Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं लक्ष्याहूनि अनारिसे, बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें

    November 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 नोव्हेंबर 2026

    November 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, November 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कडवटपणा पलीकडचे प्रेम
    ललित

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीNovember 28, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, आजी आजोबा, रागीट आजोबा, साधी आजी, आजी नात, वडील मुलगी, सुग्रण आजी
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “औषधाची गोळी नुसती ठेवली आहेस. कशी घ्यायची? पाणी कोण देणार?”

    आजोबा नेहमीसारखे बायकोच्या अंगावर खेकसले.

    “हो देते हं! मीनलशी बोलत होते…”

    “लेक आणि नात आल्यापासून दोन दिवस तुझं कशात लक्ष नाही.”

    “अहो तसं नाही. हे घ्या पाणी…”

    आजोबांचा आवाज ऐकून मीनल खोलीतून बाहेर आली. म्हणाली, “आजोबा तिथे टेबलावर जग आहे, तुम्ही उठून पाणी घ्यायचं ना! आजीची खूप मोठी चूक झाल्यासारखे ओरडताय काय तिच्यावर? आम्ही दोघी बोलत बसलो होतो.”

    अनपेक्षितपणे नातीचे हे बोलणे ऐकून आजींनी सारवासारव केली… “तसं नाही गं… खरंच, मी पाणी द्यायला विसरले.”

    “आजी, तू कशाला त्यांची बाजू घेते आहेस? तू असं मिळमिळीत वागतेस म्हणून तुला ते वाटेल तसं बोलतात.”

    मीनलचं बोलणं ऐकून आई रागाने म्हणाली,

    “मीनल काय बोलते आहेस? तुझे आजोबा आहेत ते, याचं भान आहे ना?”

    “आई गेली अनेक वर्षे मी आजोबांना बघते आहे. ते नेहमी आजीशी असंच बोलतात. तिचे बॉस असल्यासारखे वागतात. आज मात्र माझं डोकं सटकलं… साधं पाणी त्यांना हाताने घेता येत नाही का?”

    हेही वाचा – आठवणींची पेटी… निसर्ग अनुभवणं!

    आई हळू आवाजात म्हणाली, “अगं तुला माहीत आहे ना, त्यांचा स्वभाव जरा रागीट आहे.”

    “जरा रागीट? आजोबांच्या असल्या वागण्याचं जस्टिफिकेशन काय देते आहेस? चूक ती चूकच आहे.”

    आजी म्हणाली, “असू दे… जाऊ दे… मला काही वाटत नाही. स्वभावाला औषध नसतं.”

    “हेच, हेच चुकतं तुमचं. स्वभावाला औषध आहे… तुम्ही त्यांना खूप आधीच एखाद्या सायकॅट्रिस्टकडे न्यायला हवं होतं.”

    “म्हणजे, मला काय वेड लागलं आहे का काय?”

    आजोबा तिच्यावरही ओरडले.

    “थांबा आजोबा. इतके दिवस मी बोलले नाही, पण आज विषय निघाला आहे तर मी जरा स्पष्ट बोलणार आहे.”

    “अगं मीनल…”

    “थांब आई, अडवू नकोस, मला बोलू दे… आजोबा इतके का चिडतात? त्यांना सारखा राग का येतो?  हे एखाद्या स्पेशालिस्टला विचारलं असतं, तर त्यांनी त्यांचं कौन्सलिंग केलं असतं… मेडिसिन दिलं असतं… ट्रीटमेंट केली असती.”

    आई घाईत म्हणाली, “जाऊ दे, वय झालंय त्यांचं.”

    “जाऊच देते आहे. पण आई ते आजीला कसं वागवतात, तू बघतेस ना? कधीतरी मला त्यांना याची जाणीव करून द्यायची होती. सगळ्यांसमोर तिचा अपमान करतात… तिला काय वाटत असेल, याचा त्यांनी कधी विचार केला नाही. आजी कसली ब्रिलियंट आहे. स्वयंपाक मस्त करते. तिने पापड, लोणची करून जरी विकली असती, तरी तिचा बिझनेस जोरात चालला असता. तिच्यातलं टॅलेंट कोणाला कळलंच नाही. आय लव यू आजी!” असं म्हणून मीनल आजीला बिलगली.

    विषय बदलायला हवा म्हणून आई घाईत म्हणाली,

    “जेवायला मुगाची खिचडी, कढी करते… मीनल तू आणि आजी गणपतीचे दर्शन घेऊन या.”

    हेही वाचा – आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    बाबा आत गेले होते.

    0000

    खिचडी करताना आईच्या मनात आलं… ही पुढची पिढी आतताई… शॉर्ट टेम्पर आहे असं वाटतं, पण ते मनातले विचार न घाबरता बोलू शकतात. त्यांची विचार करायची पद्धत पारंपरिक नाही. तसंच, प्रसंगानुरूप त्यावर ते सोल्युशन पण देतात. निदान आजच्या प्रसंगापुरतं तरी मीनलच बोलणं आईला आवडलं होतं.

    आपण इतकी वर्षं कळत असूनही जे बोलू शकलो, नाही ते ती बोलली. पण, आपण उद्या निघून गेल्यानंतर बाबा आईला काय बोलतील… किती रागवतील, याचीही तिला चिंता वाटायला लागली.

    0000

    आजोबा आरामखुर्चीत बसले होते. आज प्रथमच त्यांना कोणीतरी असं सुनावलं होतं. प्रचंड संताप आला होता… आपण बोललो तर, शब्दाने शब्द वाढेल म्हणून ते गप्प बसले होते. पण खोलवर आत कुठेतरी काहीतरी आज हललं होतं…

    तरी पण ते मनाशी कबूल करायलासुद्धा त्यांना नको वाटत होतं… नातीच सडेतोड, रोखठोक बोलणं त्यांना विचार करायला लावत होतं, एवढं मात्र खरं!

    0000

    देवळाच्या पायरीवर नातीचा हात हातात घेऊन आजी म्हणत होती, “कामाचं काही वाटत नाही गं… त्यांना राग येऊ नये, याची मी काळजी घेत असते. पण कधीतरी होते चूक. त्यासाठी चारचौघात असं त्यांचं ओरडणं मला अपमानास्पद वाटतं. कोणीतरी त्यांना हे समजून सांगावं, असं मला वाटत होतं. इतक्या वर्षांत प्रथमच माझं मन तू जाणून घेतलंस…”

    मीनलनी आजीचा हात हातात घेतला.म्हणाली,

    “खूप आधीच मला त्यांना हे सांगायचं होतं. पण माझी हिंमत होत नव्हती. आज मात्र मी कंट्रोल करू शकले नाही. पण त्यांच्यावर रागावून त्यांना हे मला सांगायचं नव्हतं…. नीट समजावून सांगायचं होतं…. माझं जरा चुकलंच.”

    रात्री न बोलता जेवण झाली.

    आजोबांना काही केल्या झोप येईना. अनेक गोष्टी त्यांना आठवायला लागल्या. खूप वेळानंतर त्यांच्या  मनातला संताप कमी कमी होत गेला. नातीच्या बोलण्यावर ते विचार करायला लागले… हळूहळू त्यांचे मन थाऱ्यावर आले.

    दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मीनलनी आजोबांना वाकून नमस्कार केला. त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली,

    “सॉरी आजोबा, मी तुम्हाला इतकं बोलायला नको होतं…” असं म्हणून ती रडायला लागली. आजोबांनी तिला जवळ घेतले. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. लेकही बाबांच्याजवळ जाऊन उभी राहिली.

    आजोबांनी नातीचा हात हातात घेऊन हळूच दाबला… आश्वासन दिल्यासारखा… त्यातून त्यांनी प्रत्यक्ष न बोललेले, पण तिच्या मनापर्यंत पोहोचले शब्द होते…

    रडता रडता मीनल त्यांच्याकडे बघून मनापासून हसली… समजल्यासारखी…

    मायेच्या धाग्यांनी ते चौघंही आज अजून जवळ आले होते….

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    धोका चेहरा बदलून येतोय!

    November 27, 2026 ललित

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026 ललित

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    धोका चेहरा बदलून येतोय!

    By प्रणाली वैद्यNovember 27, 2026

    भाग – 53 शर्वाय पुढे आला, आणि हलकेच तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला — “माफ…

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं लक्ष्याहूनि अनारिसे, बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें

    November 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 नोव्हेंबर 2026

    November 28, 2026

    धोका चेहरा बदलून येतोय!

    November 27, 2026

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    Recipe : आजचा मेन्यू सामोसे!

    November 27, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं लक्ष्याहूनि अनारिसे, बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें

    November 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 नोव्हेंबर 2026

    November 28, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.