Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गणपती तू गुणपती तू…
    अवांतर

    गणपती तू गुणपती तू…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 31, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, गणपती, गणेशोत्सव, गणेशरुपे, गणेशभक्ती, गणेशमहिमा, Ganesha, Ganeshotsav, Ganesh devotion, Ganesh glory
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    गणेशोत्सवामुळे सर्वत्र वातावरण भारलेलं आहं. तसं पाहिलं तर, यात नवीन काहीच नाही. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, उत्तम पुत्र, आद्यदेवता, उत्तम लेखनिक, उत्तम योद्धा, उत्तम संघटक, विघ्नहर्ता, मंगलदाता, मुत्सद्दी असे विविध गुण अंगी असणाऱ्या गणेशाचे वाजत-गाजत जंगी स्वागत केले जाते. त्याची यशाशक्ती, मनोभावे पूजा केली जाते. बाप्पासमोर हात जोडून उभे राहून त्याची सुंदर मूर्ती डोळ्यांत आणि मनात साठवण्याचा भक्त प्रयत्न करतो.

    खरंतर, इतर सर्वच देवांपेक्षा गणपतीचे रूप काहीसे वेगळे आहे. इतरांप्रमाणे तो मोहक, सुकुमार असा नक्कीच नाही. उलट लंबोदर, मोठ्या कानांचा, बारीक डोळ्यांचा असणारा हा गणेश म्हणूनच इतर देवांपेक्षा वेगळा दिसतो. हा एकमेव असा देव आहे, जो कोणत्याही रूपात अत्यंत मोहक आणि आकर्षक वाटतो. मग ते बालगणेशाचं रूप असो किंवा सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती असोत. चित्रकला, शिल्पकला, मूर्तीकला यातूनही दिसून येणारं बाप्पाचं रूप मनाला भुरळ घालणारं असतं. बाळांनाही गणेशाचं रूप लगेच ओळखू येतं आणि त्यांचे हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात, ते त्याच्या असणाऱ्या रूपाच्या वेगळेपणामुळेच.

    मुलांच्या अभ्यासाची सुरुवात होते, ती पूर्वी पाटीवर आणि आता वहीत ॐ लिहूनच. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊलींनीही ॐकार स्वरूप गजाननालाच वंदन केलं आहे. ज्ञानी लोकांच्या मते गजानन हे ॐकाराचं व्यक्त, मूर्त रूप आहे.  गणांचा अधिपती तो गणपती. म्हणजेच गणपती हा समूहाचं नेतृत्व करणारी देवता आहे. ‘गण’ म्हणजे अष्टवसूंचा समूह. वसू म्हणजे दिशा. याचाच अर्थ गणपती हा आठ दिशांचा पती आहे.

    रामदास स्वामी यांनीही मनाच्या श्लोकाची सुरुवात ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ अशी केली आहे. म्हणजे, जगातील सर्व चांगले गुण, चांगल्या गोष्टी त्याच्या ठायी एकवटल्या आहेत. गणपतीच्या ठायी असणाऱ्या याच गुणांमुळे त्याला ‘गुणेश’ या नावानेही संबोधले जाते. गणपती हा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असल्यामुळे, प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. शुभकार्यारंभी पूजनाच्या वेळी गणपतीची मूर्तीच असावी, असे नाही. तांदूळ, सातू किंवा गहू यांच्यावर सुपारी किंवा नारळ ठेऊन; त्यावर गणपतीचे आवाहन करून पूजा केली जाते.

    गजानन म्हणजे ‘गजाचे तोंड’ असणारा. यातील ‘गज’ या शब्दातील अक्षरे उलट वाचली तर त्याचा अर्थ होतो ‘जग’. जग हे ज्याचं प्रकट रूप आहे (आनन) तो गजानन असाही एक अर्थ त्यामागे आहे. याशिवाय, लांब, लवचिक, बहुपयोगी असणारी सोंड, महाकाय शरीर, सुपासारखे कान, बारीक डोळे, सुळे, गंडस्थळ या सगळ्यामुळे हत्ती इतर प्राण्यांमध्ये उठून दिसतो. तसेच, त्याची बुद्धीमत्ता आणि प्रचंड ताकद याचंही माणसाला आदीम काळापासून आकर्षण वाटत आलं आहे. या गुणवैशिष्ट्यांमुळेच कदाचित हत्तीच्या मुखाची निवड गणपतीला मूर्त रूप देताना करण्यात आली असावी.

    हेही वाचा – संवादाची भाषा झाली ‘ॲडव्हान्स’

    विशाल कान सूक्ष्मातील सूक्ष्म आवाज ग्रहण करू शकतात, बारीक डोळ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करणे सोपे असते. या दोन्ही गोष्टी ज्ञानार्जनासाठी किती महत्वाच्या असतात ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचं विशाल गंडस्थळ हे अन्यायाविरुद्ध केल्या जाणाऱ्या प्रतिकाराचं (जोरदार बसणारी धडक) आणि बुद्धिमत्ता दर्शवणारी आहे. तर, सोंड ही बहुपयोगी आणि अतिशय संवेदनशील आहे. तिच्याच मदतीने हत्ती आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत असतो, तिचा आढावा घेत असतो.  म्हणजेच, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सगळे गुण गजमुखात एकवटलेले आहेत. इथे विद्यार्थी असा उल्लेख केला आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण आपण आयुष्यभर विविध प्रसंगांमधून शिकतच तर असतो! समोरच्या परिस्थितीचा अंदाज घेत, त्यावर काय प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद द्यायचा हे ठरवत असतो. यातूनच तर आपण वैयक्तिक प्रगती करत असतो. त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे गणपती, गजानन.

    त्याचंच आणखी एक नाव म्हणजे लंबोदर. लांब उदर किंवा पोट असणारा. याचा अर्थ, जे जे तुम्हाला इतरांबद्दल काही वाईट समजलं आहे किंवा ज्ञात झालं आहे, ते ते तुमच्याकडेच ठेवा, पचवायला शिका. शिवाय, गणपती उत्तम लेखनिक आहे. म्हणूनच, महर्षी व्यास यांनी गणपतीला आपल्यासाठी ‘महाभारता’चे लेखन करण्याची विनंती केली होती. मात्र त्यातही त्याने अनेक कूटप्रश्न सहजपणाने गुंफलेले आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे. यातील अनेक कूटप्रश्न आजपर्यंत सोडविणे शक्य झाले नसल्याचंही अभ्यासकांनी नमूद केलं आहे.

    मोदक हे गजाननाचे आवडते पक्वान्न. पण यातही एक अर्थ दडला आहे. ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे लहानसा भाग! त्यामुळे मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. ‘मोदक पाहिल्यानंतर आनंद झाला नाही;, असा माणूस विरळा! गणेश हा एका हाती मोडलेला दात धारण करणारा आहे, असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे.
    श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे ‘श्री गणेशा’च्या हातात मोदक दाखवण्याची पद्धत असावी, असे सांगतात. मोदकाला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ‘ज्ञान प्रथम थोडे आहे’, असे वाटते. मोदकाचे टोक, हे याचे प्रतीक आहे. अभ्यास करू लागल्यानंतर लक्षात येते की, ज्ञान पुष्कळच मोठे आहे. मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे. मोदक गोड असतो आणि ज्ञानप्राप्तीचा आनंदही तसाच असतो.

    पार्थिव गणेशपूजन म्हणजे मातीची छोटी गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सवादरम्यान त्याची घरोघरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापना करणं, हे प्रतीक पूजन सांगितलं आहे. या प्रतीकामध्ये श्रद्धा ठेवून त्यात जिवंतपणा आहे, असं समजण्यासाठी त्याची विधीवत पूजा करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. या मानवी भावना आणि श्रद्धा जिवंत असणं आज खूप गरजेचं आहे. जिथे माणसा-माणसामधला विश्वास कमी होत आहे, तिथे असा श्रद्धा आणि भक्तीचा प्रयत्न निश्चितच आवश्यक आहे.

    हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

    केवळ भारतातच नाही तर, जगभरात गणेशाची अनेक रूपे बघायला मिळतात. भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. यातील काही गणेशमूर्ती द्विभूज आणि मोदकभक्षणरत आहेत. काहींच्या हातात मोदकभांडे, कुर्‍हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून, अभंगदेह, सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026 अवांतर

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026 अवांतर

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    By सुधीर करंदीकरMay 3, 2026

    सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छायाचा फोन आला – “अरे, आज काय खास आहे, ते विसरला…

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 612
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Most Popular

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.