Friday, February 27, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी

Recipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी

ओल्या हरभऱ्याची पोळी

साहित्य

  • सोललेले ओले हिरवेगार हरभरे – दोन वाट्या
  • हिरव्या मिरच्या – सात- आठ
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर
  • आल्याचा तुकडा – एक इंच
  • जिरे – एक चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – दोन चमचे
  • कणीक – दोन वाट्या
  • तेल – पाव वाटी
  • तांदळाची पिठी – एक टेबलस्पून
  • खायचा सोडा – चिमूटभर

कृती

  1. पाण्याला उकळी आणून त्यात हरभरे शिजावयास टाकावे. त्यातच थोडेसे मीठ आणि चिमूटभर सोडा घालावा. सोड्यामुळे रंग हिरवा राहतो.
  2. हरभरे चांगले शिजल्यावर चाळणीत टाकून पाणी काढून टाकावे.
  3. ते हरभरे पाट्यावर चांगले वाटून घ्यावे अथवा मिक्सरमधून भरडसर वाटून घ्यावे.
  4. त्यात मीठ, मिरच्या, आले आणि जिरे वाटून घालावे.
  5. कणकेत तेल आणि मीठ तसेच एक टेबल स्पून तांदळाची पिठी घालून, सैलसर भिजवावे आणि तेल लावून, मळून घ्यावे.
  6. लहानशा लिंबाएवढा कणकेचा गोळा घेऊन, त्यात त्याच्या दीडपट हरभऱ्याचा वाटलेला गोळा भरावा आणि पोळी लाटावी.
  7. पोळी तव्यावर परतताना थोडे तेल टाकून खमंग भाजावी.
  8. या पोळ्या साधारण फुलक्याच्या आकाराच्या आणि जाडसर कराव्या.

टिप

  • याच पद्धतीने मटारच्या पोळ्याही करता येतात.

हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…


मुळ्याची पोळी

साहित्य

  • मुळ्याचा किस – दोन वाट्या
  • चण्याच्या डाळीचे पीठ – अर्धी वाटी
  • हिरवी मिरची – ४ -५
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – मूठभर चिरलेली
  • साखर – चवीनुसार
  • कणीक – दोन वाट्या
  • तेल – पाव वाटी
  • तांदळाची पिठी – एक टेबलस्पून
  • जिरे –  एक टीस्पून

हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो

कृती

  1. किसलेला मुळा चांगला धुऊन घ्यावा.
  2. नंतर तेलावर चांगला वाफवून, त्यामध्ये मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे हे सर्व जिन्नस वाटून घालावेत आणि चवीपुरती साखर घालावी.
  3. त्यात अर्धी वाटी चणाडाळीचे पीठ घालावे आणि सर्व एकत्र मळून, त्याचा गोळा करावा.
  4. नंतर त्याचे बारीक गोळे करून पोळी लाटावी.
  5. पोळी तव्यावर परतताना थोडे तेल टाकून खमंग भाजावी.
  6. या पोळ्या साधारण फुलक्याच्या आकाराच्या आणि जाडसर कराव्यात.

टिप

  • याच पद्धतीने कोबी, गाजर, फ्लॉवर या भाज्यांच्याही पोळ्या होतात.

(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!