Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांकडून एखाद्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी राहतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, याकडे लक्ष द्या. वृषभ – सोपी पद्धत आणि समन्वय यामुळे कामात प्रगती कराल. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. सुसंवाद साधण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. कामातील अडथळे दूर कराल. एकंदर आरोग्य चांगले असेल. मिथुन – नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामात सुलभतेने…
दीपक तांबोळी पॅसेंजरने उतरून मी स्टेशनबाहेर आलो. डॉक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भूक लागली होती. मी स्टेशनजवळची हॉटेल्स पाहिली, पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं, त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एक-दोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता… शिवाय, मला भूकही लागली होती! माझी पावलं आपसूकच त्या हॉटेलकडे वळली. हॉटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं, पण तरीही…
हिमाली मुदखेडकर मला अजूनही आठवतोय तो दिवस… कसा विसरणार? सतरा वर्षे झाली आज! पण अजूनही ती आठवण… ती कळ शांत होत नाही… टीव्हीवरील न्यूज पाहून हात-पाय लटपटले माझे… ताबडतोब मामाला फोन लावला… तो उचलेना म्हणून मामीचा नंबर डायल केला… ती बिचारी तिच्या घरगुती कामात मग्न! तिला कशाचा सूतराम पत्ता नाही… “मामी… अगं श्रेयस कुठाय?” “सकाळीच गेलाय तो आज. लवकर जायचे होते त्याला… आज फॉरेन डेलिगेट्स यायचे होते म्हणे व्हिजिटसाठी…” ती निवांतपणे उत्तर देत होती!… आणि तिला कसं सांगू हे मला कळत नव्हतं.. आमचा श्रेयस… लहानपणापासून शेफ होण्याचे स्वप्न त्याचे… आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती त्याने… सर्वसामान्य मध्यमवर्गात जन्माला आला…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं अनेकदा लोक अशी चर्चा करतात की ‘डॉक्टर’ म्हणजे जणू एक वेगळीच स्पिशिज आहे… ते कधी आजारी पडतच नाही किंवा औषधोपचार म्हणजे पेशंटवर प्रयोगच वगैरे वगैरे.. पूर्वी लोकं खिळा टोचला तरी मरायचे आणि डास चावला तरीही! पण अनेकांच्या अथक प्रयत्नातून, वैद्यकशास्राच्या प्रगतीमुळं मानव समूह तुलनेत कितीतरी अधिक सुरक्षित झालाय. आज अशाच एका धाडसी डॉक्टरची गोष्ट सांगतो… ऐंशीच्या दशकात अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वेटिंगरूममध्ये पोटदुखीचे पेशंट मोठ्या प्रमाणात असायचे. जठराला अल्सररूपी जखम झालेली असायची, त्यामुळं काही खाल्लं तरी पोट दुखायचं आणि उपाशी राहिलं तरी पोट दुखायचं. वेदनाशामक (Painkillers) तरी किती खायचे? डॉक्टर मंडळींनी या अल्सरचं नामकरण ‘स्ट्रेस…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥ मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी ।आरोगूं लागे ॥230॥ जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥231॥ मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥ आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुऊनि जडी । पांजरेंशीं…
दर्शन कुलकर्णी चंपाषष्ठी / स्कंदषष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि प्रगती दोन्ही घेऊन येणारा असेल. अनेक दिवसांपासून पूर्ण न झालेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा, राग आज तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो. संयम राखला तर दिवस तुमच्या बाजूने असेल. वृषभ – हा दिवस वृषभ राशीसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी दिलासा देईल. आज महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या मनःस्थितीत असाल. जुन्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा सहकाऱ्याकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. घरात शांती आणि समाधान राहील. मोठी खरेदी करण्याचा मोह होऊ…
चंद्रकांत पाटील आमचा वाडा नदीला जायच्या वाटेवर होता… वाड्याच्या समोरच्या गल्लीला ‘खालची आळी’ असे म्हणत. तिथे दोन-तीन पाटलांची घरे पुढे साळुंखे, मोरे, बाजूला देशपांडे, कुलकर्णी आणि शेवटी सुनंदा अक्काचे घर… त्यापुढे रस्ता लहान बोळवजा होई आणि मेन रोडला मिळे. त्या बोळात शेवंता काकू आणि मुक्ता अक्का या सुनंदा अक्काच्या मैत्रिणी राहात… सुनंदा अक्का म्हणजे तब्येतीने मजबूत, उंचीपुरी, डोक्याचे निम्म्याला अधिक पांढरे झालेले केस, मोठाले डोळे, पसरटनाक आणि पुढचे दोन दात किंचित बाहेर आलेले… अक्का गल्लीतून हिंडायला लागली की, लहान मुलेच काय पण, मोठी माणसे देखील टरकून असायची… असा अक्काचा दरारा होता! अशी ही अक्का नवरा वारल्याने घरात एकटीच असे. अक्काचे…
माधवी जोशी माहुलकर वर्धेवरून काल सकाळी गोरस भांडारचा गोरस पाक घरी आला आणि मग काय घरातील खारी, बिस्किटे मागे सारली जाऊन पहिल्यांदा गोरस पाक चहासोबत पोटात गेला… वा! काय अप्रतिम चव! कल का तो दिन बन गया! वर्धा जिल्ह्याचे गोरस पाक हे प्रसिद्ध असे जागतिक स्तरावरील उत्पादन आहे. वर्धेच्या मगनवाडी प्रभागात 1939 साली महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून गोसंवर्धन गोरस पाक शाळेची निर्मिती झाली. स्थानिकांना ग्रामीण आणि कुटीर उद्योगातून रोजगार मिळावा, खेडीपाडी समृद्ध आणि स्वावलंबी व्हावीत, हाच उद्देश गोरस पाक भांडारच्या निर्मिती मागे या त्रयींचा असावा. गोरस भांडार येथे आजूबाजूच्या खेड्यातील गोपालक शेतकऱ्यांकडून, ग्रामविकास समित्यांमधून,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जो मुळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥ क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥215॥ मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥ भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥217।। धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥ नाडीतें सोडवी ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मोठे आर्थिक व्यवहार टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा. कुणाचा सल्ला न घेता आज कुठलीही मोठी गुंतवणूक करू नका. कोणत्याही वादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन बघून अस्वस्थ होऊ शकता. आज मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आध्यात्मिक कार्यासाठी खर्च केला जाईल. वृषभ – दिवस शुभ आणि फलदायी राहील. व्यवसायात चांगला नफा होईल, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विवाहोत्सुक जातकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे समाजातील प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल. मिथुन – व्यवसायात यश मिळेल.…

