Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!
    ललित

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 16, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, शार्वीची नवी पीए, पीए गरिमा पांडे, पार्थ आणि गरिमा पांडे, अग्रवाल इंडस्ट्रीतील लव्हस्टोरी, गरिमा पार्थ प्रेमकथा, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, पार्थची गरिमासमोर प्रेमाची कबुली, शार्वीचे पार्थवर अव्यक्त प्रेम, शार्वीच्या प्रेमभावना, अग्रवाल इंडस्ट्रीत प्रेमत्रिकोण, अग्रवाल इंडस्ट्रीत लव्ह ट्रँगल,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 6

    खोटं बोलल्यामुळं गरिमा त्याच्यावर खूप रागावली होती. त्याने तिला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला साफ इग्नोर केलं. तो केविलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता, पण ती त्याला भाव देत नव्हती. तिने तिच्या तिच्या कामात लक्ष घातलं. शेवटी त्याने हार मानून शांत बसणे पसंत केलं, कारण चूक तर त्याचीच होती! त्यानेच तर माती खाल्ली होती…

    तोही काम करत होता, पण त्याचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून गरिमाला कसं मनवायचं हाच विचार करत होता… शेवटी त्याने सगळे विचार झटकले आणि कामावर कॉन्सन्ट्रेट केलं… कारण आता कामात जर चूक झाली तर, ती महामाया यांना काय सोडणार नव्हती..

    कसंतरी त्यानं त्याचं काम आवरलं आणि बाहेर येऊन गरिमाची वाट बघू लागला. काहीवेळाने ती तिचं आवरून बाहेर आली तर, हा तिला बाहेर गेटवर थांबलेला दिसला. पण ती त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून पुढे चालू लागली…

    ‘तुझं अवघड आहे पार्थ! ही तर सरळ सरळ इग्नोर मारतेय… जराही भाव देत नाही… लगता हैं तुझे बहुत पापड बेलने पडेंगे…’ असं मनाशी म्हणत त्याने आपली बाइक तिच्यामागे घेतली. गरिमा चालत होती पुढे पुढे अन् हा तिच्यामागे आपली बाइक हळूहळू ढकलंत चालला होता… बराच वेळ झाला कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. शेवटी तीच थांबली… तसा तोही थांबला. ती त्याच्याकडे रोखून बघत होती आणि हा एका हाताने बाइक आणि एका हाताने कान पकडून तिच्याकडे गरीब चेहरा करून बघत होता… तिने त्याच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि पुढे चालायला लागली. त्याने पटकन बाइक साइडला लावली आणि तिच्या मागे पळत जाऊन तिचा हात पकडला…

    तिने वळून त्याच्याकडे पाहिलं.

    हेही वाचा – गेटवर जी धडकली ‘ती’ पार्थच्या समोर होती…

    “यार गरिमा, सॉरी… आय नो… मला असं करायला नव्हतं पाहिजे… पण प्लीज मला समजून घे नं… परत असं नाही करणार…” तो तिला समजावत म्हणाला.

    “…आणि परत केलंस तर तुझ्यावर कोणी विश्वास पण ठेवणार नाही…” ती त्याला रागात म्हणाली.

    “मी याआधी कधी काही खोटं बोललो आहे का? पहिल्यांदा बोललो माफ कर ना…” तो हळू आवाजात म्हणाला.

    “तुझ्यामुळे माझीही नोकरी जायची वेळ आली होती. तुला काहीच समजतं नाही का? राजपाल सर होते म्हणून वाचलो नाहीतर काही खर नव्हतं! आधीच एवढ्या मुश्किलीनं सगळं ठीक होत आहे आणि त्यात तू…. रस्त्यावर यायची वेळ आली होती माझ्यावर…” ती डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.

    “मला खरंच माफ कर. मला वाटल नव्हतं, माझ्या एवढ्याशा खोटं बोलण्याने एवढं सगळं काही होईल… आणि मी बरं तुला रस्त्यावर येऊ दिल असतं! मी आहे नं… तुला कधीच काही होऊ देणार नाही,” तो तिला त्याच्याकडे वळवत प्रेमाने म्हणाला.

    “कोणत्या नात्याने तू मला हे सगळं समजावत आहेस?” ती नाक वर ओढत म्हणाली.

    “कोणत्या नात्याने म्हणजे… I Love You… मी खूप प्रेम करतो तुझ्यावर…” असं सांगून त्यानं नि:श्वास सोडला..

    तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं…

    “हो, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर… अगदी पहिल्या दिवसापासून… पण असं अचानक सांगावं लागेल, असं वाटल नव्हतं! मी आईलाही आपल्याबद्दल सांगितलं आहे. तिलाही तिची सून पसंत आहे. मला माहिती आहे की, तूही माझ्यावर प्रेम करतेस… पण मला तुझ्याकडून ऐकायचे आहे…” तो तिच्या डोळ्यांत पाहात म्हणाला.

    तिने त्याच्या शर्टला पकडून तिच्याकडे खेचलं आणि हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले… आणि तिने लाजून मान वळवली.

    त्याला तर काय झालं हे सुरुवातीला कळलंच नाही! पण जेव्हा समजलं, तेव्हा मात्र तो हलकेच गालात हसला…

    “गरिमा…” त्याने आवाज दिला; पण तिने त्याला प्रतिसाद दिला नाही, कारण आपण आता काय केलं, हे तिच्या लक्षात येताच ती ओशाळाली. त्याला कसं फेस करावं, हे तिला समजत नव्हतं. मग तोच तिच्यापुढे जाऊन थांबला. तरीही तिचा चेहरा खालीच होता आणि चेहरा लज्जेने लाल झाला होता. त्याने तिचा चेहरा बोटाने वर केला आणि म्हणाला, “मला उत्तर दिलं नाही. मी वाट पाहतो आहे तुझ्या उत्तराची!”

    “यावरूनही तुला समजलं नाही का, की मी तुझ्यावर प्रेम करते की नाही?” ती नजर झुकवत म्हणाली.

    “यावरून म्हणजे मला समजलं नाही…” तो मिश्किलपणे म्हणाला.

    “अं… काही नाही…” ती नकारार्थी मान हलवत म्हणाली. तिला त्याच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावं, हे समजतं नव्हतं.

    “तू बोलणार आहेस की नाही? मला कसं समजेल?” तो जरा लटक्या रागात म्हणाला. कारण त्यालाही तिच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकायची होती.

    ती तिथून पळत पुढे जाऊन थांबली आणि मागे वळून म्हणाली, “मला सासूबाई पसंत आहेत!” आणि पटकन रिक्षात बसून निघून गेली.

    त्याला वेळ लागला समजायला. पण जसं ती काय बोलली लक्षात आलं, तसं तो खूप खूश झाला… आणि खुशीतच बाइक सुरू करून घरी निघाला…

    तो घरी आला तसं त्याला त्याची आई काहीतरी शोधताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर टेंशन साफ दिसत होत. बहुतेक काहीतरी महत्त्वाचं असावं.

    तो फ्रेश होऊन आला तरी, आई शोधतच होती. तिचं त्याच्याकडे बिल्कुल लक्ष नव्हतं… शेवटी त्यानेच न राहून विचारलं, “काय शोधत आहेस?”

    “काही नाही…” ती नजर चोरत म्हणाली. त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं, हे तिला समजत नव्हतं आणि खरं काय ते सांगू शकत नव्हती.

    “तू फ्रेश झालास! थांब मी तुला चहा आणते,” म्हणून ती किचनमध्ये निघून गेली.

    ‘काय झालंय आईला? असं काय शोधत होती ती?’ तो तिथेच विचार करत बसला.

    0000

    इन ऑफिस

    शार्वीने पार्थला केबिनमध्ये बोलावून घेतलं. तो आला तसं तिने त्याला चालू प्रोजेक्टची माहिती विचारली. त्याने आतापर्यंत झालेल्या सगळ्या कामाची तिला सविस्तर माहिती दिली. तिचं त्याच्या बोलण्याकडे बिल्कुल लक्ष नव्हतं. तो आल्यापासून ती त्याच्याकडेच पाहात होती… माहिती सांगताना त्याच्या बॉडीची होणारी हालचाल आणि त्याचा बॉडी स्मेल तिला अस्वस्थ करत होता… तिने कधी त्याला एवढं जवळून लक्ष देऊन पाहिलं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती, त्याला एवढं निरखून पाहायची! त्याला तिची रोखलेली नजर समजत होती, पण त्याने इग्नोर करत तिला सगळी माहिती दिली…

    हेही वाचा – पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    “मी जाऊ शकतो का मॅम?” त्याने विचारताच ती भानावर आली.

    “नाइस प्रोग्रेस… इंप्रेसिव्ह… तू जाऊ शकतोस…” मनात नसतानाही तिने त्याला जायची परवानगी दिली… तसा तो निघून गेला..

    तो निघून गेला तसा तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला…

    ‘मला वाटतं, तो मला आवडला आहे…’

    तो गेला त्या दिशेला पाहात ती विचार करत होती… तिने कधीच कोणा मुलाला आपल्या जवळ फिरकू दिल नव्हतं. ही अशी वागण्याची तिची पहिलीच वेळ होती… आता तिला पार्थमध्ये इंटरेस्ट आला होता… आणि त्याला मिळवायला ती काहीही करू शकत होती…

    क्रमश:

    पार्थची आई काय शोधत होती? शार्वी मिळवू शकेल का पार्थला? पाहू पुढील भागांत…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026 ललित

    आषाढीच्या स्वादातली भक्ती

    July 16, 2026 ललित

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    By हेमा पाटीलJuly 16, 2026

    हे बंध रेशमाचे… उमाला झोप लागत नव्हती… ती आठवणीत रमली होती… “कसलं कालवण केलंया? त्यात…

    आषाढीच्या स्वादातली भक्ती

    July 16, 2026

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026

    आषाढीच्या स्वादातली भक्ती

    July 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें

    July 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 361
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 491
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 237
    • मैत्रीण 24
    • ललित 783
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.