हर्षा गुप्ते
डोसा, उत्तप्पा, इडली, मेदूवडा असे साऊथ इंडियन अर्थात दाक्षिणात्य पदार्थ सर्वांच्याच आवडीचे असतात. विशेष म्हणजे, मेदूवडा वगळता इतर पदार्थांमध्ये व्हरायटी पाहायला मिळते. हे पदार्थ घराघरात बनवले जातात. तसे पाहिले तर, आजपर्यंत आपण डोश्याच्या पिठात कांदा, मिरची (काही वेळा टोमॅटो) घालून उत्तप्पा बनवत होतो. पण आज जरा हटके उत्तप्पा पाहुयात…
साहित्य
- मसूर डाळ – 1 वाटी (भिजवलेली)
- कांदा – 1 मध्यम आकाराचा
- लसूण – 5-6 पाकळ्या
- आले – अर्धा इंच
- हिरव्या मिरच्या – आवडीनुसार
- कोथिंबीर – मूठभर
- मीठ – चवीनुसार
- ओवा – 1 लहान चमचा
- जीरे पूड – 1 चमचा
- इनो – 1 पॅकेट
- टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा
- गाजर – 1 लहान
- फरसबी – 4-5 शेंगा
- भोपळी मिरची – 1 मध्यम आकाराची
- बाकीच्या भाज्यांऐवजी फक्त एक जुडी पालक वापरू शकता.
पुरवठा संख्या – 3-4 व्यक्तींसाठी
एकूण कालावधी – अर्धा तास
हेही वाचा – Recipe : अनोखी अशी भरली अळूवडी!
कृती
- मसूर डाळ, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण एक एकत्रितपणे अगदी चमचाभर पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- कांदा, टोमॅटोसह सगळ्या भाज्या किंवा पालक चॉपरद्वारे बारीक करून घ्या.
- आता ही दोन्ही मिश्रणे एकत्र करा. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून ढवळा. उत्तप्पा एवढे सरसरीत पातळ किंवा घट्ट नको.
- आता त्यात इनोचे पाकीट रिकामे करा. त्यावर अगदी तीन ते चार थेंब पाणी घालून नीट मिक्स करून घ्या.
- ओवा हातावर चोळून या सर्व मिश्रणात घाला.
- या दरम्यान मंद आचेवर तवा गरम करायला ठेवा,
- नंतर तापलेल्या तव्यावर उत्तप्पा घाला. झाकण देऊन शिजवा. दोन्ही बाजूने शेकवून घ्या.
- अमूल बटर, लोणी किंवा चटणी आणि सॉस यासोबत सर्व्ह करा.
टीप
- मसूर डाळऐवजी मूगाची पिवळी डाळ, हिरवे मूग वापरू शकता.
- डाळी किंवा कडधान्य आधीच भिजवून रात्रीच वाटून घेतलं तर त्यात इनो घालायची गरज लागत नाही.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


