Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    कौतुकाचे दोन शब्द

    July 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 22, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥314॥ तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥315॥ तरि तैसें नोहे अवधारा । कारण आहे विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥316॥अहिंसा म्हणतां थोडी । परि तेचि होय जी उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥317॥ एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥318॥ रत्नपारखियांचा गांवीं । जाईल गंडकी तरि सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जे ॥319॥ काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये सातें ॥320॥ म्हणोनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें । लागसर न लभे । बोला प्रभु ॥321॥ सामान्या आणि विशेषा । सकळे कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे नेयाल ना तुम्ही ॥322॥ शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे । तैं मागुतां पाउलीं पळे । अवधान येतें ॥323॥ कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती । तयांची वास पाहाती । हंस काई ॥324॥ कां अभ्रापैलीकडे । येत चांदिणें कोडें । तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥325॥ तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरि कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥326॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें

    अर्थ

    कदाचित आपण असे म्हणाल की, हिरव्या चार्‍यांत जनावर सुटले असतां ते जसे (चार्‍याच्या लोभाने) पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्‍‍याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो ॥314॥ त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने, माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही. ॥315॥ तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद लीन अक्षरांचे न आहे. ॥316॥ अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. ॥317॥ एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. ॥318॥ रत्न पारखणार्‍या लोकांच्या गावात गंडकी (कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल, असे वाटत असेल, तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी; (तसेच) सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ॥319॥ ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला ‘वास मंद आहे’ असे म्हणतात, त्या बाजारात (कापूर म्हणून) पिठाची विक्री कशी होईल? ॥320॥ म्हणून महाराज, या सभेमध्ये (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही. ॥321॥ सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना, निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधाने विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखांकडे नेणार नाही ॥322॥ शंकारूपी कचर्‍याने जेव्हा स्चच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाउलीच पळेल. ॥323॥ गोंडाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकांची हंस वाट पहातात काय? ॥324॥ किंवा ढगांमधून ज्या वेळेला चांदणे येते, त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपयोग करून घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. ॥325॥ त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर, शिवाय आणखी तुम्ही रागावाल. ॥326॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें

    July 20, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 21, 2026

    येई वो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे… आलीया गेलीया हाती…

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें

    July 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लीलाकमळें खेळणें, पुष्पमाळा झेलणें

    July 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    कौतुकाचे दोन शब्द

    July 22, 2026

    झोपेशिवाय माणूस कदाचित जिवंत राहू शकतो, पण…

    July 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026

    July 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 368
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 500
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 795
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मोबदला

    July 22, 2026

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    कौतुकाचे दोन शब्द

    July 22, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.