Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज फक्त स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. मोठा आर्थिक फायदा होईल. जुन्या मित्रांना भेटाल. संततीशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. तुमचा सौम्य स्वभाव कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. जोडीदाराशी तुमचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल. आज तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल. वृषभ – सध्याचा काळ नकारात्मक आहे. मात्र, गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामात सावधगिरी बाळगा. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी निगडित प्रवास तूर्तास पुढे ढकला. व्यवसायात अडथळे येतील. आरोग्याच्या लहान कुरबुरी सुरू होतील, पथ्यपाणी सांभाळा. मिथुन – सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी काळजीपूर्वक हाताळा. कामाच्या प्रगतीत अडचणी येऊ शकतात. व्यवसायातील…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार लेखिका वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1981 साली आली. त्यावेळी लगेच ते आमच्या घरी आलं, तेव्हा मी सहावी-सातवीत असेन… आई-बाबा दोघेही या पुस्तकाबद्दल बोलत असायचे आणि त्यांच्या सवयीप्रमाणे कोणाकोणाला सांगतही असायचे! त्यामुळे कुतूहलापोटी हे पुस्तक वाचलं. आईने लिहिलेली प्रतिक्रिया दुसऱ्या आवृत्तीच्या मलपृष्ठावर छापली आहे… जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एकोणीसाव्या शतकातले अमेरिकेतले प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ. हा ज्ञानयोगी संतच. कृष्णवर्णी गुलाम आईच्या पोटी जन्म झालेला हा दुबळा मुलगा पुढे विश्वविख्यात झाला. एकेकाळी अन्नान्न दशा असलेला तो अनेकांसाठी अन्नदाता झाला. ही विलक्षण कहाणी जिद्दीची, परिश्रमांची, बंधुभावाची, माणुसकीची, प्रखर बुद्धिमत्तेची आणि देशप्रेमाची सुद्धा! सध्या आपण अशा जगात…

Read More

दिलीप कजगांवकर, पुणे सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी रीना बँकेत आली. अकाऊंट उघडण्याचा फॉर्म तिने भरला आणि महत्त्वाचं काम असल्याने ती घाईघाईत बँकेतून बाहेर पडली. रीनाचा फॉर्म चेक करताना मॅनेजर साहेबांचे लक्ष तिच्या जन्मतारखेकडे वेधले गेले, कारण रीनाची आणि त्यांची जन्मतारीख एकच होती. मॅनेजर साहेबांनी रीना मॅमला फोन केला आणि सांगितले की, “मी बँकेतून बोलतोय. मॅम, तुम्ही तुमच्या सोसायटीचे नाव दिले आहे, पण फ्लॅट नंबर दिला नाही.” “साहेब, मी बँकेत येऊन फॉर्म अपडेट करून देऊ का?” “नको नको, मी ॲड करतो. तुम्ही फ्लॅट नंबर सांगा.” “फ्लॅट नंबर 21.” “ऑनलाइन बँकिंगसाठी मला तुमच्या आईंचे नाव सांगा.” “सावित्री जोशी.” “थॅंक्स. अकाऊंट डिटेल्स तुम्हाला एक-दोन…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बिटचे कटलेट आणि परोठे, पालकाची भाजी, भरली वांगी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

सतीश बर्वे भाग – 2 मी हळूहळू भानावर आलो. माझे खांदे गदागदा हलवून आई घामाने थबथबली होती. मान वर करून मी समोर बघितले तर दिवाणखान्यातून आतल्या खोल्यांमध्ये जाणाऱ्या पॅसेजला लावलेल्या पडदा अर्धवट बाजूला करून अरविंदची बायको सुचित्रा उभी होती… मी काय सांगणार आहे, ते ऐकायला! देव न करो आणि कोणावर अशी वेळ येवो. आजवर वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरील बातम्यांतून अशा अपघाताने घरादारावर पसरलेली शोककळा आपण वाचलेली आणि बघितलेली असते. पण आज तोच प्रसंग आमच्या घरात घडला होता! पुढच्या काही क्षणांत जेव्हा मी तोंड उघडून फोनवर काय ऐकलं ते सांगणार होतो आईला… मन बिलकुल धजावत नव्हतं, पण आणखी वेळ दवडून चालणार नव्हता…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा परि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधान कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥24॥ कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥25॥ सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥26॥ अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥27॥ म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥28॥ अहो चंद्रकांतु द्रवता करि होये । परि…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आरोग्य चांगले राहील आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांनाही हा दिवस फायदेशीर ठरेल, कोणत्याही नवीन उपक्रमात यश मिळेल. घरी एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत राहील. आज एखाद्या जवळच्या आप्ताला भेटू शकाल. वृषभ – आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, म्हणून स्वतःची काळजी घ्या. अनावश्यक वाद टाळा, विशेषतः कामाच्या ठिकाणी. नवीन काम सुरू करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या, कुटुंबात मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कौटुंबिक वादात शांत राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून परिस्थिती आणखी बिकट होणार नाही. मिथुन – लांबच्या प्रवासाचे…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तशी मी लढाऊ प्रवृत्तीची बाई. आयुष्यात आलेली वाईट परिस्थिती म्हणा किंवा अजून काही… दोन हात करून लढून पुढे जात राहिले. पण एका गोष्टीत मला कधीच लढता आलं नाही… इमोशनशी (Emotion) म्हणजेच भावनांशी. बरेचदा मला ‘इमोशनल फुल्ल’ म्हटलं गेलंय. म्हणजे कसं आहे ना, मी कथा-कादंबऱ्या वाचताना भावनाप्रधान कथानक आलं की, मला रडू येतं. लहान असताना आकाशवाणीवर होणाऱ्या श्रुतिका ऐकताना पण मी रडायचे. नाटक पाहताना, सिनेमा पाहताना पण गंगा, यमुना हव्यातच! त्यामुळे झालं असं की, “ए, ही रडूबाई नको आपल्या सोबत…” असं ऐकायला मिळतं. एक वेळ अशी आली की, नवराही म्हणाला, “आता तुला…

Read More

भाग – 2 म्हाईचं आगमन होणार म्हणून दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानातून सामान आणतो, असे तिला झाले होते. त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. दीपूच्या घरात गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षांच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे. बुडीत गेलेल्या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिपूच्या बाबांना 50 हजार रुपयांचा चेक दिला होता. तो वटविण्यासाठी ते तालुक्याच्या गावी गेले होते. दोन वाजायला आले आणि दीपूची आई आत-बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहीत होते, चारच्या…

Read More

डॉ. किशोर महाबळ आत्मविश्वास असलेल्या आणि उत्तम पाठांतर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची सहसा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षक निवड करतात. असे विद्यार्थी मग अशा स्पर्धामध्ये शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणे पाठ करून सादर करतात आणि बक्षिसे जिंकतात. याच पद्धतीने बक्षीस जिंकण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना मग वक्तृत्व कला सोपी वाटू लागते. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच भाषिक बुद्धिमत्ता असते. असे विद्यार्थी संवाद कौशल्ये आणि वक्तृत्व कला सहजगत्या शिकू शकतात, त्यांना शिकण्याची इच्छाही असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांना पाठ केलेले भाषण म्हणून दाखविणे म्हणजेच वक्तृत्व असे वाटू लागले तर, मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते. ते कसे करायचे याचा आता विचार करूया. वक्तृत्व कला…

Read More