Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…
    ललित

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 23, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, शार्वीची नवी पीए, पीए गरिमा पांडे, पार्थ आणि गरिमा पांडे, अग्रवाल इंडस्ट्रीतील लव्हस्टोरी, गरिमा पार्थ प्रेमकथा, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, पार्थची गरिमासमोर प्रेमाची कबुली, शार्वीचे पार्थवर अव्यक्त प्रेम, शार्वीच्या प्रेमभावना, अग्रवाल इंडस्ट्रीत प्रेमत्रिकोण, अग्रवाल इंडस्ट्रीत लव्ह ट्रँगल,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 7

    दिवसेंदिवस शार्वीचा पार्थमध्ये इंटरेस्ट वाढत चालला होता. ती जास्तीत जास्त वेळ कसा तो तिच्यासोबत असेल हेच बघायची. त्याला आणि गरिमालाही हे जाणवत होतं की, ती त्याच्या जवळ रहायचा प्रयत्न करत आहे. पण का? ते त्यांना समजत नव्हतं आणि तिच्याशी बोलणार तरी काय? त्यामुळे ते दोघेही तिला इग्नोर करायचे. पण तिला हे कुठेतरी खुपत होतं.

    पार्थ आणि गरिमाची जवळीक तिला खुपायची. तिला किती जरी गरिमाचा राग आला, तरी ती तिला काही बोलत नव्हती. कारण घाईमध्ये जर तिने गरिमाविरोधात काही केलं, तर तीच चुकीची दिसणार होती. त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहात होती.

    तो आपल्यासोबत राहावा, यासाठी ती त्याला त्याच्यासोबत मीटिंग किंवा साइटवरही घेऊन जात होती… असंच एक दिवस ते तिघेही साइटवर पाहणीसाठी गेले होते. ते कन्स्ट्रक्शनचं काम बघत होते आणि तिथला इंजिनीअर त्यांना सगळं समजावून सांगत होता. चालत असताना अचानक पार्थला कशाचा तरी आवाज आला, त्याने बाजूला बघितलं तर तिथं ठेवलेला एक पोल हळूहळू सरकत होता. शार्वी त्यापासून काहीच इंच दूर होती. बस, तो आता तिच्यावर कोसळणार होता. पण तो तितक्यात पुढे धावला आणि त्याने तो पोल पूर्ण बळ एकवटून विरुद्ध दिशेला ढकलला.

    हेही वाचा – पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    पण या गडबडीत तो शार्वीला घेऊन खाली कोसळला. तो खाली आणि ती त्याच्यावर पडली. त्याने तिला दूर करायचा प्रयत्न केला, पण ती दूर झाली नाही. कारण तिने त्याला घट्ट पकडलं होत आणि ती त्याच्या नजरेतही गुंतली होती. आजूबाजूला काय होतंय, याचं तिला जराही भान नव्हतं. पण तो तर भानावर होता… त्याला त्या परिस्थितीची जाणीव होती. सगळे त्यांच्याकडेच बघत होते आणि त्यात गरिमा… तिची तर विचारायची सोय नाही! असं वाटत होत की, ती त्याला आता नजरेनेच जाळून राख करणार आहे. त्याने तिच्याकडे केविलवाण्या नजरेन बघितलं… तिने इशारा करताच त्याने बॉसला आवाज दिला… पण तो आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. त्याने तिला हलवून मोठ्याने आवाज दिला, तेव्हा ती भानावर आली आणि पटकन उठून बाजूला झाली.

    आता तिने आजबाजूला पाहिलं तर, सगळे तिच्याकडेच पहात होते. ती त्यांच्या नजरेने ओशाळाली आणि तिथून निघून गेली. तिथल्या इंजिनीअरने सगळ्यांना तिथून कामावर पिटाळून लावलं.

    नंतर त्यांनी इकडची तिकडची जरा पाहणी केली आणि ते तिघे ऑफिसला निघून गेले.

    0000

    ती आल्या आल्या डायरेक्ट आपल्या केबिनमध्ये गेली आणि चेअरला रेलून बसली. तिच्या डोळ्यांसमोर थोड्यावेळापूर्वी घडलेला प्रसंग आला. ती स्वतःलाच प्रश्न करत होती की, ती कशी एवढी त्याच्या नजरेत गुंतली होती? असं कसं होऊ शकतं? कशी ती एका साधारण व्यक्तीच्या आणि तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते? ज्यांच्यात दूर दूरवर काहीच बरोबरी नव्हती….

    तिचं एक मन असा विचार करत होतं. तर दुसरं मन म्हणत होतं, ‘शार्वी प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं… त्यामध्ये ना क्लास असतो, ना पैसा असतो, ते फक्त प्रेम… पण हे खरंच प्रेम आहे की, दुसरं काही?

    पण तो…! त्याला मी आवडत असेन का? जर मी त्याला आवडत असते, तर त्याच्याही डोळ्यांत मला प्रेम दिसलं असतं. पण ते तर कधी नाही दिसलं…

    शार्वी असंही असू शकतं की, तो तुझ्यावर प्रेम करत असेल. पण तुला सांगायला घाबरत असेल. कारण तू त्याची बॉस आहेस… वरून एका श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी, कोणी सामान्य मुलगी नाही… आणि विचार कर जर त्याचं तुझ्यावर प्रेम नसतं, तर त्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता थोडीना तुला वाचवलं असत! तोही तुझ्यावर प्रेम करतो. मला वाटतं शार्वी आता तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे! तू त्याच्याशी बोलून बघ… कदाचित तो तुझ्या बोलण्याची वाट बघत असेल.

    तिच्या मनात नुसताच विचारांचा कल्लोळ माजला होता.

    हेही वाचा – अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    तिने मनातच काहीतरी ठरवलं. तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली… थोडावेळ तिने तिचं ऑफिसवर्क केलं आणि घरी जायला निघाली… जाता जाता तिने त्याच्या डेस्ककडे एक नजर टाकली, तर तो त्याच्या कामात बिझी होता. काम करतानाचा तो, तिला खूपच आवडला. तशीच स्माइल करत ती बाहेर निघून गेली…

    0000

    गरिमा आपल्या बॉसचे बदलेले सगळे अंदाज नोट करत होती. आताही तिने बॉसला त्याच्याकडे बघून हसताना आणि लाजताना पाहिलं होत. आता तिला या विषयावर पार्थशी बोलण्याची गरज आहे, असं वाटू लागलं होतं. हा विषय वाढण्याआधी आणि काही विपरीत घडण्याआधी तिथेच स्पष्ट बोलून थांबवलेला बरा, असं वाटू लागलं होत. तिने पार्थला ‘ऑफिस टाइमनंतर भेट काही महत्वाचं बोलायचं आहे’ असा मेसेज केला.

    ऑफिस टाइम झाला, तसा तो तिची वाट बघत गेटबाहेर थांबला होता. ती आल्यावर त्याने आपली बाइक एका पार्ककडे वळवली. बाइकवर दोघेही शांत होते. ना तो बोलत होता, ना ती काही बोलत होती. दोघांमध्ये कमालीची शांतता होती. कारण त्याला कारणही तसंच होतं… त्यालाही कळलं होत की, तिला नक्की काय बोलायचं आहे… त्यांचं नेहमीच ठिकाण आलं तसं त्याने बाइक थांबवली आणि दोघेही एका शांत ठिकाणी जाऊन बसले. तो आता ती काय बोलणार याची वाट बघत होता…

    0000

    ती घरी येऊन उद्याची तयारी करत होती. उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, असं वाटत होतं.

    क्रमश:

    काय घडणार आहे उद्या असं..? पाहू नेक्स्ट पार्टमध्ये…


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026 ललित

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026 ललित

    अंजू

    November 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    By तृप्ती देवNovember 19, 2026

    “तू येशील ना गं?” “कशाला गं?” “अगं, डान्स प्रॅक्टिस करायला! म्हणजे लग्नात संगीतचा प्रोग्राम आहे.…

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    अंजू

    November 18, 2026

    एका सल्ल्याने बदलले आयुष्य

    November 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.