Author: Team Avaantar

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. डिसेंबर हा महिना माझ्या वाढदिवसाचा. मला माझ्या वाढदिवसाचं कायमच अप्रूप वाटत आलं आहे. तसं पाहिलं तर, सगळ्यांनाच असतं. आमच्याकडे पहिली 5 वर्षं वाडी भरून वाढदिवस साजरे करायची पद्धत आहे. त्यानंतर कधी सेलिब्रेशन केल्याचं आठवणीत नाही. कोणी शुभेच्छा दिल्याचं सुद्धा आठवणीत नाही. थोडं मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये, नाटक किंवा शूटच्या ठिकाणी कोणी ना कोणी शुभेच्छा द्यायचे. पण हे व्हॉट्सॲप, फेसबुक आल्यापासून कोण कोण आणि कितीजण वाढदिवसाला शुभेच्छा देतात, भेटवस्तू मिळतात… सगळा आनंद आणि खूप मज्जा वाटते! हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग… जसं मला कोणी शुभेच्छा दिलेल्या आवडतात, तसं मला इतरांना शुभेच्छा…

Read More

माधवी जोशी माहुलकर शॅलोट्स हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळणारा छोट्या आकाराच्या कांद्याचा प्रकार आहे. हे कांदे आकाराने अगदी लहान असल्यामुळे यांना भाजीवाल्यांकडे ‘बेबी ओनियन’ही म्हटले जाते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात या कांद्याचा वापर न चिरता सांबार, भाजीत केला जातो. सलाड, सूप, सॅास, फ्राईड राइस, व्हिनेगर, साल्सा, ड्रेसिंग अशा अनेक पाककृतींमधे शॅलोट्स वापरले जातात. स्लाइस करून गरम तेलात कुरकुरीत तळून बर्गर, स्ट्यू किंवा सलाडवर टॉपिंग म्हणून याचा वापर करतात. अंड्याचे पदार्थ, पास्ता सॅास तसेच साऊथ इंडियन बिसीबेळे भातामध्ये शॅलोट्सचा वापर करतात. कांद्यापेक्षा थोडे सौम्य आणि किंचित गोड असलेले हे शॅलोट्स थोडीफार लसणाची चव बाळगून असतात. उष्ण आणि दमट हवामान या…

Read More

पराग गोडबोले साने काका म्हणजे अगदी आदर्शवादी व्यक्तिमत्व. गांधीवादी विचारसरणीचा मेरूमणी. साधी राहणी, उच्च विचारसरणी अगदी जन्मभर जपलेली… नशीब, बुशशर्ट आणि पॅन्ट तरी घालतात. पंचा नेसून लाज अगदीच उघड्यावर पडेल, म्हणून हा पोशाख नाईलाजाने स्वीकारलाय म्हणे त्यांनी. जुनं ते सोनं यावर त्यांचा अगदी ठाम विश्वास. जुना खरखरणारा रेडियो, खिळखिळी झालेली, गंजलेली आणि गांजलेली जुनीपुराणी सायकल, हल्ली फक्त बाळांसाठी वापरले जाणारे, पण यांचे अत्यंत आवडते असे लंगोट, या सगळ्या वस्तूंचं प्राणपणाने रक्षण करण्याकडे यांचा ओढा… जग काही का म्हणेनात मग! लंगोट आरोग्य रक्षणा करता चांगला असतो यावर त्यांचा ठाम विश्वास, म्हणून अजूनही त्याला कवटाळून बसलेले साने काका म्हणजे मूर्तीमंत नमूना आहेत.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें । ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥483॥ मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥484॥ तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥ ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥486॥ तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज नशिबाची भक्कम साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे गती घेतील. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन आणि संतती या दोन्ही आघाड्यांवर शांतता असेल. वृषभ – व्यवसाय चांगला राहील, परंतु थोडे सावध राहण्याची गरज आहे. परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे कोणताही धोका पत्करणे टाळा. अनावश्यक वाद किंवा अडचणीत अडकू शकता. जोडीदार आणि संततीशी संबंध सामान्य राहतील. मिथुन – आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आनंदी रहाल आणि दिवस काहीसा सुट्टी असल्यासारखा वाटेल. नोकरी, कौटुंबिक जीवन, संतती, आरोग्य आणि व्यवसाय -…

Read More

शोभा भडके भाग – 6 “आई आरुला काय झालं… ती रडत होती,” भावनाने डायनिंग टेबलजवळ बसत विचारलं. “काय, सकाळी सकाळी आरु रडत होती? आता काय केलंस पवन?” प्रकाशराव चेअरवर बसत पवनला रागवत म्हणाले. “बाबा मी काही नाही केलं…” पवन. “कसं तू काही नाही केलं? तूच तिला सारखं चिडवत असतोस…” नाश्त्याला सुरुवात करत भावना म्हणाली. “तू गप्प गं! …काय खायला सुरू केलंस लगेच? जा तिला घेऊन ये नाश्ता करायला… आणि हा दादा कुठे राहिला?” – पवन. “मी का जाऊ? तू रडवलंस, तू जा… मला लेट होतोय कॉलेजला जायला…” ती नाश्ता संपवत म्हणाली. या दोघांचा वाढता वाद पाहून आत्या मधे पडत म्हणाली,…

Read More

दिलीप कजगांवकर ‘शेखर, अजय, रमेश, राधा, मुग्धा अशा अनेक मित्र-मैत्रिणींना मेसेज आला… ‘शालेय मित्र-मैत्रिणी’ या ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे!’ शाळा सोडून जवळजवळ 50 वर्षे झाली होती. शाळेनंतर पुढील शिक्षण, नोकरी, लग्न अशा विविध कारणांमुळे मित्र विखुरले गेले. काही मित्र आठवणीत होते तर, काहींचे फक्त नावच आठवत होते. कोण कुठे आहे, याची कल्पना नव्हती. कसे कोणास ठाऊक, पण राज नावाच्या मित्राने त्याच्या शाळेतील मित्रांचे फोन नंबर्स मिळवले आणि ‘शालेय मित्र-मैत्रिणी’ हा व्हॅाट्सअॅप ग्रुप तयार केला. ग्रुपमध्ये अनेक मेसेजेस येऊ लागलेत, मित्रांशी फोनवर बोलणे सुरू झाले. कुठे असतो? शाळेनंतर काय केले? नोकरी कुठे केली? लग्न कधी केले? बायको कुठली? की वर्ग मैत्रिणींपैकीच…

Read More

कामिनी व्यवहारे साहित्य हेही वाचा – Recipe: सुरणाची अशी भाजी टेस्ट केली आहे का? कृती हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? टिप्स तयारी करण्यासाठी लागणारा वेळ – 30 ते 40 मिनिटे वडी तयार होण्यास लागणारा वेळ – 40 ते 50 मिनिटे तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी.

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥46॥ जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥ कां जिये एकी वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥475॥ अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥ जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥477॥ तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास दिनविशेष मराठी संतसाहित्याचे चिकित्सक न. र. फाटक टीम अवांतर नामवंत पत्रकार, प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म 15 एप्रिल 1883 भोर येथील जांभळी गावात झाला. 1917 साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बीए झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदूप्रकाश, नवाकाळ या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीयलेखन केले. 1935 ते 1937 या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते. 1957 साली ते याच कॉलेजमधून…

Read More