Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥327॥ आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥328॥ एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥329॥ जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवुनि न्याल । म्हणोनि ग्रंथु नव्हे बोल । साचचि हे ॥330॥ कां सर्स्वाचा लोभु धरा । बोलीचा अव्हेरु करा । तरि गीते मज अवधारा । एकचि गती ॥331॥ किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥332॥ तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे । म्हणूनि मतांगें । बोलों ठेलां ॥333॥ तंव कथे पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा या बोला । अपत्या मज ॥334॥ आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु । ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥335॥ कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे ॥336॥ परि यावरील हें नव्हे । तुम्हीं साहिलें तेंचि बरवें । आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥337॥ म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना । करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥338॥ तरि ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ॥339॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    अर्थ

    निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर व्याख्यान केले, तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा राहतील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. ॥327॥ आणि माझे ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की, तुम्ही संतांनी नेहेमी (प्रसन्न होऊन) समोर असावे. ॥328॥ एऱ्हवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहाते आहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. ॥329॥ जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला (गीतेला) सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे, तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. ॥330॥ अथवा, तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल, तर गीतेची व माझी एकच गति आहे, असे समजा. ॥331॥ फार काय सांगावे! मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरिता मी हे ग्रंथाचे निमित्त केले. ॥332॥ तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हांयोग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. ॥333॥ तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकांचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. ॥334॥ आणि (जेवीत असतांना) घासातील खडा काढतांना वेळ लागतो, तर जेवणाराला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्य़ास उशीर केला तर त्यात जेवणाराचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. ॥335॥ अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे, घरी येण्य़ास मुलाला जास्त दिवस लागले, तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर मीठमोहर्‍या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी? ॥336॥ परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले, हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका, देव असे बोलले. ॥337॥ भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्‍या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे. ॥338॥ तर जेथे सहज (चरफडल्याशिवाय) क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख. ॥339॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026 अध्यात्म

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    कान्होपात्रेचे समर्पण

    By डॉ. शिरीष कुलकर्णीJuly 23, 2026

    वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत संत कान्होपात्रेचे स्थान मला अत्यंत आपलेसे वाटणारे आणि हृदयस्पर्शी असे आहे.…

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जुलै 2026

    July 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 370
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 501
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 798
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.