Author: रश्मी परांजपे

Avatar photo

रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

मागील लेखात आपण बालगटातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेतील खेळ शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. वास्तविक, खेळ हा मुलांच्या आवडीचा विषय आहे. खेळाच्या विविध उपक्रमांतून मुले शाळेत रमतात. आता आपण बालशाळेतील वर्गांतून घेतल्या जाणाऱ्या विविध खेळांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. खेळगटातील खेळ शिक्षण धावणे बॅट-बॉलशी खेळणे साधनांशी खेळणे शिशुगटातील खेळ शिक्षण धावणे बॅट-बॉल एकमेकांशी खेळणे बेडूक उडी घसरगुंडी सीसॉ लोंबकळणे हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण बालगटातील खेळ शिक्षण धावणे बॅट-बॉल समूह खेळ सशाची उडी बटाटा शर्यत Jumping Bed लोंबकळताना एक हात सोडून पुढील कडी पकडणे रिंग फेकणे – झेलणे बालशाळेतील खेळ शिक्षणाचे फायदे…

Read More

मागील लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला शिशुगटातील जीवन व्यवहारातील विविध उपक्रमांची मुलांकडून उजळणी करून घेण्यात येते. मुलं हे उपक्रम साधारणतः पहिल्या आठवड्यातच चांगल्या प्रकारे करू लागतात. बालगटातील मुलांना उपक्रम देताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे या तत्त्वाचा अवलंब करण्यात येतो. मुलांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. जीवनव्यवहार शिक्षणातील उपक्रम कपड्यांचा घड्या घालणे रुमालाच्या घडीनंतर छोट्या बाळाचे कपडे मुलांना घडी घालण्यासाठी दिले जातात. अगोदर कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या हे दाखवून नंतर मुलांकडून सराव करून घेण्यात येतो. वर्गवारी करणे बालगटातील मुलांना सारख्या दिसणार्‍या भाज्या दाखवून त्यांची…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेतील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेऊन जीवनव्यवहार शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. नंतर आपण खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. खेळगटातून शिशुगटात आलेली मुलं थोडी समजूतदार झालेली असतात. सुरुवातीला खेळगटातील जीवनव्यवहारातील विविध उपक्रमांची मुलांकडून उजळणी करून घेण्यात येते. मुलं हे उपक्रम साधारणतः पहिल्या आठवड्यातच चांगल्या प्रकारे करू लागतात. तद्नंतर, मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांचे उपक्रम दिले जातात. अशाच काही उपक्रमांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. जीवनव्यवहार शिक्षणातील उपक्रम कपड्यांच्या घड्या घालणे सुरुवातीस रुमालाची घडी घालायला शिकवावी. रुमालाची टोके जुळवून घडी कशी घालायची हे शिक्षिकेने दाखवावे आणि नंतर…

Read More

मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या आणि पुढील दोन लेखांत आपण बालशाळेतील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. जीवनव्यवहार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, जीवन व्यवहार म्हणजे आपण दैनंदिन जीवनात करत असलेली नित्य कामे, वागणूक आणि परस्पर संवाद होय. जीवनव्यवहार शिक्षणात मुलांच्या वयोगटानुसार त्यांना दिलेल्या विविध उपक्रमांचा समावेश होतो. तसेच, घरात देखील मुलांकडून लहान-सहान कामे करून घेतली जातात. बालशाळेच्या तीन गटांतील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेण्यापूर्वी जीवन व्यवहार शिक्षणातून मिळणारे फायदे जाणून घेणे नक्कीच यथार्थ होईल. जीवनव्यवहार शिक्षणाचे फायदे श्रमप्रतिष्ठा : कोणतेही काम हलके नसते, त्यामुळे कोणतेही काम करताना लाज वाटता कामा नये,…

Read More

मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात. बालगटातील मुलांकडून सुरुवातीला शिशुगटातील विज्ञान अभ्यासाची उजळणी करून घ्यावी. बालगटातील विज्ञान शिक्षण पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात येते : आता आपण वरील मुद्दे लक्षात घेऊन बालगटात विज्ञान शिक्षण कसे दिले जाते याबाबत जाणून घेऊ. रूंद जीना – खेळातून शिक्षण गुलाबी मनोरा आणि लांब जीना या शैक्षणिक साहित्याचा परिचय दृढ झाल्यावर रूंद जीना लावायला शिकवतात. समान लांबीचे पण 1 ते 10 सें.मी. रूंद असे 10 लाकडी ठोकळे घेतले जातात. नंतर 1, 2, 3 ते 10 सें.मी. अशा रुंदीचे ठोकळे जोडून लावायला शिकवतात.…

Read More

मागील लेखात आपण खेळगटातील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात. शिशुगटातील विज्ञानाची तोंडओळख पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात येते : आता आपण वरील मुद्दे लक्षात घेऊन शिशुगटातील विज्ञान शिक्षण कसे दिले जाते याबाबत जाणून घेऊ. गुलाबी मनोरा आणि लांब जीना यातून लहान – मोठा आकार तसेच कमी – जास्त लांब असा तौलनिक अभ्यास शिकविण्यास सुरुवात केली जाते. गुलाबी ठोकळा मनोरा खेळातून विज्ञान या खेळात 1 सें.मी. ते 10 सें.मी. या मापाचे चौरसाकृती लाकडे ठोकळे म्हणजे चिती यांचा वापर करण्यात येतो. सर्वात खाली 10 सें.मी.चा मोठा ठोकळा ठेवून त्यावर एकावर एक तुलनेने लहान…

Read More

मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील गणित शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण टप्प्याटप्प्याने बालशाळेतील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत. या लेखात आपण खेळगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात. वास्तविक खेळगटातील मुलं एवढी लहान असतात की, या वयात त्यांना विज्ञान हा विषय काय शिकवणार, असा प्रश्न साहजिकच पडतो आणि हे खरंही आहे. या गटातील मुलांना खेळ, गाणी, गप्पागोष्टी याबरोबरच भाषा, गणित आणि हस्त व्यवसाय या विषयांची ओळख करून देण्यात येते. खेळगटातील विज्ञान शिक्षण अभ्यासक्रम विज्ञानासारखा विषय मुलांनी शिकणे अपेक्षित नाही. पण विज्ञान शिक्षणास उपयुक्त अशा काही संज्ञा मुलांना माहीत करून दिल्या जातात. तसेच मुलांना शरीरातील अवयवांची नावे सांगून ओळख…

Read More

मागील लेखात आपण शिशुगटातील गणित शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण या लेखात बालगटातील गणित शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बालगटातील मुलांकडून चित्रे वस्तू मोजून 1 ते 10 अंक लिहिण्याचा सराव करून घेण्यात येतो. बालगटातील गणित शिक्षण अभ्यासक्रम बालगटात संपूर्ण वर्षभरात 1 ते 100 अंक ओळीने म्हणणे – लिहिणे, गाळलेले अंक ओळखून लिहिणे तसेच वस्तू मोजून लिहिणे हा अभ्यासक्रम असतो. हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण अभ्यासक्रमातील विविध मुद्दे आणि पद्धती अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने पुढील मुद्दे आणि पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण थोडक्यात सांगायचे झाल्यास,…

Read More

मागील लेखात आपण खेळगटातील गणित शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण या लेखात शिशुगटातील गणित शिक्षणाबाबत जाणून घेणार आहोत. खेळगटात मुले गाण्यातून तसेच खेळातून 1 ते 10 अंक जाणून घेऊन तोंडी म्हणायला शिकतात. शिशुगटात पहिल्या महिन्यात या अभ्यासाची उजळणी केली जाते. नंतर या अभ्यासाचे दृढीकरण करण्यात येते आणि हाच शिशुगटात गणित शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे. अंक अभ्यास दृढीकरण शिशुगटात गणित अभ्यासाच्या दृढीकरणासाठी खालील पद्धतींचा अवलंब केला जातो. हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण लेखी गणित शिक्षण वरील अंक दृढीकरण तोंडी पद्धतीनुसार करताना अंक लिखाणही शिकवले जाते. अंक लिखाण साधारणपणे शिशुगटात मुलांकडून वस्तू मोजून अंक लिहिणे अपेक्षित…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची शिशुगटासंबंधित सविस्तर माहिती घेतली. आता या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची बालगट या वर्गासंबंधित माहिती घेणार आहोत. खेळगटात आणि शिशुगटात सुरु झालेले शिक्षण बालगटात अधिकाधिक विकसित होत जाते. बालगटातील भाषा शिक्षणासाठी खालील दोन पद्धती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. 1.  मुलांना विविध चित्रे दाखवून त्यांचे वाचन करण्यास शिकवतात. चित्रवाचन म्हणजे चित्रात काय काय दिसते याचे वर्णन करणे. यासाठी घर, शाळा, बाग, जंगल आणि तत्सम चित्रे यांचा उपयोग करण्यात येतो. 2.  मुलं आईवडील तसेच इतर कुटुंबीय यांच्याबरोबर बाहेर जातात. उदाहरणार्थ दुकान, भाजी मंडई, सर्कस, सहल, देऊळ इत्यादी. तिथं काय…

Read More