Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeमैत्रीणमैत्रिणींनो स्वत:ला जपा!

मैत्रिणींनो स्वत:ला जपा!

नमस्कार, मी हर्षा गुप्ते

अभिनेत्री आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषांमधून काम करत आलेय. 41 वर्षं झाली या क्षेत्रात. बरंच काही घडलं… घडलं नाही… त्यापैकी काही सगळ्यांसोबत शेअर करावंस वाटतंय…

1984पासून नाटकात काम करायला सुरुवात केली. मराठी नाटकं म्हणजे दौरे आले. 10-15 दिवस सहज घराबाहेर राहायला लागायचं. मी आणि इतर बाकीच्या स्त्री कलाकारांना आलेला एक अनुभव… प्रवासात किंवा आऊट-डोअर शूटच्या वेळी स्वच्छ वॉशरूमची सोय नसणे! त्यावर पाणी कमी पिणे किंवा न पिणे हाच उपाय असायचा; जेणेकरून वॉशरूमला जायची गरज लागू नये.

वयाने तरुण होते, त्यामुळे या सगळ्यात त्यावेळी शरीराने साथ दिली. पण आता तो सगळा प्रकार अंगाशी येऊ घातलाय. यूटीआय (urinary tract infection) नावाचा आजार सर्रास बोकाळलाय. अगदी किडनी बाद होण्यापासून कॅन्सरपर्यंत आजार पोहोचलेत.

एकेदिवशी घरी असतानाच घाईने वॉशरूमला जायचे होते, पण युरिन पास होण्याचे बंद झाले होते. माझी स्थिती अचानक बिघडली, अस्वस्थ होणे म्हणजे काय हे समजलं. श्वास घेता येईना! रडून मी बेजार झाले होते. मी एक ‘फायटर’ बाई… पण कळवळून रडतेय म्हटल्यावर घरातले सगळे घाबरले.

यूरोलॉजिस्टकडे (Urologist) जाऊन आलो. त्यांनी दिलेल्या औषधांमुळे युरिन हळूहळू बाहेर पडली आणि मला आराम पडायला लागला. मला किडनी स्टोन असावेत, असे डॉक्टरना वाटलं. त्यादृष्टीने तपासले गेले. पण कि़डनी स्वच्छ आहेत, म्हटल्यावर मला स्त्रीरोगतज्ज्ञाकडे (Gynaecologist) पाठविण्यात आले. त्या डॉक्टरने तपासून डर्मोलॉजिस्टकडे (Dermatologist) पाठविले. त्यांनी चेक करून कधी दुसऱ्या डॉक्टरकडे… डॉक्टर डॉक्टर यात्रा सुरू झाली होती.

वर्षानुवर्षे कामानिमित्त बाहेर राहून झालेली वॉशरूमची गै२सोय, आता बाहेर पडत होती. कितीतरी वर्षं यूरिन पास होताना जळजळ होणे, खाज सुटणे… अशा गोष्टी व्हायच्या. हे घरी किंवा डॉक्टरना सांगायची लाज वाटत होती, त्याचे भयंकर परिणाम समोर आले. सततच्या यूटीआयमुळे Urethra बंद झाली होती. सर्जरी करायचे ठरले… अगदी युद्ध पातळीवर! नाहीतर माझ्या किडन्या बाद होऊन मीपण बाद झाले असते. खूप त्रास… खूप सारा खर्च… औषधं, मलमं… एकदाची त्रासातून मुक्त झाले! पण कायमची नाही. जर यापुढे नीट काळजी घेतली नाही तर, हा प्रकार पुन्हा घडू शकतो.

समस्त स्त्रीवर्गाला हात जोडून विनंती, वय काहीही असो, कारण काहीही असो… यूरिन पास होताना जळजळ होणे, खाज सुटणे ही गोष्ट शेअर करायला कृपया लाजू नका. योग्य मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार घ्या. सगळ्यात अगोदर त्वचारोग तज्ज्ञाकडे जावं. गरज वाटली तर तेच सांगतील, त्यांच्या सल्ल्याने स्त्रीरोग तज्ज्ञाकडे किंवा यूरोलॉजिस्टकडे जावे…

निरोगी राहा

मैत्रिणींनो स्वत:ला जपा…

Love you all

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!