Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक…

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 3, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक, नारळाची चटणी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक बनविण्याच्या काही टीप्स पाहूयात –

    • दोन-तीन घोसाळी (घोसावळी) उभी चिरून, किसून घ्यावीत. त्याच्या किसात मावतील (भिजतील) एवढे जाड पोहे घालावेत. साली घेऊ नयेत. पंधरा मिनिटांनी कढईत नेहमीप्रमाणे हिंग वापरून फोडणी करावी. ओल्या मिरच्यांचे तुकडे आणि भिजवलेले घोसावळी किस-पोहे घालून, नेहमीच्या कांदेपोह्याप्रमाणे परतवून खूप वाफ आणावी. कोथिंबीर, ओले खोबरे, आवडत असल्यास लिंबू पिळून गरमच खाण्यास द्यावेत. सुरेख पोपटी रंगाचे आणि वेगळ्या चवीचे पोहे होतात. याचप्रमाणे कोवळ्या दोडक्यांचेही पोहे करता येतात.
    • झटपट केक तयार करायचा असेल तर लोणी फेसण्यात वेळ जातो. त्याऐवजी पाव किलो मैद्यासाठी एक वाटी लोणी, पाऊण कप दुधात घालून वितळवावे व मिक्सरमधून काढून घ्यावे. एक कप पिठीसाखर, दोन चमचे बेकिंग पावडर आणि तीन अंडी, एक चमचा इसेन्स असे बाकीचे प्रमाण घेऊन केक तयार करावा. केक पटकन आणि छान होतो.
    • काही वेळा शिळ्या पोळ्या उरतात; पण त्याचा नवा पदार्थ तयार करायला वेळ नसतो. तेव्हा पोळ्या वाळवल्यानंतर मिक्सरमधून बारीक पूड करून डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, जिरेपूड घालून शेव करावी. छान खुसखुशीत होते. ही पोळीची पूड घातल्यास मोहन घालावे लागत नाही. दुसरे दिवशीच्या पोळ्यांच्या कणकेतही घालता येते. त्यामुळे पोळ्या मऊ होतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा

    • अळुवड्या करण्यापूर्वी अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत. थोड्या वेळाने ती चाळणीत काढून एका वर्तमानपत्रावर पालथी पसरावीत. प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चांगली चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे. असे केल्याने वडी अजिबात खाजत नाही.
    • खरवसाच्या चिकामध्ये एखाद्या वेळी जास्त दूध पडते आणि खरवस घट्ट होत नाही. त्या वेळी ते दूध बासुंदीइतपत आटवावे आणि त्याचा कन्डेन्स मिल्कचा केक करतात त्याप्रमाणे केक करावा. फक्त कन्डेन्स मिल्कऐवजी हे आटविलेले दूध घालावे. सुंदर केक होतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    • इडली, डोशाच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची अजिबात गरज नाही. थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाइस (प्रमाण आवश्यकतेनुसार) घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होते. ही चटणी अत्यंत चविष्ट लागते आणि त्यात ब्रेड आहेत, याचा कोणालाही पत्ता लागत नाही.
    • फ्रीजमध्ये आइस्क्रीम करताना त्या मिश्रणात नेहमी अर्धी वाटी लोणी घालावे, आइस्क्रीम खूपच मऊ आणि चवदार होते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    By माधवी जोशी माहुलकरApril 12, 2026

    उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात.…

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.