Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड
    ललित

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यAugust 28, 2026Updated:August 29, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, क्षितिज 9 प्रोजेक्ट हायजॅक, प्रोजेक्ट हायजॅकमागे माधव, शर्वायच्या लग्नासाठी माधवचा पुढाकार, शर्वायला अन्वीचे स्थळ, अन्वी आराध्याची चुलत बहीण
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 40

    त्या क्षणी व्हिलाच्या शांततेत एक निर्धार उमटलेला होता — एक संघर्ष उडण्याच्या आधीची निश्चिंती, आणि दोन मनांची एकवटलेली ताकद उद्दिपीत झाली होती.

    प्रोजेक्ट क्षितिज 9 आता केवळ एक फाइल नव्हती — ती दोघांच्या एकत्र लढाईची सुरुवात ठरली होती. शर्वायला आनंद वाटतं होता, पहिल्यांदा भेटलेली आराध्या  आणि आताची आराध्या वेगळी जाणवत होती. इथे पहिली आराध्या असती तर, आपल्या नशिबाला कोसत बसली असती, हार मानून घेतली असती. आता मात्र तिला लढताना पाहून त्याला बरं वाटलं.

    ती नुसती लढायला तयार नव्हती तर तिने कल्पकतेने, एकटीने स्वतः पुढे होऊन अगदी बारीकसारीक सगळे तपशील जाणून घेऊन ते जसेच्या तसे शर्वायसमोर मांडले होते.

    शर्वाय आणि आराध्या एकमेकांत गुंतून गंभीर बोलण्यात मग्न असतानाच व्हिलाच्या इन्टरकॉमवर हलकी बीप झाली. शर्वाय क्षणभर थांबला. तोच दत्ताचा मेसेज स्क्रीनवर झळकला —

    “सर, दिवाकर सर गेटवर पोहोचले आहेत.”

    शर्वायच्या चेहऱ्यावर काही क्षण गूढ शांतता पसरली. त्याने फोन हातात घेतला, आराध्याकडे पाहिलं, आणि एक हलकंसं स्मित करत म्हणाला —

    “बाबा आलेत… आणि यावेळी ते काहीसं ठरवूनच आले असावेत.”

    आराध्याचं मन क्षणभर गडबडलं.

    “आपण काय सांगणार त्यांना?”

    शर्वाय थोडा शांत झाला, मग म्हणाला,

    “सत्य. जे काही आपल्याला माहीत आहे, जे आपण उलगडत आहोत… ते सगळं.”

    “बाबा फक्त माझे वडील नाहीत, ते या सगळ्या माझ्या साम्राज्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विश्वासावाचून आपण पुढे जाऊ शकणार नाही.”

    तो उभा राहिला. आराध्या देखील त्याच्या मागे शांतपणे चालू लागली.

    व्हिलाच्या हॉलमध्ये आता दिवाकर उभे होते — नेहमीसारखे शांत, संयमी, पण जाणकार नजर.

    त्यांनी शर्वायकडे पाहिलं…

    “काही बोलायचं आहे का शर्वाय?”

    शर्वाय थेट त्यांच्यासमोर गेला, आणि थोड्याशा थरथरत्या आवाजात म्हणाला —

    “हो बाबा, ‘क्षितिज 9’बद्दल आणि माधवबद्दल… आता वेळ आहे सर्व उलगडण्याची.”

    हेही वाचा – आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    दिवाकर क्षणभर काहीच बोलला नाही. त्यांनी केवळ एक खोल श्वास घेतला, आणि खुर्चीत बसताना म्हटलं —

    “ठीक आहे. मग ऐकव.”

    आता एक नवा अध्याय सुरू होणार होता — जिथे केवळ संशय नव्हता, तर निर्णय, विश्वास आणि संघर्ष यांचं खरंखुरं रूप समोर उभं राहणार होतं… शर्वाय, आराध्या, आणि आता दिवाकर — या तिघांचं एक नवं युतीबंध तयार होणार होता… क्षण आता मोकळ्या संवादाचा होता, पण त्याचबरोबर सावधपणा आणि संयम सोबत असणं गरजेचं होतं.

    शर्वाय आणि आराध्या दोघंही आता पूर्ण गंभीर झाले होते. व्हिलाच्या त्या शांत, नीटनेटक्या हॉलमध्ये वातावरण जरा दाट वाटू लागलं होतं.

    दिवाकर आपला नेहमीचा सौम्य भाव चेहऱ्यावर ठेवून समोर बसले होते. त्यांची नजर शर्वायवर स्थिर होती — जणू प्रत्येक हालचालीमागे लपलेला हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.

    शर्वायने सुरुवात केली….

    “बाबा, क्षितिज 9 प्रोजेक्ट आपल्यासाठी केवळ बिझनेस नाही. तो आपल्या कंपनीच्या भवितव्याचा केंद्रबिंदू आहे. पण, काही गोष्टी बिनसलेल्या आहेत.”

    दिवाकरच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता. त्यांनी केवळ हलकेच मान डोलावली.

    आराध्या पुढे आली आणि म्हणाली,

    “प्रोजेक्टचे काही इन्टर्नल डॉक्युमेंट्स माधवच्या लॉगिनमधून बाहेर गेले आहेत आणि ती माहिती बाहेर एका प्रतिस्पर्धी कंपनीकडे पोहोचलीय. आम्ही अजून पुरावे मिळवत आहोत… पण यात मोठं नुकसान होऊ शकतं.”

    शर्वायने आणखी स्पष्ट करताना सांगितले —

    “मी मुद्दाम काही गोष्टी माधवपासून लपवल्या, आणि त्याला विचित्र सिग्नल्स दिले… आणि खरं सांगतो, माझा अंदाज खरा ठरला. काही सिस्टीम ट्रॅसेस, काही बाह्य नेटवर्क ट्रॅफिक… आणि आतून मिळालेली गुप्त माहिती — हे सगळं एकत्र केलंय.”

    दिवाकर काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी संथ स्वरात विचारलं —

    “तुम्हाला खात्री आहे का, की यात केवळ माधवच सामील आहे?”

    आराध्याने लगेच उत्तर दिलं —

    “सध्या पुरावा त्याच दिशेने जातोय. पण… आम्ही कोणावरही पूर्ण शिक्कामोर्तब केलं नाही. कारण हे फक्त बिझनेसचं प्रकरण नाही… इथं नात्यांची गुंतागुंत आहे.”

    शर्वायने हे वाक्य ऐकल्यावर थोडं शांतपणे डोळे मिटले.

    दिवाकर थोडं पुढे झुकले, दोघांकडे बघत म्हणाले —

    “खूप दिवसांनंतर मला जाणवतंय की, शर्वाय फक्त एक CEO नाही, तर एक लढवय्या झाला आहे आणि आराध्या… तुझं हे धाडस, ही निष्ठा — आमच्या कंपनीचं खरं बळ बनू शकतं.”

    मग त्यांनी दोघांच्याही हातावर हात ठेवला.

    “हे युद्ध आहे. पण सुज्ञपणे खेळायचं. पुरावा हवा, नीटनेटकी योजना हवी, आणि योग्य वेळी योग्य घाव! मी तुमच्यासोबत आहे — पण अजून कुणालाही काहीही कळता कामा नये.”

    शर्वाय आणि आराध्या एकमेकांकडे पाहतात — दोघांच्याही डोळ्यांत आता एकच ठाम भावना असते — विश्वास.

    आता ही केवळ लढाई नव्हती — हे एक युद्ध होतं, जिथे आपल्या माणसांपासूनच धोका होता… आणि हे युद्ध जिंकण्यासाठी प्रेम, संयम आणि बुद्धीचं भांडार पुन्हा उघडायला लागणार होतं.

    पडद्याआड सुरू झालेल्या या रणनीतीनं, क्षितिज 9चं भविष्य बदलणार होतं… आणि त्याचसह, अनेक मुखवटे उघड होणार होते.

    सर्व ऐकून झाल्यावर दिवाकर म्हणाले, “कालच घरी माधव आला होता. शर्वाय तुझ्यासाठी त्याने अन्वीचं स्थळं सुचवलं. मी तर एकदम शॉक झालो. पण माधव आनंदीला घोळात घेतोय…”

    ‘अन्वी’ नाव ऐकून  आराध्याच्या हातातला ग्लास निसटला. जमिनीवर आदळताच चांगलाच आवाज झाला. बराच वेळ बोलत असल्याने तिचा घसा कोरडा पडला होता म्हणून पाणी पीत होती… पाणी पिता पिता पुन्हा घशाला कोरड पडेल असं काही ऐकू गेलं होतं…

    ग्लास फुटण्याचा खळकन आवाज झाल्याने शर्वाय आणि दिवाकर यांचं लक्ष वेधलं… शर्वाय पाहतच राहिला,  कारण आराध्या एका जागी स्तब्ध उभी होती…

    काही क्षणापूर्वी बाबा काय बोलून गेले आणि त्याचा आराध्यावर काय परिणाम झालाय, तो ते पाहात होता… “काय वाटलं असेल तिला?” एक क्षण त्याला वाटून गेलं.

    हेही वाचा – माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    क्षणाचाही विलंब न करता तो जणू पळतच तिच्याजवळ गेला, कारण तिने पाऊल पुढे टाकले असते तर पायात काचा गेल्या असत्या…

    “दिनू काकाss या काचा उचलून घ्या जरा…” म्हणत त्याने आराध्याला बाजूला घेतलं… तिला पुन्हा सोफ्यावर बसवत तो आपल्या बाबांकडे पाहात म्हणाला…

    “बाबा ही अन्वी आराध्याची चुलत बहीण… ती आणि हिची आई माधवसोबत मिळून आराध्याच्या विरोधात सतत कटकारस्थान करत असतात.”

    “आराध्या बाळा, माधवने असं स्थळं सुचवलं आहे, अस म्हणालो… मी शर्वायचं लग्न नाही लावलं. खरंतर, आईने ऐकताच विरोध केलाच… तू शांत हो… आपण बोलू यावर…” म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

    आराध्या शांत राहिली. ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली — शर्वायच्या डोळ्यांतील तडफड आणि आतली अस्वस्थता तिला स्पष्ट जाणवत होती.

    शर्वायने डोळे मिटले. मनात विचारांची गर्दी झाली होती.

    “माझ्यासाठी काय योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार माधवला कुणी दिला?” त्याचा आवाज आता थोडा कडवट होता.

    दिवाकर हलकेसे हसले…

    “म्हणूनच हे मी तुला सांगितलं — निर्णय तुझाच. पण या गोष्टीमागे काय विचारधारा आहे, हे समजणं तितकंच गरजेचं आहे. माधव काय खेळी खेळतोय, याचा थांग लागणं सुरू झालंय.”

    आराध्या शांतपणे उठून उभी राहिली. ती समोरच्या खिडकीजवळ गेली. मनात नवनवीन गुंतागुंतीचं काहूर होतं…

    शर्वाय तिच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला,

    “माझ्या आयुष्यात जर कोणाला मी माझ्या  पत्नीचा दर्जा  देईन, तर ती फक्त एकच व्यक्ती आहे — आणि ती माझ्या समोर उभी आहे.”

    दिवाकर त्या दोघांसमोर आले… दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले,

    “तुमचा पुढचा काळ युद्धाचा आहे. या रणभूमीवर दोघांनी एकमेकांच्या साथीने लढायचं आहे. एकमेकांच्या वरचा विश्वास कधी कुठे डळमळला,  तर सावरून घ्यायचं आणि पुढे जात रहायचं आहे…”

    त्यांनी  त्या दोघांसमोर एक योजना  मांडली…

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026 ललित

    दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र

    August 27, 2026 ललित

    राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?

    August 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    By हेमा पाटीलAugust 29, 2026

    भाग – 10 “मामी, एकदम भारी झालीय भेळ. थोडी आणखी द्या.” “नको, जास्त खाल्ली तर…

    दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र

    August 27, 2026

    राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 412
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 555
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 882
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमानं ऐकली वंदनाची व्यथा

    August 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑगस्ट 2026

    August 29, 2026

    शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड

    August 28, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.