिन्यात माझ्यापुढे सिद्धेश्वरमधून उतरलेले एक मध्यमवयीन जोडपे होते. त्यातील पुरुष सहा फूट उंचीचा, धिप्पाड आणि एखादा राजकीय नेता वाटावा असा पांढरा झब्बा, लेंगा आणि टोपी घातलेला होता. त्याच्या दोन हातांच्या आठ बोटांमध्ये खड्यांच्या अंगठ्या होत्या, त्याची पत्नीही उंचीपुरी, नऊवारी साडी नेसलेली आणि सोन्याने नखशिखांत मढलेली होती.

    एवढ्या अपरात्रीही जिन्याच्या वर एक ‘टीसी’ उभा होता. जिना चढून वर जाताच माझ्या पुढे असलेल्या या जोडप्याला ‘टीसी’ने तिकीट विचारले. आता काय होतंय, हे पाहण्यासाठी मी दिसेल आणि ऐकूही येईल एवढ्या अंतरावर बाजूला उभा राहिलो.

    हेही वाचा – विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव

    टीसी आणि या जोडप्यामध्ये त्यावेळी झालेला संवाद मोठा मजेशीर होता :

    टीसी : कुठून आलात?

    जोडप्यातील पुरुष : सोलापूरहून.

    टीसी : तिकीट / रिझर्व्हेशन जे काही असेल ते दाखवा.

    पुरुष : तिकीट, रिझर्व्हेशन काय बी नाय.

    टीसी : बाई, तुमचं तिकीट असेल तर दाखवा.

    बाई : माझ्याकडे बी नाय.

    टीसीने सोलापूरपासूनचे दोघांचे भाडे आणि दंड यांचा हिशेब करून तेवढी रक्कम त्या पुरुषाकडे मागितली.

    पुरुष : माझ्याकडे एक दमडी बी नाय.

    टीसी : बाई, तुमच्याकडे पैसे असतील तर बघा.

    बाई : माझ्याकडे काय नाय. पैशाचे सर्व यवहार धनी बघत्यात!

    यानंतर टीसी आणि या जोडप्यामध्ये आणखी काही संभाषण झाले. शेवटी टीसीने त्या दोघांना कोणताही दंड न घेता जाऊ दिले. ते जोडपे निघून गेल्यावर मी टीसीकडे गेलो आणि त्याने दंड न वसूल करण्याचे कारण विचारले. त्याने दिलेले उत्तर थक्क करणारे होते.

    टीसी म्हणाला, दंड भरायला पैसे नाहीत म्हटल्यावर त्या दोघांना उद्या सकाळी कोर्टात उभे करेपर्यंत कोठडीत ठेवणे भाग होते. कल्याणच्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत फार तर 10 लोक मावू शकतात. दिवसभरात पकडलेले 20हून अधिक लोक आधीच कोठडीत आहेत. त्यात आणखी या दोघांना कुठे ठेवणार? शिवाय बायकांसाठी वेगळी कोठडी नाही. अशा उफाड्याच्या आणि सोन्याने मढलेल्या बाईला तेथे नेऊन ठेवली आणि उद्या तिनेच कोर्टात माझ्याविरुद्ध अतिप्रसंग केल्याची बोंब मारली तर, माझी 26 वर्षांची नोकरी धोक्यात येईल. रेल्वेला मिळणारे पैसे गेले गाढवाच्या xxx. नोकरी गेली तर मी भिकेला लागेन!

    यानंतर एकदा मध्य रेल्वेचे त्यावेळचे मुख्य महाव्यवस्थापक राज कुमार जैन यांच्या पत्रकार परिषदेला गेलो. हे सर्व प्रसंग आणि घटना मनात होत्याच. जेवणाच्या वेळी गप्पा मारताना हे सर्व जैन यांना सविस्तर सांगितले. ऐकून तेही अचंबित झाले आणि याबाबतीत काहीही करण्यात त्यांनी सपशेल हतबलता व्यक्त केली!

    (समाप्त)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn