नीलिमा विजय खडतकर
कापण्यासाठी साहित्य
- गव्हाचे पीठ – 1 कप
- गूळ – अर्धा कप
- तेल – तळणासाठी
- मीठ – अर्धा टीस्पूनू
- खसखस – 1 टीस्पून
- वेलची पूड – 2 टीस्पून
कृती
- गव्हाच्या पिठात एक टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून संपूर्ण पिठाला छान चोळून घ्यावे.
- त्यात अर्धा टीस्पून मीठ आणि एक टीस्पून वेलची पूड घालावी.
- गॅसवर थोड्या पाण्यात गूळ विरघळून घ्यावा, पाक करू नये. गूळाची पावडर घेतली तर लवकर विरघळेल.
- नंतर गव्हाचे पीठ त्या गूळाच्या पाण्याने भिजवून घट्ट गोळा तयार करून घ्यावा आणि हा गोळा 15 मिनिटे बाजूला झाकून ठेवावा.
- नंतर गोळा छान मळून घ्यावा आणि त्याचे तीन गोळे करावेत.
- एक गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून त्यावर खसखस लावावी. नंतर सुरीने कापण्या (शंकरपाळी) कापून घ्यावेत.
- कढईत तळणासाठी तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर कापण्या मध्यम आचेवर लालसर तळून घ्याव्यात.
हेही वाचा – Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे
कॉर्न पॅटिससाठी साहित्य
- मक्याचे दाणे – 1 कप
- बटाटे – 2 (उकडलेले)
- हिरवी मिरची- आलं पेस्ट – 1 टीस्पून
- चाट मसाला – 1 टीस्पून
- ब्रेड चुरा – अर्धा कप
- मीठ – चवीनुसार
- जीरे पूड – 1 टीस्पून
- तेल – एक पळी
कृती
- मक्याचे दाणे छान मऊ वाफवून घ्यावे आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
- उकडलेले बटाटे देखील कुस्करून घ्यावेत.
- आता वाटलेले दाणे आणि कुस्करलेले बटाटे एकत्र करून त्यात मिरची- आलं पेस्ट, चाट मसाला, जीरे पूड, मीठ घालावे.
- नंतर 1 टेबल स्पून (थोडे कमी जास्त होऊ शकते) ब्रेडचा चुरा घालून सैलसर गोळा करावा. (इथे ब्राऊन ब्रेडचा मिक्सरमध्ये चुरा करून घेतला आहे.)
- आता छोटा गोळा हातावर घेऊन,चपटे पॅटिस करून घ्यावेत.
- सर्व पॅटिस ब्रेडच्या चुऱ्यामध्ये दोन्ही बाजूने छान घोळवून घ्यावेत.
- नॉनस्टीक तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडे तेल घालून पॅटिस मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान लालसर भाजून घ्यावेत. (शॅालो फ्राय करावे).
- तयार पॅटिस टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
पुरवठा संख्या – 2 – 3 व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


