Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ब्रुसच्या जाण्याने परत एकदा निर्माण झाली जीवनात पोकळी
    अवांतर

    ब्रुसच्या जाण्याने परत एकदा निर्माण झाली जीवनात पोकळी

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 17, 2025No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, ब्रुस, एस, लॅब्रेडॉर, लंडनवारी, भारतदौरा, प्राणीप्रेम
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मंदार अनंत पाटील

    सर्व प्राणी मित्रांमध्ये आणखी कायमचा लक्षात राहील तो माझा ब्रुस… लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणी माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा माझा ब्रुस. खरे पाहता तो माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. सुटटीचे पाच आठवडे होते, पण असा एकही दिवस गेला गेला नाही, जेव्हा मी आणि तो एकत्र नसू…

    मला तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे व्हायचे. तो फक्त जेवायला आणि रात्री झोपायला त्याच्या घरी जात असे. त्या सुट्टीदरम्यान दोन-तीन दिवस मुंबईबाहेर जाणे झाले, पण सतत त्याची आठवण येत असे. म्हणून फोन करून त्याची चौकशी करत होतो. परत आल्यावर तर सरळ जाऊन ब्रुसला कडकडून मिठीच मारली. तो पण मला बघून इतका आनंदी झाला होता, जसे ‘कुंभ के मेले में बिछडा भाई मिल गया हो’!

    ते सुट्टीचे पाच आठवडे बघता बघता संपले आणि मग इंग्लडला परतायचा दिवस परत उजाडला. फ्लाइट दुपारचे होते. पण सकाळी वेळात वेळ काढून ब्रुसचा निरोप घ्यायला गेलो. त्याला पण माझी इतकी सवय झाली होती की, तो पण सवयीनुसार बाहेर जायला निघाला. त्या बिचाऱ्याला काय माहीत की, मी अलविदा करायला आलो आहे. निरागस डोळ्यांनी शेपटी हलवत माझ्याकडे बघत होता आणि ते डोळे सांगत होते की, का थांबला आहेस? चल ना खेळायला जाऊया. मग त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले की, पुढच्या वर्षी भेटुया आणि का कोणास ठाऊक, पण त्याला माझे शब्द कळले असावेत आणी गुणी मुलासारखा आपल्या जागेवर जाऊन बसला.

    लंडनला परतल्यावर माझ्याकडे ब्रुसशिवाय बोलायला विषयच नव्हता. पल्लवीने सुचविले की, इतका लळा लागला आहे तर अमेयला विचारून आपणच ब्रुसला दत्तक घेऊया. कुठे तरी मलाही रीगलचे लहानपण परत एकदा जगल्याचे जाणवले. पण ब्रुसचा महाजन कुटुंबीयाना लागलेला लळा बघता मी मनाला आवर घातला. साधारणपणे एक वर्षाने परत भारतात येण्याचा योग आला. या काळात अमेयबरोबर वरचेवर ब्रुसच्या बाबतीत चौकशी होतच असे. या वेळेस जाताना मनामध्ये धाकधुक होतीच की, ब्रुस मला विसरला तर नसेल ना? कारण कुत्र्यांची स्मरणशक्ती सहा महिन्यांपेक्षा जास्त नसते, असे वाचले होते. पण ब्रुसने जो मला सुखद आश्चर्याचा धक्का दिला, तो म्हणजे फक्त वासाने ओळखून! त्याने अंगावर उड्या मारायला सुरवात केली आणि वेगवेगळे आवाज काढून जणू जाबच विचारत होता की, इतके दिवस कुठे होतास?

    मला महाजन कुटुंबीयांकडून आणखी एक चकित करणारी माहिती मिळाली… ती म्हणजे, मी लंडनला परत गेल्यावर अगदी नित्यनियमाने ब्रुस एकतर दरवाजाकडे किंवा माझ्या सोसायटीच्या दिशेने असलेल्या त्यांच्या घरातील खिडकीत तोंड घालून तासन् तास वाट बघत बसलेला असायचा. इतका जीव हे मुके प्राणीच लावू शकतात, हेच खरे.

    परत एकदा चार आठवडे आमचा दिनक्रम सकाळी लवकर उठून जुहू चौपाटीला जाणे, येताना नाश्ता घेऊन मग परत एकदा सोसायटीच्या आवारात हुंदडणे आणि दुपारची जेवणाची वेळ होईपर्यंत घरात धिंगाणा करणे… हाच असे. मग दुपारी आम्ही दोघे चांगलीच ताणून देत असू. संधयाकाळी मग परत एकदा विलेपार्लेमध्ये लांबलचक फेरफटका मारून आलो की, मग ब्रुसला महाजन कुटुंबीयांच्या घरी सोडून येत असे. अमेयच्या म्हणण्यानुसार ब्रुस कधीच पट्टयाशिवाय बाहेर जात नसे, पण माझ्याबरोबर मात्र अगदी गुण्यागोविंदाने रमतगमत कुठेही येई. कारण मी त्याचा मालक नव्हे तर, जिवाभावाचा सखाच होतो. आमची देहबोली आणी भाषा एकमेकांना उत्तम समजत असे. मी कितीतरी वेळा त्याच्याकडे मनातले सांगे आणि तो सगळे समजल्यासारखे शेपटी हलवून दाद देई.

    बघता बघता लंडनला परतायची वेळ झाली आणि माझे डोळे अलगदच ओलावले. पण या वेळेस निरोप घेताना ब्रुस अगदी खालपर्यंत सोडायला आला आणि परत भेटुया बोलल्यावर परत मुकाटयाने वर गेला. जणू त्याला विश्वास होता की, हा आपला मित्र नक्की परत येणारच आहे.

    साधारणपण 2018 साली माझी भाची मधुराच्या लग्नाकरिता परत एकदा भारतभेटीचा योग आला. ब्रुस पुन्हा भेटणार याचाच आनंद होता. पण काही अपरिहार्य कारणांमुळे दोन-तीन दिवस भेट होऊ शकली नाही, पण परिस्थिती पूर्ववत झाल्यावर लगेचच ब्रुसला भेटायला गेलो आणि त्याने देखील तितक्याच उत्साहाने आमचे स्वागत केले. यावेळी सुट्टी फक्त तीनच आठवड्याची असल्याने आणि मधुराच्या लग्नाची धावपळ असल्याने ब्रुसला फारसे भेटतां आले नाही आणि थोड्या धावपळीतच भारतभेट संपली. यावेळी ब्रुसला फारसे भेटतां आले नाही, याची फार चुटपुट लागून राहिली होती.

    नंतरची दोन वर्षं कोरोनामुळे इंटरनॅशनल विमानप्रवास बंद झाला होता आणि सारे जग महामारीच्या विळख्यात जखडले गेले होते. फोनवरूनच मी ब्रुसची खुशाली विचारत होतो. जवळ-जवळ तीन वर्षांनी 2021च्या सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनी भारतात येणार होतो. कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता; पण संपला नसल्यामुळे योग्य ती काळजी आणि उपाययोजना करूनच भारतभेट योजली. ब्रुसला भेटायचा योग परत येणार होता. मन आनंदाने उचंबळून येत होते. एकदा झालीच परत भेट आणि तीही तितक्याच आनंदाने…

    यावेळेस शक्य तितका वेळ बरोबर घालविता यावा याकरिता फक्त रात्रीच ब्रुस महाजन कुटुंबीयांकडे जात असे. ब्रुसचे वजन वाढले असल्याचे लक्षात आल्यावर मग एक डायट प्लॅन तयार केला आणि त्यानुसार ब्रुसचा आहार योजिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नवीन आहार ब्रुसला सुद्धा फारच आवडला. बघता बघता ब्रुसचे वजन चांगले आटोक्यात यायला लागले. या वेळेस खूप चांगला वेळ घालवला, यांचे समाधान आणि आठवणी बरोबर घेऊन परत जाणार होतो. ब्रुसची नीट काळजी घेईन आणी नियमित व्यायाम करायला नेईन, असे अमेयकडून आश्वासन घेऊनच भारत सोडला.

    २०२३ साल उजाडले आणि ऑगस्ट महिन्यात भारतात जाण्याचा प्लॅन ठरला. पण ती काळरात्र जुलैमध्येच आली… साधारण रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमेयचा हृदयाला चिरत जाणाऱ्या आवाजात फोन आला – ब्रुसला पिवळी उलटी झाली आहे. माझी तर झोपच उडाली, पण मनात आलेले निगेटिव्ह विचार बाजूला सारत मी लगेच, ‘ब्रुसला वेटकडे नेऊन रक्त तपासणी कर,’ असा सल्ला दिला. दुसरा दिवस फक्त प्रचंड तणावाचा गेला. कारण अहवाल यायला थोडा वेळ लागत होता… संध्याकाळी ती वाईट बातमी येऊन धडकली, ब्रुसचे दोनही मूत्रपिंड निकामी झाले आहेत आणि फारतर 10-15 दिवसांचेच आयुष्य बाकी आहे. एका तज्ज्ञाने तर ‘दयामरण दे’ असेच सुचविले. माझे डोकंच भणभणायला लागले होते. अमेय देखील अगतिक झाला होता. आम्ही लगेच तीन-चार वेटला विचारून पुढे काय उपचार करता येतील याची विचारपूस करायला लागलो, पण सगळीकडेच नकारात्मक प्रतिसाद येत होता.

    इकडे सारखी रीगलची शेवटची तडफड माझ्या डोळ्यांसमोर येत होती. हळूहळू दिवस पुढे सरकत होते, पण ब्रुस कुठल्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. सगळे उपाय थकत चालले होते. एक थोडा वेगळा प्रयत्न करायचा महणून कांचन नावाची एक एनिमल कम्युनिकेटरची मदत घेतली की, अचानक ब्रुसची तब्येत कशी बिधडली. तिच्या माहितीनुसार ब्रुसने तळलेला आणि मसालेदार मासा जेवणात खाल्ला होता आणि त्यामुळे पोट बिघडले होते. एक चुकीचा आहार आणि माझा ब्रुस आता मरणाच्या दारात येऊन पोहोचला होता. पुढचे दोन-तीन दिवस कांचनच्या मदतीने ब्रुसला धीर आणि आश्वासन देण्यात गेले की, मी येतो आहे मुंबईला. मग पुन्हा आपण जुहूला जाऊ… तू लवकर बरा हो बाळा… कधीकधी माझ्या मनाला बरे वाटावे म्हणून कांचन मला धीर देत होती की, तुझा निरोप ऐकून ब्रुस उपचारांना चांगला प्रतिसाद देतो आहे.

    पण एकेदिवशी दुपारी अमेयचा व्हिडीओ कॉल आला की ब्रुस शेवटच्या घटका मोजतो आहे आणि मी इथे लंडनमध्ये बसून भरल्या डोळ्यांनी आणि आवंढा गिळत माझ्या मित्राचा कायमचा निरोप घेतला. ब्रुस गेला आणि परत एकदा जीवनात पोकळी निर्माण झाली. आता मुंबईला गेल्यावर कोण आहे आपली आतुरतेने वाट पाहणारे? कोणाबरोबर आपण जुहू बीचवर जाणार? अमेयच्या घरी गेल्यावर आपली नजर परत ब्रुसला शोधणार… असेच विचार मनात काहूर करू लागले. पण सत्य परिस्थिती स्वीकारायलाच लागणार होती. धीर करून जानेवारी 2023मध्ये मुंबईला गेलो आणि बॅगा खालीच वॉचमनकडे देऊन तडक जिथे माझा लाडका ब्रुस कायमची विश्रांती घेत होता, तिथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. तिथून पायच निघेना! पण ब्रुसला खरीखुरी श्रद्धांजली द्यायची होती ती एका निराधार मुक्या जिवाचे पुनर्वसन करून. आमची एक सहकारी पूनम गिडवानी, सेव्ह दी पॉज, नावाची सेवाभावी संस्था चालविते. तिने विनंती करून एक लॅब्रेडॉर जातीच्या कुत्र्याला (जो एका जैन कुटुंबीयांकडे होता आणि ते काही अपरिहार्य कारणांमुळे त्याला देऊन टाकत होते) सांभाळायची विनंती केली.

    मनावर दगड ठेवूनच मी हो म्हणालो आणि काही वेळातच ब्रुसची प्रतिकृती असलेला 10 महिन्यांचा एस माझ्याकडे येऊन धडकला. प्रथम दर्शनी ब्रुसच माझ्यासमोर येऊन उभा ठाकला आहे, असेच जाणवले.

    एसने तर जणू काही माझ्या दुखावलेले मन जाणून घेऊन आपल्या विविध लीलांनी माझ्या चेहऱ्यावर हसू उमटविले. दोन दिवसांतच माझ्याबरोबर सावलीसारखा वावरायला लागला. महाजन कुटुंबीयांकडे तर अगदी त्यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे बस्तान बसविले. पण त्याच्या दत्तक प्रक्रियेमध्ये बाधा नको म्हणून मनाला आवर घालून योग्य उपाययोजना तसेच अतिशय उत्तम प्राणीप्रेमी घर शोधले आणि एसला त्यांच्याकडे हस्तांतरित करून थोड्या जड, पण समाधानी मनाने भारतातून लंडनला परतलो. आज एस त्याच्या नवीन घरात चांगलाच रुळला आहे. राहुल आणि त्याची पत्नी मुलाप्रमाणे एसचा सांभाळ करीत आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    By Team AvaantarJune 21, 2026

    सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं……

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे 

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 340
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 467
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 738
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.