Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 26, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 26 मार्च 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 05 चैत्र शके 1948; तिथि : अष्टमी 11:48; नक्षत्र : आर्द्रा 16:18;
    • योग : शोभन 24:31; करण : बालव 22:55;
    • सूर्य : मीन; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:39; सूर्यास्त : 18:50;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    श्रीराम नवमी

    दुर्गाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    आधुनिक मराठी कवी ग्रेस

    टीम अवांतर

    मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी म्हणून ओळख असणारे माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म 10 मे 1937 रोजी नागपूर येथे झाला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले.
    नागपूर विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम्‌.ए.ची परीक्षा ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. युगवाणी या ‘विदर्भ साहित्य संघा’च्या मुखपत्राचे ते काही काळ संपादक होते. त्यानंतर मुंबईच्या ‘रायटर्स सेंटर’ या संस्थेकडून प्रकाशित होणाऱ्या संदर्भ  या द्वैमासिकाचे ते संपादक झाले.

    संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी यासारखे त्यांचे  काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सुरुवातीला ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. वृत्तबद्धता, नादानुसारी आणि लयसंपन्न आकृतिबंध हे त्यांचे काव्यविशेष होत.

    हेही वाचा – मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    चर्चबेल हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह. त्यानंतर मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, वाऱ्याने हलते रान, ओल्या वेळूची बासरी हे ललित संग्रह प्रसिद्ध झाले. त्यापैकी वाऱ्याने हलते पान या संग्रहासाठी त्यांना 2012 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.

    याखेरीज जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार  (चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल, संध्याकाळच्या कविता) वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार, नागभूषण पुरस्कार, जीवनव्रती पुरस्कार, दमाणी पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

    संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यवाचन आणि निवेदन अशा दुहेरी भूमिका बजावत ‘मैत्र जीवाचे’ हा कार्यक्रम ते सादर करायचे. 26 मार्च 2012 रोजी या कवीचे कर्करोगाने निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस खूप चांगला असेल. एखादा जुना सवंगडी भेटायला येऊ शकतो. कुटुंबात शुभ घटना घडतील. एखाद्या मोठ्या गुंतवणुकीत भागीदार होऊ शकता, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. जोडीदारासोबत एखाद्या विषयावरून आज वाद होण्याची शक्यता आहे. तथापि, संयम बाळगत वाद विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्या.

    वृषभ – आजचा दिवस अपेक्षेप्रमाणे सकारात्मक आणि फायदेशीर असेल. नेमून दिलेली सगळी कामे पूर्ण कराल. एखाद्या सहकाऱ्याकडून आर्थिक मदत मिळू शकते. जोडीदाराशी दीर्घकाळापासून असलेले मतभेद मिटतील. कायदेविषयक काम आज लवकर पूर्ण होईल. बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा, कोणी दुखावले जाणार नाही, याची दक्षता घ्या.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी काही समस्या घेऊन येऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्याच्या चुकीच्या सवयी वेळीच बदला. नोकरीच्या ठिकाणी विचारले नसताना मतप्रदर्शन करण्याचे टाळा, अन्यथा वरिष्ठांसोबत भांडणाचा प्रसंग निर्माण होईल. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर द्या.

    कर्क – आज जवळच्या व्यक्तीसोबत एखादी अनुचित घटना घडू शकते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. सहकाऱ्यांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखादा महत्त्वाचा करार हातून निसटण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक सहलीला जाण्याचे नियोजन कराल.

    सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. व्यवसायात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांसाठी परिस्थिती सामान्य राहील. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आज जोडीदार आणि मुलांसोबत फिरायला बाहेर जाऊ शकता. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी नेहमीपेक्षा चांगला असेल. पूर्वी कधी कोणाला कर्जासाठी पैसे उधार दिले असतील तर, ते आज परत मिळू शकतात, ज्यामुळे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यास मदत होईल. वाहन खरेदीच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय शुभ आहे. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमालाही उपस्थित राहू शकता.

    तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कामाच्या अतिभारामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल. मात्र सहकाऱ्यांच्या योग्य मदतीने ते हातावेगळे करू शकाल. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतो. काही काळापासून सुरू असणाऱ्या आजारपणात आज सुधारणा होईल.

    हेही वाचा – अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    वृश्चिक – आज व्यवसायात चढ-उतारांचा अनुभव येईल. जुन्या कर्जांमुळे आर्थिक ताण येऊ शकतो. आज कोणाशीही वाद घालणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपण बरं आणि आपलं काम बरं, असे वागलात तर दिवस चांगला जाईल. मालमत्तेसंबंधीची प्रकरणे सावधगिरीने हाताळा. कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.

    धनु – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा घसघशीत परतावा मिळेल. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आज एखादी नवीन भागीदारी करू शकता. मालमत्तेशी संबंधित व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात पाहुण्याचे आगमन होऊ शकते.

    मकर – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायासाठी आज आर्थिक मदतीची गरज भासू शकते. त्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांकडून मोठी साथ मिळेल. आरोग्याशी निगडित, त्यातही दातांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. मात्र, वाद सामोपचाराने सोडविणे योग्य ठरेल.

    कुंभ – आजचा दिवस खूप चांगला असेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील, प्रशासकीय क्षेत्रातील कामात मोठे यश मिळेल. तुमच्या वागणुकीमुळे प्रतिस्पर्धी देखील प्रशंसक बनतील. आज काही प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. तो नफा परत एकदा व्यवसायासाठीच गुंतवणूक म्हणून वापराल.

    मीन – आजचा दिवस धावपळीचा असेल. मात्र तुम्हाला एक विशेष ऑफर मिळेल, जी तुमच्यासाठी स्वप्नवत असेल. तुम्ही सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. एखाद्या जुन्या सवंगड्याशी भेट होईल. वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 11, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.