Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात
    फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    Team AvaantarBy Team AvaantarMay 26, 20262 Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, चटपटीत रावण भात, स्वादिष्ट डाळिंबी भात, भाताचे प्रकार, स्वादिष्ट भात, भाताचे स्वादिष्ट प्रकार, रावण भात, डाळिंब्यांचा भात, डाळिंबी भात,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रावण भातासाठी साहित्य

    • तांदूळ – दोन वाट्या
    • तीळ – पाऊण वाटी
    • चण्याची डाळ – पाव वाटी
    • मेथी – दीड चमचा
    • चिंच – लिंबाएवढी
    • लाल सुक्या मिरच्या – 4 ते 5
    • हळद – अर्धा चमचा
    • मीठ – दीड चमचा
    • आंबट ताक – अर्धी वाटी
    • उडदाची डाळ – दोन चमचे
    • गोडतेल – पाऊण वाटी
    • कढीलिंब – 8 ते 10 पाने
    • हिंग – एक चमचा
    • मेथी दाणे – अर्धा टी-स्पून

    कृती

    1. चण्याची डाळ भिजत घालावी आणि तांदूळ धुऊन घ्यावेत.
    2. तीळ भाजून, कुटून घ्यावेत आणि चिंच कोळून घ्यावी.
    3. जरा जास्त हिंग घालून आणि कढीलिंब घालून फोडणी करावी.
    4. त्यावर तांदूळ घालून परतून घ्यावेत.
    5. नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा आणि परातीत काढून घ्यावा.
    6. चण्याची भिजवलेली डाळ, तेलावर परतून घ्यावी. त्याच तेलात मेथी तांबूस रंगावर परतून घेऊन त्याची पूड करावी.
    7. त्याच तेलात उडदाची डाळ तांबूस रंगावर परतून घ्यावी.
    8. नंतर चण्याची डाळ, मेथीची पूड, उडदाची डाळ, तिळाचे कूट, मीठ आणि चिंचेचा कोळ भातात घालावा.
    9. तेलाची फोडणी करून त्यात सबंध मिरच्या टाकून काळसर होऊ द्याव्या आणि ती फोडणी भातावर घालून, भात सारखा करून घ्यावा.
    10. दह्यातील कोशिंबीर किंवा रायत्याबरोबर या भाताचा आस्वाद घ्यावा.

    हेही वाचा – Recipe : तांदळाची, गव्हल्याची अन् दुधीभोपळ्याची खीर

    डाळिंबी भाताचे साहित्य

    • तांदूळ – दोन वाट्या
    • सोललेल्या डाळिंब्या – दोन वाट्या
    • गोडा (काळा मसाला) – एक चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • गूळ – लिंबाएवढा
    • धणे पूड – दोन चमचे
    • जिरे पूड – एक चमचा
    • ओले खोबरे – पाव वाटी (किसलेले)
    • कोथिंबीर – पाव वाटी (बारीक चिरलेली
    • लाल तिखट – चवीनुसार
    • हळद – एक चमचा
    • फोडणीचे साहित्य

    हेही वाचा – Recipe :  आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात

    कृती

    1. तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि वालाच्या बिरड्या काढून घ्याव्यात.
    2. नंतर अर्धी वाटी तेलाची खमंग फोडणी करून घ्यावी आणि त्यात तांदूळ घालून जरा परतावेत.
    3. नंतर त्यात आधणाचे पाणी घालून वालाच्या डाळिंब्या घालाव्यात.
    4. भात अर्धवट शिजवून झाल्यावर त्यात गूळ, धणे व जिऱ्याची पूड, काळा मसाला, चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालावे. थोडी हळदही घालावी.
    5. भात चांगला शिजवून घ्यावा आणि ताटात वाढाताना त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून वाढावे.

    टीप

    • या भातात काळा मसाला नको असल्यास चार-पाच ओल्या मिरच्या, एक वाटी चिरलेला कांदा आणि चार-पाच लसणीच्या पाकळ्या वाटून घालाव्यात. तसेच वाटीभर नारळाचे दूध घालावे.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883

    या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    September 4, 2026 फूड काॅर्नर

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026 फूड काॅर्नर

    2 Comments

    1. विलास शहापुरे. on May 26, 2026 10:39 pm

      खूप छान वाचून तोंडाला पानी सुटलं. तुम्ही रुचिरा या पुस्तकाचा उल्लेख केलात हे पुस्तकं कुठे मिळेल. पण जर छपाई बाह्य असावी तर आपण pdf करून पाठवलं का?
      ई-मेल vmshahapure @ gmail.com.
      त्याचा जो काही खर्च तो देऊ.
      धन्यवाद.

      Reply
      • Avatar photo
        Team Avaantar on May 27, 2026 9:51 pm

        ‘रुचिरा’ची भाग १ आणि भाग २ अशी दोन पुस्तके आहेत आणि दोन्हीही बाहेर उपलब्ध आहेत.
        धन्यवाद.

        Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    By Team AvaantarSeptember 7, 2026

    नीलिमा खडतकर बेसन-काजू बर्फी साहित्य बेसन – 3 कप तूप – 2 कप दूध -…

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    September 4, 2026

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 922
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.