Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक
    ललित

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJune 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक, अमित महाजन, मेधावी एक स्वैर अनुवाद, जगभरातील प्रसिद्ध कथालेखक, वीस कथांचा स्वैरअनुवाद, 20 कथांचा स्वैरअनुवाद, देशोदेशीच्या माणसांची भेट
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. अमित महाजन यांच्या ‘मेधावी : एक स्वैर अनुवाद’ या पुस्तकात जगभरातल्या प्रसिद्ध कथालेखकांच्या निवडक कथांचा स्वैर अनुवाद आहे. वेगवेगळ्या लेखकांच्या वीस कथा यात समाविष्ट केल्या आहेत. अल्बर्ट कामू, गाय मोपासा, ऑस्कर वाइल्ड,चेखोव वगैरे लघुकथेवर आपली अमीट छाप सोडणाऱ्या लेखकांच्या सशक्त कथा देशोदेशीची खबर घेऊन येतात. रशियन, ब्रिटीश, फ्रेंच आणि भारतीय लेखकांच्या 19व्या आणि 20व्या शतकातल्या गाजलेल्या कथा माणसाच्या अंतरंगाचे रहस्य उलगडून सांगायचा प्रयत्न करतात. लघुकथेत कमी शब्दांत आपले विचार मांडायचे असतात तेही रंजकतेने! फापटपसारा करून चालत नाही. कथा विसविशीत असून चालत नाही. नेमका अर्थ पोहोचवणे आणि साहित्यिक मूल्य जपणे, ही तारेवरची कसरत करावी लागते.

    लेखकाने निवडलेल्या सर्वच कथा अप्रतिम आहेत. त्यांची निवड चोखंदळपणा दर्शवते. त्यांनी मनोगतात लिहिले आहे की, त्यांनी कथा निवडताना दोन मापदंड समोर ठेवले – जगातल्या प्रत्येक मनुष्याकडे असलेल्या संवेदना आणि त्यांचे कालातीत असणे!

    अनुवादकाला दोन्ही भाषांत असलेल्या शब्दांच्या छटांचे ज्ञान असावे लागते. मूळ भाषेतील कथेचा वाचकाने घेतलेला अनुभव अनुवादित भाषेत यावा लागतो. लेखक डॉ. अमित महाजन असा परिणाम साधण्यात यशस्वी झाले आहेत. अनुवाद करणे सोपे काम नाही.

    हेही वाचा – Bookshelf : …म्हणूनच पडघवली अमर साहित्यकृती!

    पहिली कथा गुलामी. गुलामीतून मुक्त होण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा एक दिवस स्वतंत्र होतो, पण त्याला स्वातंत्र्य पेलते का? हेक्टर ह्यू मन्रोची कथा चकवा. नॉर्मन गोर्टस्बी आसपासच्या माणसांवर कल्पनेने दुःखाचे कलम करून पाहत असताना त्याला वास्तविक जगाचा चेहरा दिसतो. क्विस्टची नरक नावाची रूपककथा, अल्बर्ट कामूची मुलांची शाळा चालवणाऱ्या दरूच्या आयुष्यात आलेल्या पाहुण्याची कथा… गाय द मोपासाची अंकल ज्युल्सची कथा आणि जॉर्ज ओरवेलची फाशी नावाची कथा दुःखाचे वेगवेगळे रंगपोत दाखवतात.

    ऑस्कर वाइल्डच्या लक्षाधीश मॉडेल कथेचा शेवट चक्रावून टाकतो. हैदरच्या कथेत उच्चभ्रू वर्गाचे बेगडी समाजकार्य, गरिबांचा खोटा कळवळा आणि गरिबांचे वास्तव याचा अनुभव एकच वेळी घेणारी कथेची निवेदिका एका खऱ्या पण असफल प्रेमाची साक्षी होते. मृत मुलाच्या दुःखाचे ओझे वाहताना त्यावर फुंकर घालणारा फादर लिली या हेल्डर लॅकनेसच्या कथेत लिलीचे आणि एन.एन.चे नाते, प्रसिद्ध पियानीस्ट आणि म्हातारीचे नाते असलेली मोपासाची कथा एक जगावेगळा अनुबंध दाखवतात.

    हेही वाचा – Bookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!

    लुई पिरांदेलोची वॉर नावाची कथा दुःख सापेक्ष असतं हे पटवून देते. ही लहानशी कथा माझ्या मनात रेंगाळत राहिली. या सगळ्या कथांचे लेखक ‘हे असे असे घडले’ एवढेच सांगतात, त्यावर स्वतःची मते नोंदवत नाहीत, दोषारोप करत नाहीत.

    अशा वीस कथांतून देशोदेशीच्या माणसांची भेट होते. कथालेखक माणसाच्या आयुष्यातले सुखदुःख शोधत जात असतो. देश कुठलाही असो माणसे सारखीच असतात! त्यांच्या भोवतालाचा, संस्कृतीचा त्यांच्यावर पगडा असतो म्हणून ती वेगळी भासतात. समर्थ कथालेखक नाजूकशी नस पकडून त्याभोवती खिळवून ठेवणारी कथा गुंफतात. अशा कथांचा अनुवाद वाचायला मिळाल्यामुळे वाचकासाठी लघुकथांच्या विशाल आणि मनोवेधक जगाचे दार उघडले आहे. लेखकाचे यासाठी मनःपूर्वक आभार.

    कथाविश्वाची झलक दाखवणारे हे पुस्तक वाचायला हवे!

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026 ललित

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026 ललित

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    By शोभा भडकेJune 21, 2026

    भाग – 31 “ओ… मी राहीले ना,” पवन राम आणि सियाच्या मागे निघाला तोच मागून…

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु 

    June 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 335
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 462
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 21
    • ललित 722
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.