सचिन देसाई
आपल्याकडे सगळं काही असतं… पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट नसेल तर जीवन व्यर्थ असतं. खरंतर, ती मौल्यवान गोष्ट असेपर्यंत आपल्याला त्याची जास्त किंमत नसते आणि जेव्हा दुरावते तेव्हा वेळ निघून गेलेली असते… आई जाऊन आता इतकी वर्षं झाली आहेत, पण असा एकही दिवस गेला नाही की, तिची आठवण झाली नाही. तिला स्मरून या काही ओळी…
इतकं लिहूनही वहीचं पान कोरं ग…
तुझ्या विना माझं आयुष्य अधुरं ग…
गेलीस तू अनंतात न मला भेटता
पडलो मी दूर इथे आज असा एकटा
नाही कोणी पुसण्यास अश्रुंचा पूर ग…
तुझ्याविना माझं आयुष्य अधुरं ग…
रोज तुझी आठवण रोज तुला साद
रोज तुझ्या दर्शनासी देवाशी वाद
ऐकू येतो का माझ्या रडण्याचा सूर ग..
तुझ्याविना माझं आयुष्य अधुरं ग…
जन्मोजन्मी हीच माय हीच एक प्रार्थना
नको अंत पाहू अन् तोडू नको या मना
देशील का आई सदा तुझाच उर ग…
तुझ्याविना माझं आयुष्य अधुरं ग…
कृपा असावी आई
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
(मनातलं)
sachingdesai0803@gmail.com