Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मयुरेश गोखले आज पहाटे 5 वाजताच श्रीरंग जागा झाला. त्याला आज ऑफिसला लवकर जायचे होते. हलकी थंडी सुरू झाली होती, रोजच्या सवयीमुळे पंखा डोक्यावर फिरत होता. मी साखर झोपेत होते, पण त्याच्या उठण्याची चाहूल मला लागली होती. तो अचानक जवळ आला, मी झोपेत आहे हे पाहून अलगद माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकले. मी खूप सुखावले. पण आज तो सकाळी जाऊन रात्री उशिरा परत येणार होता, त्यामुळे मन थोडे उदास होते. लग्न होऊन जेमतेम 4 महिने झाले असतील आणि याच्या ऑफिसची लगबग वाढतच होती. ऑफिस ही पहिली बायको आणि मी दुसरी असं वाटायला लागलं होतं. असो, आज श्रीचा मूड काही वेगळाच वाटत…
कोफ्तासाठी साहित्य सारासाठी मसाला साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप्स हेही वाचा – Recipe : बटाट्याचा बदामी हलवा शिंगाड्याची भजी साहित्य कृती टिप्स (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
मानसी देशपांडे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे मातृत्व… असं म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी…’ आई होणं खरंच सोपं असतं का? अजिबात नाही. आज माझ्यावरून हे जाणवत आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात तसं, “आपल्या जोडीदाराचं मुल वाढवणं म्हणजे त्याला अंश रुपाने स्वतःच्या शरीरात जागा देणं. स्त्री ही काही प्रमाणात आपल्या जोडीदाराची आई देखील होते. जेव्हा जेव्हा ती संघर्षासाठी उभी असते, तेव्हा ते नाते भलेही पत्नीचे असेल, पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करते, तेव्हा ते नाते आईचेच असते…” गरोदरपणात किती बदल होतात शरीरात ते प्रत्येक स्त्री अनुभवत असते. कधी खूप राग येतो, तर कधी मन आनंदात असते.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥2॥ जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥47॥ आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥48॥ मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥49॥ तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥50॥ परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥51॥ पैं…
दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:48) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. काम खूप असले तरी कठोर परिश्रमाने तुम्ही ते हातावेगळे करू शकाल. आर्थिक लाभ होईल. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतात. परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. कामानिमित्त एखादा छोटासा प्रवास कराल. आज नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल. धार्मिक आणि सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल, मात्र तुमच्या…
प्रदीप केळुस्कर भाग – 1 साल 1980… मी दहावीत होतो. आमची एसएससी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार होती. आम्ही तालुक्याच्या गावाला राहात होतो. त्यामुळे आमच्याच शहरात एसएससी सेंटर होते. पण आमच्या तालुक्यातील अन्य शाळांमधील मुलांना आमच्या शहरात परीक्षेसाठी यावे लागायचे. मग अन्य शाळांतील मुले-मुली 7-8 जणांचा ग्रुप कोणीतरी ओळखीच्या घरात एक खोली घेऊन राहायचे. एखाद्याची आई सोबत जेवण करायला यायची. दरवर्षी आमच्या घरात कुठली ना कुठली मुले यायचीच. आम्हाला पण आनंद वाटायचा. ते दहा-बारा दिवस फार गजबलेले असायचे. त्या गावातील मुलांशी आणि पालकांशी आमचा घरोबा व्हायचा. माझे वडील समाजात प्रिय. नोकरी सांभाळून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. समाजवादी विचारसरणी…
दीपक तांबोळी भाग – 2 नऊ वाजता तेजलने ओरडूनच तन्वीला जेवायची तयारी घ्यायला बोलावलं. तन्वीने पटकन जाऊन टेबलवर ताटं घेतली. पाण्याचा तांब्या, ग्लास घेतले. मयूरला बोलावलं. खरंतर, दोन्ही पोरं भुकेने कासावीस झालेली. पण ‘भूक लागली’ असं आईला सांगितलं तर, ती चिडते हे बऱ्याच महिन्यांपासून ती बघत आली होती, त्यामुळे भूक लागूनही ते एकही शब्द तोंडातून काढत नसत. तन्वीने तिला आणि भावाला वाढून घेतलं. मयूरने जेवायची सुरुवात केली. तन्वी पहिला घास घेणार तेवढ्यात तेजलने विचारलं, “तन्वी ताटं पुसली होती?” तन्वीच्या हातातला घास हातातच राहिला. “नाही.” तेजलचा पारा एकदम चढला, “कारटे तुला किती वेळा सांगितलं, वाढून घ्यायच्या आधी ताटं पुसत जा म्हणून.…
राजीव जोशी ‘ए हीरो! शुक शुक…’ हे शब्द ऐकले मी, पण लक्ष न देता चाललो होतो. ‘अरे ए दादा, बघ ना माझ्याकडे. थोडी खिचडी आहे का? पोट नाही रे भरलं अजून… भूक आहे मला…’ हे ऐकलं आणि मागे वळून बघितलं. तर सनी! साधारण पाच वर्षांचा असेल, शाळेची अर्धी चड्डी आणि वरती कोणताही आणि कोणाचाही शर्ट, तोही कायम कुठेतरी फाटलेला. आडवा भांग आणि डाव्या नाकपुडीतून कायम बाहेर डोकावणारा शेम्बुड… दिसायला सावळा, पण स्वतःला हृतिक रोशन समजणारा नव्हे, तोच माझ्यासारखा दिसतो, असं बोलणारा. मी मागे वळून बघितलं खरं, पण का माहीत नाही, मला खूप झोप येत होती. कदाचित, जास्त जेवलो असेन. “काय…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं पेशंटला “खोकून दाखवा” म्हटलं की, तो तोंडावरच खोकतो! त्यामुळं कितीही जपलं तरी, डॉक्टरलाही विशेषत:, साथीच्या काळात संसर्गाला सामोरं जावंच लागतं… आताही तीच परिस्थिती आहे. तूर्तास चहाऐवजी काढा पितोय, नियमितपणे मास्कही वापरतोय तरी मधेच एखादा पेशंट असा काही भयंकर खोकतो की, ही सगळी कवचकुंडलं तेलुगू सिनेमात दाखवतात तशी स्लो मोशनमध्ये गळून पडतात आणि सगळे संमिश्र विषाणू जणू काही चहूबाजूंनी सपऽसपऽऽसपऽऽ आवाज करत श्वसनयंत्रणेवर हल्ला करतात… घरी पोहोचतात घसा धरलेला असतो, मधेच खोकल्याची उबळ येते, अंगात किंचित तापही जाणवतो आणि एक मन “उद्या आराम करू,” असं म्हणतं, पण युद्धजन्य काळात किंवा छोट्यामोठ्या चकमकी सुरू असतात, तेव्हा तर आपली…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा श्री भगवानुवाच : इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥1॥ नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचें गुज । जीवचिये ॥34॥ येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥35॥ तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥36॥ म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो । परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥37॥ अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

