Author: ॲड. कृष्णा पाटील

मोबाइल – 9372241368

भाग – 1 मोठ्ठं, नक्षीदार कमानीचं लोखंडी गेट आणि समोर भव्य आवार. गेटच्या समोर दोन-तीन अलिशान पांढऱ्या शुभ्र गाड्या आणि आवारात इकडून तिकडे फिरणारे कार्यकर्ते. मोबाइलवर बोलणारे कांजीच्या खादी कपड्यातले काही नेते आणि धावपळ करणारे खाकी वर्दीतले नोकर. शिट्या वाजवणारे वॉचमन आणि हातातल्या रंगीत फाईली सावरत इकडून तिकडे फिरणारा पीए. ‘आमदार साहेब बाहेर कधी येतील,’ असे वारंवार विचारणारे लोक… सगळीकडे सगळ्यांचीच लगबग आणि गडबड. ही गर्दी न्याहाळत त्या गेटजवळ उभा राहिलेला नामदेव मात्र शांत होता. त्याच्या अंगावर धुतलेला, पण फिकट झालेला पांढरा शर्ट होता. कमरेला जुनी पॅन्ट होती. पायात घासून झिजलेल्या चपला होत्या. डोक्यावर उन्हाचा तडाखा लागू नये म्हणून खांद्यावर…

Read More

दिवस उगवायला ते घराबाहेर पडणार होते. तसं कालच ठरलं होतं. परंतु सकाळचे नऊ-साडेनऊ झाले तरी काही हालचाल नव्हती. बाहेर रखरखीत ऊन पडलं होतं. खरं म्हणजे बंटी शेठचा घरातनं पाय निघत नव्हता. न राहून ड्रायव्हरने दोन वेळा हॉर्न वाजवला. दारात गाडी येऊन बराच वेळ झाला होता. तरीही बंटी शेठ घरातून हालत नव्हते. रंगू पुढे झाली आणि झटक्याने म्हणाली, “कोर्ट बंद झाल्यावर वकिलांकडे जायाचं आहे का? आठ दिवस झालं चाललंय… आज जाऊ, उद्या जाऊ… आज तरी जायाचं हाय का न्हाय?” बंटी शेठ पटकन उठले. त्यांनी पान खायची पिशवी बरोबर घेतली. चपचपीत तेल लावलेल्या केसावर कसा तरी कंगवा फिरवला. अंगणात उभ्या असलेल्या पांढऱ्या…

Read More

भाग – 2 स्कॉर्पिओने वळण घेतलं आणि एका हॉटेलसमोर गाडी थांबली. महेशराव विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. शरद नाना म्हणाले, “वॉशरूमला जाऊया. थोडा चहा घेऊया… म्हणजे फ्रेश वाटेल.” टेबलवर चहा आला सर्वजण चहा घेऊ लागले. चहा घेत घेत महेशराव म्हणाले, “हे स्थळ घेरडीच्या विलास नानाने सुचवले आहे. त्याने स्वतः जाऊन खात्री केली आहे. मुलीचं नाव वैशाली आहे. वडील किराणा दुकानात अकाऊंटंट आहेत. आई शेतमजुरी करते. मुलगी बी.ए. झालेली आहे. बोलण्यात गोडवा आहे. वागण्यात साधेपणा आहे. अत्यंत मनमिळाऊ आहे. रोज संध्याकाळी आजी-आजोबांच्या फोटोसमोर दिवा लावल्याशिवाय घरी कोणी जेवत नाहीत. वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. अत्यंत सुसंस्कृत कुटुंब आहे. त्यामुळे गेल्या वेळेसारखा आपल्याला अनुभव…

Read More

भाग – 1 “हल्ली मुलींच्या आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हेच समजेनासं झालंय. मुलीचं लग्न ठरवताना त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मुलाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. जावयाला सरकारी नोकरी हवी. फक्त नोकरी नव्हे, तर मोठ्या पदावरची हवी. पगार भरपूर हवा. गावाकडे जमीन हवी. शहरात फ्लॅट हवा. चार चाकी गाडी हवी. भविष्यात अजून मोठं पद मिळणार, याची खात्री हवी. आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. मुलगा नम्र, आज्ञाधारक आणि मुलीला ‘राणी’सारखं ठेवणारा हवा. मुलीच्या माहेरच्यांनी त्याच्या स्वाभिमानावर रोज पाय ठेवला तरी, तो हसतमुख रहायला हवा! एकूणच काय तर मुलीच्या आई-वडिलांना मुलगा नको असतो… त्यांना एक ‘पॅकेज’ हवं असतं. बरं, पॅकेज तर…

Read More