Author: रश्मी परांजपे

Avatar photo

रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची खेळगटासंबंधित सविस्तर माहिती घेतली. आता या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित माहिती घेणार आहोत. शाळेतील बाई तसेच मित्र-मैत्रिणी आपल्याच भाषेत आपल्याशी बोलतात, या गोष्टीचा आनंद होऊन मुलं त्यांच्याशी हळूहळू संवाद साधू लागतात. यात त्यांची झपाट्याने प्रगती होते. कित्येकदा मुलांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा आपल्याला ऐकत राहाव्याशा वाटतात आणि गप्पा ऐकताना मजा तर येतेच आणि आनंद देखील वाटतो. मुलं आपल्या बाईंशी पण आपलेपणाने गप्पा करतात. हे संवाद अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मुलांचा शब्दसंग्रह वाढणे गरजेचे असते. हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण मुलांनी जास्तीत…

Read More

मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची सविस्तर माहिती घेतली. आता या आणि पुढील लेखांत आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या अत्यंत महत्त्वाचा विषयासंबंधी जाणून घेणार आहोत. यात मातृभाषा शिक्षण गृहीत धरले आहे. मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. सगळ्यांशी संवाद साधण्याचे हे साधन आहे. यातूनच भाषा शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत. वास्तविक, मुलांचे भाषा शिक्षण जन्मापासूनच सुरू होते. आई आपल्या बाळाशी सतत बोलण्यातून संवाद साधत असते. तसेच, घरातील कुटुंबीय देखील बाळाशी बोलत असतात. यातूनच मुलाच्या भाषा शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. काही…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची बालगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत. बालगटातील मुलं आता थोडी मोठी झालेली असतात. बाई आपल्याला काय सांगतात, कशी कृती करायला सांगतात, याकडे मुलं आता लक्ष देऊन ऐकतात. मुलांना आता तेवढी समज आलेली असते. म्हणून मुलांना जरा अवघड स्वरुपाचा हस्त व्यवसाय देण्यात येतो. हस्त व्यवसायात कागदकाम, ठसेकाम आणि चित्रकला या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. आता आपण या उपक्रमांबद्दल माहिती घेऊयात – कागदकाम फाडकाम आणि चुरगाळाकाम सुरुवातीला मुलांकडून फाडकाम आणि चुरगाळाकाम याची उजळणी करून घ्यावी. मुलं…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत. शिशुगटातील हस्त व्यवसायात कागदकाम, ठसेकाम आणि चित्रकला या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. शिशुगटातील मुलं थोडी मोठी असतात. यामुळे स्थुलाकडून सूक्ष्माकडे या तत्वाचा अवलंब करताना मुलांना जरा अवघड स्वरुपाचा हस्त व्यवसाय देण्यात येतो. कागदकाम फाडकाम कागदकामातील फाडकामासाठी मुलांना रंगीत पतंगी कागद देतात. फाडकाम करताना अंगठा आणि पहिली दोन बोटे यांचा वापर होत असल्याने लेखनाची पूर्वतयारी सुरू होते. मुलं सुरुवातीला कागदाचे मोठे-मोठे तुकडे करतात आणि नंतर लहान-लहान तुकडे करायला शिकतात.…

Read More

मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील मुक्त व्यवसाय या विषयाची खेळगट, शिशुगट आणि बालगट या वर्गांसंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्तव्यवसाय या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. बालशाळेतील हस्तव्यवसाय हस्तव्यवसाय हा बालशाळेतील मुलांचा खूप आवडीचा विषय असून मुलं शाळेत रमण्यासाठी याचा खरोखरच चांगला उपयोग होतो. आधी सांगितल्याप्रमाणे स्थूलाकडून सूक्ष्माकडे या तत्वाचा अवलंब या विषयात देखील करण्यात येतो. हस्तव्यवसायात विविध उपक्रमांचा समावेश होतो : कागदकाम (ओरिगामी) या विभागात फाडकाम, चुरगाळाकाम आणि घडीकाम यांचा समावेश होतो. ठसेकाम या विभागात शिक्षिका वहीवर चित्रे काढून देतात. ठसेकामासाठी रंगीत शाई तसेच वेगवेगळे रंग वापरले जातात. चित्रकला यात चित्रे काढणे आणि रंगविणे यांचा…

Read More

मागील दोन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील मुक्त व्यवसाय या विषयाची खेळगट आणि शिशुगट या वर्गांसंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटाशी निगडित मुक्त व्यवसाय या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. बालगटातील मुलं थोडी मोठी झालेली असतात. शिशुगटाचा अनुभव असल्याने बालगटातील मुलं मुक्त व्यवसाय सफाईने करू शकतात. आता आपण मुक्त व्यवसायातील विविध उपक्रमांबद्दल माहिती घेऊ. फाडकाम रंगीत पतंगाच्या कागदांचे फाडकाम मुलं व्यवस्थितपणे करतात. यामुळे मुलांच्या हस्त लेखन कौशल्यास हातभार लागतो. चुरगाळाकाम फाडलेल्या कागदांचे तुकडे दिल्यास मुलं चुरगाळे अधिक चांगल्या पद्धतीने बनवतात. त्यांनी बनवलेले चुरगाळे छान बारीक तसेच घट्ट होतात. हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय चिकटकाम मुलांना कागदाचे रंगीत…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील विविध विषयांबद्दल जाणून घेतल्यानंतर मुक्त व्यवसायाचा अर्थ आणि मुक्त व्यवसायाचे स्वरूप समजावून घेतले. तद्नंतर आपण अभ्यासाची सुरुवात खेळगटातील मुक्त व्यवसाय या विषयापासून केली. आता आपण या लेखात शिशुगट या वर्गासाठी मुक्त व्यवसाय या विषयासंबंधी माहिती घेऊयात. शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय खेळगटातून शिशुगटात आलेल्या मुलांना मुक्त व्यवसायाची ओळख झालेली असते. त्यामुळे आता या मुलांना मुक्त व्यवसायातील पुढील आणखीन काही व्यवसाय द्यावे लागतात. फाडकाम फाडकामासाठी मुलांना रंगीत पतंगी कागद द्यावे लागतात. अगोदर सांगितल्यानुसार मुलं फाडकाम करताना अंगठा, पहिले बोट आणि मधले बोट यांचा उपयोग करायला हळूहळू शिकतात. अशा फाडकामामुळे मुलांचा लेखनाचा आरंभ सुकर होतो. हेही वाचा – बालशाळेतील…

Read More

मागील लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा आणि त्यातील समाविष्ट विषय याबाबत सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील एकामागोमाग एक विषयांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासाची सुरुवात आपण ‘मुक्त व्यवसाय’ हा विषय घेऊन करुयात. मुक्त व्यवसाय म्हणजे काय? सोप्या भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने सांगायचे झाल्यास मुक्तव्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे मुलं त्यांच्या मनात येईल तसे आणि त्या पद्धतीनुसार करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलं मुक्त व्यवसाय करत असताना शिक्षिकेने मार्गदर्शन करायचे नसते, मात्र तिने मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अपेक्षित असते. मुलं मनात येईल तसं, त्यांना दिलेले विविध व्यवसाय पूर्ण करत असतात. मुलं वर्गात एकमेकांशी खेळत असतील तर, ती भांडण-मारामारी न…

Read More

या लेखाची सुरुवात आपण आत्तापर्यंतच्या सर्व लेखांतून घेतलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेऊन करुयात. पहिल्या दोन लेखांत आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता का आहे आणि शालेय प्रवेशाची तयारी कशी करावी, हे जाणून घेतले. पुढील चार लेखांतून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांच्या विविध जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन घेतले. तद्नंतरच्या सात लेखांमधे आपण प्रवेशोत्तर शाळेच्या जबाबदाऱ्या याविषयी टप्प्याटप्प्याने सखोल माहिती आणि मार्गदर्शन घेतले. या विषयांतर्गत विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी, माहितीपत्रक, शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता, मुलांची सुरक्षितता आणि शाळा व वर्ग सजावट या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले. आता या लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमाची रूपरेषा समजावून घेणार आहोत. अभ्यासक्रमाची रूपरेषा मुलं जेव्हा पहिल्यांदा शाळेत येतात, तेव्हा ती अडीच ते…

Read More

मागील लेखांतून आपण नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना शाळेच्या जबाबदाऱ्या या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसंबंधित आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत महत्त्वाची माहिती घेतली. आता या लेखात आपण शाळेची तसेच वर्गाची सजावट याविषयी माहिती घेऊयात. हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता थोडक्यात, शाळेतील भिंती, परिसर आणि वर्ग सर्व काही बोलके, मुलांचे लक्ष वेधून घेणारे, मुलांना छान वाटेल आणि आवडेल असे असल्यास मुलांना शाळा नक्कीच हवीहवीशी वाटेल. शाळेची आणि वर्गाची सजावट मनमोहक, प्रसन्नदायक तसेच मुलांच्या शिक्षणास पूरक असावी म्हणजे मुलांच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात…

Read More