Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
माधवी जोशी माहुलकर तूप, साखर किंवा गूळ न वापरता हे खारीक – खोबऱ्याचे पौष्टिक लाडू करता येतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकतात. माझी मुलं 24-25 वर्षांची झाली तरी त्यांना हे लाडू आवडतात. पौष्टिक असल्याने लहान मुलांना सकाळी दुधासोबत हा एक लाडू दिला तर, ते त्यांच्या चांगलेच अंगी लागेल. डिंकाच्या लाडवासारखे हे लाडू फक्त हिवाळ्यातच करायला हवे असे काही नाही, बाराही महिने हे खारीक – खोबऱ्याचे लाडू करता येतात. महागड्या प्रोटिन पावडरचे डबे खरेदी करण्यापेक्षा हा लाडू शरीरात ऊर्जा तर निर्माण करतोच, शिवाय तुमचे आरोग्यही उत्तम ठेवतो. साहित्य हेही वाचा – Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!…
मेष या आठवड्यात सगळी कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. काम करवून घेताना वाद होण्याची शक्यता आहे, तथापि, कामासाठी सहकार्य मिळेल. व्यावसायिक वर्गाचे हाताखालच्या लोकांशी वाद होऊ शकतात. बोलताना आवाज वाढवावा लागेल, स्वतःचे वर्चस्व सिद्ध करावे लागेल. महिलांना घरात नजीकचे लोक भेटायला येतील; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करता येईल. मित्र–मैत्रिणी मदत करतील आणि तुम्हीही इतरांना मदत कराल. वृषभ या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. आराम करा. नोकरदारांनी कामाचा जास्त ताण घेऊ नये. शक्य तेवढे काम पूर्ण करून विश्रांती घ्या. सहकारी मदत करतील. व्यावसायिक वर्गाकडे नवीन प्रस्ताव येतील. त्यांचा नीट अभ्यास करून तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.…
अध्याय नववा तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होइजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥ परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥ कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ॥3॥ तुमचेया दिठिवेयाचिये वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥4॥ प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहों । येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ॥5॥ नातरी बालक बोबडां…
दर्शन कुलकर्णी माघस्नान समाप्ती पौर्णिमा समाप्ती – उत्तर रात्री 03:38 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी! दिनविशेष मराठी कोशसाहित्यकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव टीम अवांतर महाराष्ट्रातील व्यासंगी प्राच्यविद्यापंडित आणि मराठी कोशसाहित्यकार म्हणून ओळख असणाऱ्या सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1894 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या पुणे येथील संस्कृत पाठशाळेमध्ये झाले. पुढे डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची 1921 मध्ये नियुक्ती झाली. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी 1928 साली संपूर्ण ऋक्संहितेचे मराठी भाषांतर पहिल्यांदाच प्रकाशित केले. भारतीय चरित्रकोश मंडळ या…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ माणूस म्हटलं की, वर्तनातील बदल हे आलेच. मुलांच्या वर्तनातील बदल, हा चिंतेचा विषय असतो; कारण त्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांच्या वर्तनातील बदल हा खूप पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे, आता फक्त त्याबाबत जागृती झाली आहे इतकंच! लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटात वर्तनातील बदल वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. काही बदल हे वयाशी संबंधित असतात, तर काही बदलांकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे असते. हे बदल वेळीच ओळखल्यास योग्य काळजी आणि मार्गदर्शनामुळे मुलांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते. वर्तनातील बदल म्हणजे काय? मुलांच्या नेहमीच्या सवयी, भावनिक प्रतिक्रिया, बोलण्याची पद्धत, झोप, खाणे, अभ्यास किंवा इतरांशी वागण्यामध्ये…
ॲड. कृष्णा पाटील रविवार होता. सकाळची वेळ होती. आठचा सुमार असावा… कोर्टाला सुट्टी असल्याने निवांत होतो. चहा घेता घेता वर्तमानपत्र वाचत होतो. नेहमीच्याच बटबटीत बातम्या. राजकारणी नेत्यांच्या एकमेकांना शिव्या, झोपडपट्टी परिसरातील खून, कुठे मारामारी, कुठे चोरी… रविवार असूनही वाचण्यासारखं वेगळं काही नव्हतं. एवढ्यात बाहेर कडकलक्ष्मीच्या ढोलक्याचा घाईंSS घुईंSS घाईंSS घुईंSS असा आवाज येऊ लागला. मी दरवाजा उघडला. गेटसमोर कडकलक्ष्मी घेऊन फिरणारी एक महिला उभी होती. मी पुढे गेलो. पत्नी आतल्या खोलीत काहीतरी झाडलोट करीत होती. मी पत्नीला हाक मारली. कडक लक्ष्मीच्या बाईला काहीतरी देण्यासाठी आण म्हणालो. मी त्या बाईला निरखून पाहिले. डोक्यावर देवी ठेवलेली वेताच्या काड्यांची नक्षीदार बुट्टी होती. हळद…
साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
डॉ. विवेक वैद्य दुपारीच जड जेवण झाले होते… पुरणपोळी, आंब्याचा रस! त्यामुळे रात्री जेवणाची इच्छा नव्हती. तरीपण फ्रीजमध्ये ठेवलेला वाटीभर आंब्याचा रस घेतला, त्याची मधुर चव जिभेवर राहिली. घड्याळाचा काटा अकराच्या पुढे गेला आणि डोळे जड होऊ लागले. अंथरुणावर पाठ टाकली तेवढयात… “डॉक्टरसाब… डॉक्टरसाब” अशा हाका ऐकू आल्या. येणारी गुंगी झटकून उठलो. आजकाल पूर्वीसारखे रात्री येणार पेशंट खूप कमी झाले आहेत, (Thanks to Multispeciality Hospitals) तरीही कुणीतरी कधीतरी येत… खिडकी उघडून विचारले, “कोण?” “दादा, मैं सत्तार…” सत्तार माझा जुना पेशंट. गोरा, हसमुख, सुदृढ…. सफाचट दाढी असलेला… त्याच्या वडिलांपासून ओळख. माझ्या वडिलांशीही त्यांची ओळख असल्याने मी सत्तारच्या वडिलांना चाचा म्हणायचो. “क्या…
अध्याय आठवा वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् । अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥28॥ जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कां तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥261॥तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । जें परब्रह्मा निर्मळा । सांठी न सरे ॥262॥ जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचां कांटाळां न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥263॥ जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥264॥ ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखींहि आंगवणें ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसभर उत्साही राहाल. आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे करा. आवश्यकता असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या व्यावसायिक जीवनात सर्व काही ठीक होईल. दिवसभर ध्येयांनी प्रेरित राहाल. तब्येतीकडे लक्ष द्या, पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. वृषभ – आजचा दिवस खूप छान जाईल. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहील. तुमचे मन आनंदी असेल. सर्व कामे उत्साहाने आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी पूर्ण करा. कामानिमित्त प्रवास घडणे शक्य आहे. आज कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. मिथुन – तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमधून अपेक्षित परतावा मिळणार नाही. यश मिळविण्यासाठी व्यावसायिक जीवनात सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक…

