डॉक्टर सारिका जोगळेकर
होमिओपॅथीचा (Homeopathy) शोध डॉक्टर Samuel Hahnemann यांनी जर्मनीमध्ये 1796 साली लावला. होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांमधून तयार झाला आहे. ‘Homois’ म्हणजे समान आणि ‘pathos’ म्हणजे दुःख.
त्या काळातील सर्व वैद्यकीय पद्धती फार वेदनादायक आणि हानिकारक, अशा होत्या. (उदा. गरम लोखंडाचा वापर, अतिरक्तस्त्राव). Dr. Samuel Hahnemann यांचा घातक परिणाम होणाऱ्या प्रक्रियेवरील विश्वास उडाला होता. त्यांनी या पद्धतींचा विरोध केला आणि एका सौम्य उपचार पद्धतीचा शोध सुरू केला. Dr. Hahnemann यांनी सर्व वैद्यकीय ग्रंथ वाचून पाहिले, पण त्यात त्यांना समाधानकारक योग्य तत्वे दिसली नाहीत. प्रयोग करताना cinchona bark नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे त्यांना दिसली होती. परंतु हेच औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. त्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की “समान लक्षणे समान उपचाराने बरे होतात” यालाच “similia similibus curentur” (like cures like) असा सिद्धांत दिला आणि होमिओपॅथीचा शोध लागला.
Dr. Hahnemann यांच्या या सिद्धांताची सविस्तर माहिती ‘The organon of the rational art of healing’ या ग्रंथात 1810 साली प्रकाशित झाली. त्यानंतर उपचार शास्त्रातील एक नवीन प्रवास सुरू झाला. सौम्य, नैसर्गिक आणि अद्भुत अशा होमिओपथीचा.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
होमिओपॅथी ही मूलभूत तत्वांवर आधारित असलेली एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. औषधे नैसर्गिक असून ती अत्यंत सूक्ष्म प्रमाणात दिली जातात. नैसर्गिक घटक dilute (पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये) किंवा sucuss (झटके देणे) अशा दोन पद्धतीने सूक्ष्म केली जातात आणि त्या क्रियेला ‘potentization’ म्हणजेच ‘शक्तीकरण’ असं म्हणतात. या प्रक्रियेमुळे पदार्थाचे औषधी गुणधर्म वाढतात, पण त्यांचे दुष्परिणाम मात्र कमी होतात. जितक्या वेळा आपण ही प्रक्रिया करतो तितक्या पटीने त्या औषधाची शक्ती (potency) वाढत जाते. 6X, 30C, 200C, इत्यादी.
होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग (proving) करताना ते निरोगी व्यक्तींना दिले जातात आणि त्यांच्यात जी लक्षणे दिसून येतात, त्याची नोंद केली जाते. शारीरिक, मानसिक तसेच भावनिक अशा हॉलिस्टिक पातळीवर औषधांचे proving केले जाते. ती लक्षणे कशामुळे वाढतात किंवा कमी होतात (modalities) या सगळ्याची नोंद केलेल्या पुस्तकाला मटेरिया मेडिका म्हणतात. अशा असंख्य नैसर्गिक पदार्थांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास आजपर्यंत केला गेलेला आहे आणि तो पुढेही सुरूच राहणार आहे.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
होमिओपॅथी ही शिस्तबद्ध, स्थिर आणि परिणामकारक असून वर्षानुवर्ष तिने स्वतःची ओळख आणि विश्वास टिकवून ठेवलेला आहे. नैसर्गिक औषधातून केवळ आजार नाही, तर माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व बरे करणारी होमिओपॅथी – एक शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग आहे.
क्रमश:
Holistic Homoeocure Clinic
ठाणे पश्चिम