Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण)

Recipe : मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण)

माधवी जोशी माहुलकर

वजन मेन्टेन करण्याकरिता व्यायामासोबतच डाएटही महत्त्वाचे आहे. वेट लॅास करण्यासाठी तेल, तूप बटर न वापरता मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण) खूपच फायदेशीर ठरते. हे सूप चवीला अतिशय सुरेख आणि पौष्टिक आहे. हे कढण वाटलं तर मऊ भातासोबत खाऊ शकता किंवा वाटीने नुसते पिऊ पण शकता. चॅाईस तुमचा!

साहित्य

  • मोड आलेले मूग – अर्धी वाटी
  • लसणाच्या पाकळ्या – 4 – 5
  • हिरवी मिर्ची, आले आणि कोथिंबीर पेस्ट – 1 चमचा
  • मिरी पावडर – 1 छोटा चमचा
  • जिरेपुड – 1 चमचा
  • धणेपुड – 1 चमचा
  • हिंग – अर्धा चमचा
  • भाजलेले तीळ – 1 टेबलस्पून
  • लिंबू – अर्धे (किंवा 1 चमचा आमचुर पावडर)
  • चाट मसाला – 1 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
  • पाणी – दीड ग्लास

हेही वाचा – Recipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी

कृती

  1. मोड आलेले मूग आणि कोथिंबीरीची पाणी टाकून पेस्ट करून घ्यावी.
  2. एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात लसणाच्या चार, पाच पाकळ्यांचे तुकडे कोरडेच भाजून घेऊन बाजूला काढून ठेवावेत.
  3. नंतर त्याच भांड्यात एक मोठे ग्लास भरू पाणी टाकून त्याला उकळी आणल्यावर त्यामध्ये जिरं टाकावे.
  4. हे पाणी थोडं आणखी उकळल्यानंतर त्यात हिंग टाकून लगेच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट टाकावी.
  5. भाजलेल्या लसणाचे काही तुकडेही टाकावेत.
  6. त्याच पाण्यात मुगाची पेस्ट टाकावी. त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून पळीने ढवळून चांगले मिक्स करून घ्यावे.
  7. यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी टाकावे आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ, मिरेपुड, धनेपुड टाकुन हे कढण छान उकळून घ्यावे.

हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते!

टिप्स

  • मुगाचे सूप किंवा कढण सर्व्ह करताना त्यामध्ये वरून उरलेले भाजलेले लसणाचे तुकडे, भाजलेले तिळ, चाट मसाला आणि आमचूर पावडर (किंवा लिंबू पिळावे) टाकावे.
  • मूग पाणी लगेच शोषून घेतात, त्यामुळे पाणी आधीच थोडे जास्त घालावे.

एकूण कालावधी – साधारणपणे अर्धा तास


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि,

त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!