Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मानसी देशपांडे काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डेचा माहोल होता. म्हणजेच, नुकतंच प्रेम झालेले प्रियकर – प्रेयसी, तसंच प्रेमाचं रुपांतर लग्नात झालेले नवरा – बायको… सर्वच कमी-जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात. खोटं का बोला, मी पण साजरा करते! आपल्या आयुष्यात प्रेमाला खूप जास्त महत्त्व आहे आणि असायलाच हवं. एका ठराविक वयानंतर काही गोष्टी या अशा असतात, ज्या आपण आई-वडिलांशी बोलू शकत नाहीत, मग तिथे लागते आपली हक्काची, प्रेमाची व्यक्ती. हे प्रेम कसं होतं? काहींचं एका नजरेत, तर कोणी डोळ्यांच्या प्रेमात पडतं. हे प्रेमाचं गाव फारच सुंदर असतं… जिथे राग असतो, रुसवा असतो, लाडिकपणा असतो तसंच शपथा पण असतात. एकदा जीव गुंतला की,…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥228॥ परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥229॥ तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥230॥ या बोला अनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥231॥ म्हणे भलें केलें पार्था । एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥232॥ तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जग…
दर्शन कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरीच्या ठिकाणी भरपूर काम असेल आणि दिवस कामातच जाईल. तुम्ही व्यवसाय विस्ताराच्या योजना आखू शकता, परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तरीही, कुटुंबातील सदस्यांसोबतचे सकारात्मक वातावरण तुमचा आनंद वाढवेल. दूरच्या व्यक्ती किंवा संस्थांशी संबंध दृढ होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्च टाळावेत. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – व्यवसायात आर्थिक लाभ आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे देखील काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामातील यश मानसिक आरोग्य आणि आनंद देईल. मित्र आणि प्रियजनांसोबत आनंददायी भेटी होण्याची शक्यता आहे. सहलीचे नियोजन केले…
रेवती निलेश पांडे अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. माझी जवळची मैत्रीण स्नेहा दुसऱ्यांदा आत्या झाली. हॉस्पिटल माझ्या घराच्या अगदी जवळच असल्यामुळे, त्या इवल्याशा परीला बघण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी तडक तिथे पोहोचले… मी रूममध्ये शिरले, तेव्हा स्नेहा अगदी कौतुकाने आपल्या भाचीला मांडीवर घेऊन बसली होती. मला बघताच ती आनंदाने ओरडली, “अग बघ बघ, ‘डिट्टो’ माझ्यावर गेली आहे! डोळे, नाक… अगदी माझ्यासारखेच आहेत ना गं?” मी हसून म्हटलं, “अगं, आत्ता कुठे दोन-तीन दिवसांचं बाळ आहे हे, आणि तुला इतक्यात कळलंही, ही कोणासारखी दिसते ते?” तितक्यात बाळाची आजी मागून उत्साहाने म्हणाली, “अगं, तिची आई सुद्धा लहानपणी हुबेहूब अशीच दिसायची!” आणि मग…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी आहे त्याच सामुग्रीद्वारे काही नवनवीन प्रयोग केले जातात… याच टिप्स इतर महिलांनाही उपयोगी पडतात. ‘फूड कॉर्नर’मध्ये दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर डोकं दुखतं म्हणून सकाळपासून पाच गोळ्या खाल्लेला पेशंट आता इंजेक्शन घ्यायला ओपीडीत आला होता. कुलूपाला पन्नास चाव्या लावून उपयोग नसतो, ते त्याच्या एकाच चावीनं उघडतं, तद्वतच, दुखण्याच्या कारणावर उपचार केले की, दुखणं आपोआप थांबतं. आजच्या काळात लोक इतके घोळ घालतात, जेव्हा औषधशास्रच पाळण्यात होतं तेव्हा किती, कशी औषधं खात असतील लोक? मला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत टॉक्सिकॉलॉजीच्या प्रॅक्टिकलला पाच गुणांना विचारल्या जाणाऱ्या ‘त्याची’ आठवण झाली… पंधराव्या शतकात तर वैद्यकशास्रात अद्यापही उजाडायचं बाकी होतं; रोगांचं मूळ दैवी कोपात आहे असं सगळे मानायचे… जादूगार, भूतबाधा, देवाचा कोप या त्रिसूत्रीनं वैद्यकशास्त्र वेढलेलं होतं… अशातच एका रात्री स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये एका लहानश्या…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥212॥ बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥213॥ तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडे । मनपवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविलें ॥214॥ तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥215॥ तंव धारणावारू दाटिले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥216॥ तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥217॥ पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु…
दर्शन कुलकर्णी सौर वसंत ऋतू आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. अचानक एखादे गुंतागुंतीचे काम पूर्ण झाल्याने तुमच्यासमोरील अडथळे दूर होतील. आर्थिक फायदा होईल. व्यवसायात नवे करार करताना समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, सावध राहा. नोकरदारांवरी कामचा ताण वाढेल, मात्र सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ – नोकरीच्या ठिकाणी एखादे अधिक महत्त्वाचे आणि तातडीचे काम तुम्हाला पूर्ण करायला दिले जाऊ शकते. कोणतीही कारणे न देता कर्तव्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र या सगळ्यात मानसिक आरोग्य चांगले कसे राहील याचाही विचार करा. कार्यालयात बोलताना जिभेवर ताबा ठेवा, एखादा…
डॉ. अस्मिता हवालदार “बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये…” आपलं सर्वांचं आवडतं वाक्य. ‘आनंद’ सिनेमात कॅन्सरने मरणासन्न असलेला राजेश खन्ना हे वाक्य म्हणतो… आपल्याला कुठेतरी खोलवर पटलेलं असतं. पण बडी म्हणजे कशी? हा प्रश्न असतो. मृत्यू हातात हात घालून चालत असला तरी, त्याची भीती असतेच. जे जीवन आहे ते अर्थपूर्ण कसे जगायचे? किंवा त्याला अर्थ कसा प्राप्त करून द्यायचा, हाही मोठाच प्रश्न. माणसाला अनंत काळापासून हा प्रश्न भेडसावत आहे – माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या अंगांनी झाला. जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणविद, दार्शनिक, तत्वज्ञानी आणि मानसोपचार तज्ज्ञ या सर्वांनी आपपल्या निष्ठेला, ज्ञानाला धरून उत्तर दिली आहेत.…
दिलीप कजगांवकर निळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट, ब्लेझर, पॉलिश केलेले बूट आणि आकर्षक चष्मा घातलेल्या रुबाबदार तरुणाने पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील प्रख्यात ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. सेल्स मॅनेजरने “या सर” असे म्हणत मोठ्या आपुलकीने त्याचे स्वागत केले. “सर, काय घ्यायचे आहे आपल्याला?” “कानातली रिंग,” तो तरुण उत्तरला. “मैत्रिणीसाठी?” “नाही, कुणीच तयार नाही माझ्याशी मैत्री करायला.” “बायकोसाठी?” “नाही, लग्न करायला मुलगीच मिळत नाही.” “आय कान्ट बिलिव्ह, कुणीही अगदी सहज तयार होईल हो तुमच्याशी लग्न करायला.” “आय मीन, मला आवडलेल्या मुली तयार होत नाहीत.” “किती आवडल्या आतापर्यंत?” “फक्त एकच…” हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी! “कशी हवी तुम्हाला?” गोरा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

