Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : बटर फणस हंडी

Recipe : बटर फणस हंडी

माधवी जोशी माहुलकर

फणसाची भाजी सगळ्यांचीच आवडती असते, मग ती सुकी करा किंवा रस्सा! अनेकांना ही भाजी नॉन-व्हेजसारखी वाटते. मसालेदार तर्रीची नॉन-व्हेजसारखी चवीला असणारी ही फणसाची भाजी सगळ्यांची रसना तृप्त करू शकते, असं मला वाटतं. ही भाजी मातीच्या हंडीत ग्रीन मसाला वापरून केली आहे…

साहित्य

  • कच्चा फणस – अर्धा किलो
  • कांदे – 2
  • हिरव्या मिरच्या – 8 ते 10
  • लसूण पाकळ्या – 7 ते 8
  • आले – 1 इंच
  • ओल्या खोबऱ्याचा तुकडा – 1
  • जिरे – 2 चमचा
  • धणे – 1 चमचा
  • हिंग – 1 चमचा
  • हळद – अर्धा चमचा
  • कोथिंबीर – 1 वाटी
  • काजू – 7 ते 8 (ओले करून)
  • तेज पान (तमालपत्र) – 2
  • दालचिनीचा तुकडा – 1 इंच
  • बडी (मसाला) वेलची – 2
  • स्टारफूल – 2
  • खसखस – 2 चमचा
  • तीळ – 1 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – आवडीनुसार
  • कांदा-लसूण मसाला – 2 चमचे
  • बटर – आवडीनुसार
  • तेल – 3 पळ्या

हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

कृती

  1. प्रथम विळीला तेल लावून फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. हे तुकडे आवडत असतील तर तळून घ्यावेत किंवा या तुकड्यांना कोथिंबीर, आले- लसूण पेस्ट आणि हळद दह्यात कालवून मॅरिनेट करायला ठेवावे.
  2. कढईत एक छोटा चमचा तेल टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर भाजून घ्यावा, त्यातच धणे, जिरे, काजू तुकडे, खोबऱ्याचा तुकडा (बारीक तुकडे करावेत), खसखस आणि तीळ भाजून घ्यावेत. या सर्वांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
  3. नंतर वाटीभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.
  4. आता मातीच्या हंडीत दोन पळ्या तेल टाकावे. तेल तापले की, त्यामध्ये जिरे टाकावे, जिरे तडतडलं की, एक चमचा हिंग, तेजपान आणि दालचिनीचे तुकडे, मसाला वेलची आणि स्टारफूल टाकावे.
  5. नंतर कांदा, खसखस, धणे, जिरे, काजू तुकडे, तीळ आणि ओले खोबरे यांची पेस्ट टाकून कडेने तेल सुटेपर्यंत परतन घ्यावे.
  6. मग कोथिंबीर, हिरवी मिरची,  आल्याची पेस्ट टाकून परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
  7. आता या मसाल्याला तेल सुटले की, त्यामध्ये दोन चमचे कांदा-लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला टाकावा.
  8. नंतर अर्धी वाटी पाणी त्यात टाकावे आणि एक वाफ येऊ द्यावी.
  9. मसाल्याला तेलाचा तवंग सुटला की, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकावी.
  10. नंतर यामध्ये मॅरिनेट केलेले फणसाचे तुकडे टाकावे. चवीनुसार मीठ टाकून एकदा चांगले परतून घेताना त्यात परत एक वाटी पाणी टाकावे.
  11. हंडीवर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढावी.
  12. पाच मिनिटांनी झाकण काढून भाजी एकदा चांगली ढवळावी आणि परत दोन वाट्या पाणी टाकून फणस चांगले नरम शिजेपर्यंत भाजी उकळू द्यावी.
  13. फणसाचे तुकडे शिजले किंवा नाही ते हाताने दाबून पाहावे. मऊ शिजले असेल तर वरून बटर सोडून गॅस बंद करावा आणि झाकण ठेवावे.
  14.  वरून कोथींबीर टाकून ही भाजी सर्व्ह करावी.

एकूण कालावधी – साधारण एक तास

हेही वाचा – Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा

टीप्स

  • यामध्ये गरम मसाला कुठलाही चालू शकतो. चिकन मसाला असेल तर अजूनच छान.
  • फणसाचे तुकडे कुकरमध्ये वाफवूनही घेता येतात.
  • संपूर्ण भाजी जर बटर वापरून करायची असेल तर, तेल वापरले नाही तरी चालेल.

तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!