डॉ. सारिका जोगळेकर
होमिओपॅथिक तज्ज्ञ
मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भधारणेसाठी दर महिन्याला एक नवीन थर तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर रक्तासह शरीराबाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दर 28 दिवसांनी (कधी 21 ते 35 दिवसांत) नियमितपणे घडते. यालाच मासिक पाळी किंवा मासिक ऋतू म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे वयाच्या 12-13 वर्षांपासून सुरू होते (Menarche) आणि 45-50 वर्षांपर्यंत (रजोनिवृत्ती येईपर्यंत – Menopause) चालते.
मासिक पाळीची सायकल ही हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन मुख्य हार्मोन्स मासिक पाळी नियमित ठेवण्याचे काम करते. प्रत्येक महिन्यात होणारा हा शारीरिक बदल नैसर्गिक असला तरीही बऱ्याच स्त्रियांना त्या काळात विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. या तक्रारी किरकोळ समजून दुर्लक्ष केले जाते आणि जेव्हा या तक्रारीमुळे आपल्या कामावर किंवा दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो, तेव्हा त्यावर उपचार घेण्याची गरज स्त्रीला भासते.
सामान्य तक्रारी
- पोटदुखी (Dysmenorrhea) – पाळीपूर्वी किंवा पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे.
- डोकेदुखी, थकवा आणि अंगदुखी – रक्तस्त्रावामुळे कमजोरी आणि थकवा जाणवतो. पायात गोळे येतात.
- मूड स्विंग (PMS – Premenstrual Syndrome) – चिडचिड, नैराश्य, राग किंवा भावनिक अस्थिरता, एकटेपणा, रडायला येणे, चविष्ट खाण्याची तीव्र इच्छा होते (craving). रात्रीची झोप न लागणे किंवा दिवसासुद्धा जास्त प्रमाणात झोप येणे, खूप भूक किंवा खायची इच्छा नसणे.
- अनियमित पाळी (Irregular Periods) – वेळेवर पाळी न येणे किंवा खूप जास्त/कमी रक्तस्राव होणे.
- जास्त रक्तस्राव (Menorrhagia) – दीर्घकाळ किंवा अतिप्रमाणात होणारा रक्तस्राव.
- जास्ती रक्तस्रावासोबत पोटात खूप दुखणे. (metorrhagia)
- मळमळ, उलटी, जुलाब – काही स्त्रियांना पाळीच्या काळात पचनासंबंधी तक्रारी जाणवतात.
हेही वाचा – Homeopathy : शरीर आणि मन जुळले, तरच आरोग्य फुलले…
मासिक पाळीच्या तक्रारी का होतात?
- गर्भाशय आणि हार्मोन्स संबंधित कारणे : हार्मोन्सचे असंतुलन, हायपोथायरॉइड (थायरॉइड नावाची एक ग्रंथी असते त्याचे हार्मोन्स वाढतात). गर्भाशयाला सूज येणे (endometriosis), पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम – PCOD, फायब्रॉइड (गर्भाशयामध्ये गाठी निर्माण होतात).
- पोषणातील कमतरता : रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजेच लोह कमी असणे (anemia). कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D B12, फॉलिक ऍसिड, इत्यादीची कमतरता.
- मानसिक कारणे : मानसिक ताण तणाव, चिंता, नैराश्य, भीती यापैकी कुठल्याही कारणाचा थेट मासिक पाळीवरती परिणाम होतो.
- जीवनशैलीतील बदल : जागरणे, चुकीचा आहार, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींची कमतरता.
- अनुवंशिकता
मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होमिओपॅथी कशी परिणामकारक ठरते?
होमिओपॅथीचा मूलभूत दृष्टिकोन असा आहे की, शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहे. शरीर हा मनाचा आरसा आहे. मनातले विचार शरीर आपल्याला विविध लक्षणांमधून दाखवते. मासिक पाळीच्या तक्रारी एखाद्या महामारीसारख्या वाढत आहेत. गेल्या वीस वर्षांत हार्मोन्सचे असंतुलन आणि वंध्यत्वाच्या केसेसचा आलेख वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. याचे कारण काय असू शकते?
“पूर्वी लग्न करण्याचे सामान्य वय 23 ते 25 दरम्यान असायचे. पण आता मुलींना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात स्थिर व्हायचे आहे, काहीतरी साध्य करायचे आहे, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायचे आहे आणि लग्न हा त्यांचा शेवटचा प्राधान्यक्रम झाला आहे. एका दृष्टीने बघायला गेलं तर, हे सगळं अगदी बरोबर आहे आणि खूप सकारात्मक आहे; पण कुठलीही गोष्ट अति ताणली की, ती तुटते. महत्त्वाकांक्षेलाही एक मर्यादा असली पाहिजे. ‘स्त्रीच्या प्रजनन संस्थेची जैविक रचना बदलणार नाही.’
हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग
हल्ली स्त्रिया सर्रास ही वाक्य म्हणताना ऐकू येतात – “मी मुलापेक्षा कमी नाही”, “मी काहीतरी साध्य केल्याशिवाय मला लग्न नाही करायचं”, “मला सध्या तरी मूल नकोय”, “कशाचीच घाई नको…” या वाक्यातील ‘नको’ आणि ‘नाही’मुळे स्त्री-हार्मोन्समध्ये विभाजन होते आणि स्त्री-हार्मोन्सचे स्रवण मंदावते. आपल्या विचारांचा आपल्या शरीरावरती थेट परिणाम होतो. मुलीला लग्न आणि मूल नको असते आणि मग शरीराला ते नको असते. एखादी मुलगी जितकी तिच्या मासिक पाळीचा तिटकारा करते, तितकी ती मासिक पाळीच्या तक्रारीने त्रस्त होण्याची शक्यता वाढते. अप्रत्यक्षपणे ती तिच्या स्त्रीत्वाला नाकारते त्यामुळे. मुलीला तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी (menarche) पाळीला सहजपणे स्वीकारायला शिकवणे आवश्यक आहे.
होमिओपॅथिक औषधं देताना या सर्व विचारांचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्या विचारांची सुरुवात का आणि कशी झाली, हे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळे असते. त्या स्त्रीचा स्वभाव आणि भावनांचे विभाजन, तिची जीवनशैली, अनुवंशिकता हे सगळं लक्षात घेऊन औषध दिली जातात. होमिओपॅथीमध्ये नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याची क्षमता असते. मेंटल ब्लॉक निघून गेला की, स्त्रीच्या शरीरात हार्मोन्स संतुलित प्रमाणात तयार होऊ लागतात आणि मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. होमिओपॅथी हे नैसर्गिक असून ते सूक्ष्म प्रमाणात दिले जाते, त्यामुळे त्याचे कुठलेही साइड इफेक्ट्स नाहीत… त्या औषधांमध्ये हार्मोन्स नाहीत. होमिओपॅथी हे स्त्रीसाठी एक वरदान आहे. होमिओपॅथी मासिक पाळीचे चक्र नियमित करते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत करते. दृष्टिकोन बदलला की शरीर आणि मन यांच्यातील सुसंवाद स्थिरावतो. सोबतच हार्मोन्स सुद्धा स्थिरावतात.
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941
Insta – https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr
FB – https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr


