Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : अशी बनवा सुतरफेणी!

    November 25, 2026

    घराची वास्तुरचना आणि हृदयाचे आरोग्य

    November 25, 2026

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, November 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : अशी बनवा सुतरफेणी!
    फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा सुतरफेणी!

    MANOJ JOSHIBy MANOJ JOSHINovember 25, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, गोड पदार्थ, सुतरफेणी, सुतरफेण्या, सुतरफेणीची रेसिपी, सुतरफेण्यांची रेसिपी, sweet sutarfeni
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साहित्य

    • मैदा – दोन वाट्या
    • तूप – दोन वाट्या
    • मीठ – अर्धा चमचा
    • साखर – दोन वाट्या
    • काजू आणि बदामाचे बारीक काप – अर्धी वाटी

    कृती

    1. मैदा पाण्यात घट्ट भिजवून दोन-तीन तास ठेवावा. नंतर पाणी लावून, कुटून, त्याला चांगली तार आणावी.
    2. दोन वाट्या मैद्यास अर्धा चमचा मीठ घेऊन, मीठ चमचाभर पाण्यात विरघळल्यावर ते पाणी मैद्याला लावून मैदा पुन्हा चांगला कुटावा.
    3. नंतर त्याचे दहा ते बारा गोळे करून ठेवावेत.
    4. तूप परातीत घालून चांगले फेसावे. प्रत्येक गोळ्याला फेसलेले तूप लावून तो थोडा लांबवून ठेवावा. याप्रमाणे बाकीचे सर्व गोळे करावेत.
    5. पुन्हा पहिला गोळा घेऊन, तुपाचा हात लावून, तो आणखी लांबवावा. याप्रमाणे ज्या क्रमाने पहिल्यापासून गोळे घेतले असतील, त्या क्रमाने तुपाचा हात लावून, सर्व गोळे लांबवून घ्यावेत.
    6. याप्रमाणे सर्व गोळ्यांना चार-पाच वेळा तुपाचा हात लावून गोळे जास्त जास्त लांबवून घ्यावेत.
    7. गोळे लांबवत-लांबवत त्यांची जाडी सुताइतकी बारीक झाली, म्हणजे हाताच्या चार बोटांवर धागा गुंडाळावा. गुंडाळताना मधून मधून फेसलेले तूप सर्व बाजूंनी लावावे.
    8. गुंडाळून झाल्यावर बोटांवरून, गुंडाळी हलकेच काढून फेसलेल्या तुपात बुडवून घेऊन बाजूला ठेवावी. याप्रमाणे सर्व गोळ्यांच्या फेण्या तयार करून घ्याव्या.
    9. नंतर तूप गरम करावयास ठेवावे. तूप मंद तापल्यावर पहिली फेणी हातात घेऊन थोडी लांबवून तुपात सोडावी आणि विणावयाच्या सुईने फेणीची सुते विरळ विरळ करून ती फेणी तुपात पसरेल, असे करावे.
    10. फेणी मंद विस्तवावर तळावी आणि बाहेर काढून ठेवावी. याप्रमाणे सर्व फेण्या तयार कराव्या.
    11. साखरेचा कच्चा पाक करून त्यात फेण्या बुडवून काढाव्या आणि नंतर त्यांच्यावर बदाम आणि पिस्ते यांचे काप घालावेत.

    हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    टीप्स

    • सुतरफेण्या तयार झाल्यावर हवे असल्यास गुलाबाचे पाणीही शिंपडावे.
    • सुतरफेण्या रंगीत करावयाच्या असल्यास केशर अगर जो रंग लावयाचा असेल, तो मैदा भिजवतानाच घालावा.
    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)

    हेही वाचा – Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H

    या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.

    MANOJ JOSHI

    Related Posts

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    November 23, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026 फूड काॅर्नर

    Recipe: पारंपरिक आणि पौष्टिक कोरीॲन्डर पोंगल

    November 13, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    By Team AvaantarNovember 23, 2026

    घावन बनविण्यासाठी साहित्य काकडीचा कीस – दोन वाट्या कणीक – तीन वाट्या तांदळाचे पीठ -…

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    Recipe: पारंपरिक आणि पौष्टिक कोरीॲन्डर पोंगल

    November 13, 2026

    Recipe : स्वादिष्ट पडवळाची आमटी आणि दोडके भात…

    November 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : अशी बनवा सुतरफेणी!

    November 25, 2026

    घराची वास्तुरचना आणि हृदयाचे आरोग्य

    November 25, 2026

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : अशी बनवा सुतरफेणी!

    November 25, 2026

    घराची वास्तुरचना आणि हृदयाचे आरोग्य

    November 25, 2026

    आयुष्य… एक वाहता प्रवाह!

    November 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.