Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
चंद्रशेखर माधव सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा एक मित्र शनीभक्त होता. नेहमी शनिशिंगणापूरला जायचा. त्याच्यासोबत आम्हीही बरेचदा शुक्रवारी रात्री कारने निघायचं… शनिवारी पहाटे शनिशिंगणापूरला दर्शन घ्यायचं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात परत यायचं… अशा अनेक ट्रिप केल्या. बरेचदा, आम्ही पाच मित्र कारने जायचो. असंच एका ट्रिपच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा निखिलकडे मारुती एस्टीम होती. त्याच गाडीने आम्ही निघालो. साधारणपणे रात्री नऊ वाजता पुण्यातून निघालो. शिरूरच्या आसपास थांबून जेवण वगैरे केलं. त्यात सुमारे एक तास गेला असावा. साधारणपणे साडेअकराच्या सुमारास आम्ही नगरच्या घाटात पोहोचलो आणि घाट चढायला सुरुवात केली. यादरम्यान रात्री प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या, जळगावकडे वगैरे जाणाऱ्या, बऱ्याचशा बसेस,…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 04 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 25 जून 2025, वार : बुधवार, तिथि : अमावस्या, नक्षत्र : मृगशीर्ष 10:40 योग : वृद्धी 26:38, करण : किंस्तूघ्न 26:39 सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 अमावस्या समाप्ती 16.01 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – समाजात प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येतील. शेअर बाजारातून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.…
स्मिता मनोहर “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” कधीपासून मनात होतं की, एकदा तरी वारीला जायचं… अर्थात, चालत पूर्ण वारी करणं मला तरी शक्य नव्हतं, पण थोडं अंतर का होईना जावं आणि तो अनुभव घ्यावा, असं सारखं मनात येत होतं. या वर्षी अचानक एका व्हॉट्सएप ग्रुपवर वारीसंबंधी मेसेज आला, आणि आम्ही तीन मैत्रिणींनी वारीला जायचे ठरवले, आम्हाला अजून तिघी येऊन मिळाल्या, त्यात माझी भावजय विद्या अर्थात रेवती महाबळ पण तयार झाली, आणि 21 तारखेला दुपारी 2 वाजता आम्ही सर्वजणी ठाण्याहून निघालो. ठाण्याहून गाडीने जाताना संपूर्ण वारीमय वातावरण झाले होते. कित्येकजणींची आमच्यासारखी पहिलीच वारी होती… त्यामुळे उत्साह, आनंद सगळ्याजणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत…
उमा सुहास काळे हल्ली मोबाइल आल्यापासून औपचारिकता म्हणजेच आपल्या नेहमीच्या भाषेत ‘फॉर्म्यालिटीज’चे फारच पेव फुटल्याचे दिसते. सकाळी गादीतून बाहेर पडण्यापूर्वी डोळे किलकिले झाल्याबरोबर सराईतासारखा आपला हात मोबाइलला जवळ घेतो आणि डाटा आँन करतो. हे मी “मेजॉरिटी इज दी लॉ” या नियमाने सांगतेय. “मी अजिबात असं नाही करत,” असं उगाच कोणीही म्हणू नये. अगदी डाटा ऑन केल्याबरोबर लगेच “गुडमॉर्निंग”, “सुप्रभात”चे मेसेजेस फोटो रुपात, शब्द रुपात नाही तर व्हिडीओ रुपात टपटप प्राजक्ताच्या फुलांसारखे व्हॉट्सएपच्या अंगणात येऊन पडतात. आत्ता इतके सारे गुडमॉर्निंग जर लॉटमध्ये आपल्याकडे आले तर, काय बिशाद त्या मॉर्निंगची ‘गुड’ न होण्याची. तिला ‘गुडमॉर्निंग’ म्हणजेच, ‘सुप्रभात’ होणं क्रमप्राप्त आहेच. अशा तऱ्हेने…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 03 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 24 जून 2025, वार : मंगळवार, तिथि : चतुर्दशी 19:00, नक्षत्र : रोहिणी 12:54 योग : शूल 09:35, करण : विष्टि 07:33 सूर्य : मिथुन, चंद्र : वृषभ 23:45, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 अमावस्या प्रारंभ 19.00 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस असला तरी, खर्चही वाढतील. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) पुराणकथा वाचताना, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशस्थ नक्षत्रांचा वापर करण्याची पद्धत वापरली असेल, असा अंदाज येतो. या निमित्ताने त्यांनी आपल्या खगोलशास्त्राचा अभ्यास कथानिर्मितीसाठी केला असावा आणि त्यातूनच पुराणकथांचा जन्म झालेला असावा. गेल्या दोन लेखांत अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रांची माहिती पाहिली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती आणि पौराणिक कथा पाहुया. पुनर्वसू : आर्द्रा नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास दोन ठळक तारे आढळतील. त्यांना पुनर्वसू असे म्हणतात. या नक्षत्राचे नाव जरी पुनर्वसू हे एकच असले तरी या नक्षत्रामध्ये…
दिप्ती चौधरी भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे. मुके असले तरी प्राणी सुखरूप राहावेत, त्यांनाही भावभावना आहेत त्यांनाही प्रेमाची आणि काळजी घेण्याची गरज आहे ही इथे सार्वजनिक भावना आहे. त्यामुळेच इथे प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खूप छान आहे. प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करणे म्हणजे काय याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो – आमचे कुटुंब सुट्टीसाठी जेव्हा बाहेर फिरायला जायचे, तेव्हा ह्यूस्टनमध्ये आम्हाला सांभाळण्यासाठी सुजान नावाची एक आजी यायची. ती जेव्हा पहिल्यांदा आईला भेटायला आली तेव्हा, तिने तिच्यासमोर एक मोठ्ठा फॉर्मच टाकला. त्यात तिनी आईला बऱ्याच अटी घातल्या होत्या. तिच्या सर्व अटी या आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमच्या…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 02 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 23 जून 2025, वार : सोमवार, तिथि : त्रयोदशी 22:10, नक्षत्र : कृत्तिका 15:17 योग : धृती 13:17, करण : गरज 11:46 सूर्य : मिथुन, चंद्र : वृषभ, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 शिवरात्री सोम प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस सामान्य राहील. आरोग्य चांगले असेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. मात्र, वाहन जपून चालवा.…
(एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम – भाग 2) अर्चना कुलकर्णी डिसेंबर हा साधारणपणे शाळा, कॉलेजमधील विविध कार्यक्रमांचा महिना. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी बारा वाजता नृत्य स्पर्धा पार पडली. त्यानंतर मी कार्यालयीन कामात मग्न असताना दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. ते जवळच्याच सर्वोदय हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी नाडकर होते. ‘तुमच्या ज्युनियर कॉलेजची मुलं-मुली आमच्या सोसायटीच्या बागेत दुपारी आले होते. चक्क जोडी-जोडीने झाडाखालच्या बाकावर बसून प्रेमाचे चाळे करत होते,’ अशी त्यांची तक्रार होती. जाता जाता चार आयकार्ड नाडकरांनी माझ्या टेबलावर भिरकावली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिस्तपालन समिती प्रमुखांकडे नाडकरांनी दिलेली चार ओळखपत्रे दिली. शिक्षकांनी त्यावरून त्यांना आणि त्यांच्या…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या जातकांना येत्या आठवड्यात अचानक धनलाभ संभवतो. ‘उत्तम राहावे, उत्तम खावे आणि उत्तम उपभोगावे’ अशा विचारांचे प्राबल्य या आठवड्यात राहणार आहे. नवीन गाडी अथवा घर घ्यावे, असे विचार मनात येतील; तथापि, योग्य तो विचार करून कृती करावी. वृषभ तब्येतीची चिंता घेऊन आठवडा सुरू होईल आणि जसजसा आठवडा पुढे सरकेल तशी चिंता कमी होत जाईल. घरातून व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती अनुभवायला मिळेल. वृषभ राशीच्या स्त्रियांनी घरात, व्यवसायात अथवा नोकरीच्या ठिकाणी द्विधा मनस्थिती झाली असल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. मिथुन मिथुन राशीसाठी हा आठवडा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

