Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe :  अतिशय स्वादिष्ट वांगे बुरानी!

Recipe :  अतिशय स्वादिष्ट वांगे बुरानी!

माधवी जोशी माहुलकर

वांगे बुरानी हा एक विस्मृतीत चाललेला पदार्थ आहे. बुरानी हा पदार्थ बहुतेक बिर्याणी या शब्दाचा अपभ्रंश असावा. कुठून कसा काय आला माहीत नाही, परंतु वांगे बुरानी हा एक अत्यंत चविष्ट असा भाताचा प्रकार आहे. फार कमी सामानामध्ये वांगे बुरानी तयार होते. आमच्या नागपुरच्या सरहद्दीवर लागून जी राज्यं आहेत, त्या प्रांतातील खूप लोक व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने नागपुरात येऊन स्थायिक झाले आहेत. वांगे बुरानी हा पदार्थ त्याच लोकांनी आपल्या खानपानातून लोकाांपर्यंत पोहोचवला असावा. बांधकाम व्यावसायाकरिता जे मजूर बालाघाट, मध्य प्रदेश, छिंदवाडा, गोंदिया अशा प्रांतातून येतात ते भाजी आणि भात खाऊन सकाळी कामावर जातात. करायला सोपा आणि कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे. वांगे बुरानी हा नॉन-व्हेज न खाणऱ्यांकरिता तसेच मटण किंवा चिकन बिर्याणीसाठी उत्तम पर्याय असावा. इतकं वर्णन केल्यावर तर मग याची रेसिपी जाणून घ्यायलाच हवी, नाही का?

साहित्य

  • छोटी जांभळी वांगी – आठ ते दहा
  • तांदूळ – दीड वाटी
  • मसूर डाळ – दोन चमचे
  • किसलेले सुक खोबरं – दोन चमचे
  • धणे – एक टीस्पून
  • जिरे – एक टीस्पून
  • खसखस – एक टीस्पून
  • सुक्या लाल मिरच्या – दोन ते तीन
  • लसणाच्या पाकळ्या – सात ते आठ
  • आलं – अर्धा इंच
  • तेजपान – एक
  • दालचिनीचा तुकडा – एक
  • बडी विलायची – दोन
  • बिर्याणी मसाला (कुठलाही) – दोन चमचे
  • हळद – दोन चमचे
  • तिखट – दोन चमचे
  • दही – दोन चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – एक पळीभर
  • हिंग – एक चमचा
  • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
  • कढीलिंबाची पाने – सात-आठ

हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!

कृती

  1. प्रथम वांग्यांना चार काप देऊन वांगे मीठाच्या पाण्यात टाकून ठेवावी.
  2. थोड्या तेलावर मसूर डाळ, खोबरं, धणे, जिरे, खसखस, लाल मिरच्या परतून घ्यावे आणि हे थंड झाले की, याची पावडर करून घ्यावी.
  3. आलं, लसणाची पेस्ट करून घ्यावी.
  4. तांदूळ धुऊन बाजूला ठेवावे.
  5. मसूर डाळ आणि खोबरं, खसखस यांची पावडर करून दोन चमचे लाल तिखट, मीठ, दोन चमचे दही आणि एक चमचे हळद घालून सर्व पदार्थ छान मिक्स करून वांग्यांमध्ये भरावे.
  6. थोड्या तेलावर वांगी अर्धवट वाफवून घ्यावीत. एका मोठ्या पातेल्यात अर्धी पळी तेल घालून ते गरम झाले की, त्यामध्ये जिरे घालून ते तडतडले की, त्यात हिंग, तेजपान, दालचिनी टाकावी.
  7. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून आले-लसणाची पोस्ट टाकून त्यात एक चमचा हळद टाकून लगेच त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकावे.
  8. यामध्ये बिर्याणी मसाला टाकावा आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजायला ठेवावा.
  9. भात अर्धवट शिजला की, त्यामध्ये मधे मधे जागा करून वाफवलेली वांगी घालून वरून ताटली ठेवावी आणि भात मंद आचेवर शिजवून घ्यावा.
  10. ही वांग्याची बुरानी दहा मिनिटांत तयार होते. वांगे बुरानीचा भात थोडा आसट असतो.

हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!

टिप्स

  • वांगे बुरानी तयार झाली की, यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.
  • वांगे बुरानीसोबत दही बुंदी रायता, मठ्ठा किंवा ताक जेवताना घ्यावे. नाहीतर काकडी किंवा कांद्याची कोशिंबीर देखील ही वांगे बुरानी खाताना छान लागते.
  • बिर्याणी मसाला नसेल तर, घरचाच गोडा मसाला दोन चमचे वापरावेत.

तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!