Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 31, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fifteen, पंधरावा अध्याय, अध्याय पंधरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप, पुरुषोत्तम योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय पंधरावा

    आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूचीं ॥1॥ ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रियकुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥2॥ अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥3॥ प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥4॥ घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥5॥ आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥6॥ तेथे अहं हा धूप जाळूं । नाहंतेजें वोवाळूं ।सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥7॥ माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्षनिंबलोण । पायां तयां ॥8॥ इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥9॥ ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥10॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    अर्थ

    आता आपल्या शुद्ध अंत:करणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करू. ॥1॥ श्रीगुरु व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून, त्या पुष्पांजळीचे अर्घ्य श्रीगुरुच्या चरणांवर देऊ. ॥2॥ एकनिष्ठतारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना, तेच श्रीगुरूंस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू. ॥3॥ (श्रीगुरुंविषयीचे) प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्‍यांचे वाळे सद्गुरुंच्या सुकुमार पायात घालू. ॥4॥ अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुंविषयीचे दृढ प्रेम, हीच कोणी जोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. ॥5॥ आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी, हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरुंच्या पायावर वाहू. ॥6॥ देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती, हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपैकी मी कोणी नाही, अशी जी एक उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती, हेच कोणी तेज, त्या तेजाने श्रीगुरुंस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ. ॥7॥ श्रीगुरुंच्या दोन्ही पायांत माझे शरीर व प्राण (स्थूलदेह व लिंगदेह) या दोन खडावा करून घालू व ऐहिकपारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ॥8॥ ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो, त्या दैवास, या श्रीगुरुंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. ॥9॥ ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते ॥10॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026 अध्यात्म

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    By Team AvaantarOctober 30, 2026

    अध्याय चौदावा ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥27॥ अगा ब्रह्म…

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये

    October 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026

    शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

    October 30, 2026

    Recipe : विदर्भातील पारंपरिक पदार्थ गुळशेल!

    October 30, 2026

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 489
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 655
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1029
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी

    October 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑक्टोबर 2026

    October 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.