दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 04 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 25 जून 2025, वार : बुधवार, तिथि : अमावस्या, नक्षत्र : मृगशीर्ष 10:40
योग : वृद्धी 26:38, करण : किंस्तूघ्न 26:39
सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
अमावस्या समाप्ती 16.01
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – समाजात प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येतील. शेअर बाजारातून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि वरिष्ठ सहकाऱ्यांकडूनही प्रोत्साहन मिळेल. लहानशा प्रवासाचा योग आहे.
वृषभ – संततीकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी टीमसोबत काम करणे आवश्यक आहे. कायद्याशी संबंधित कोणत्याही समस्येत यश मिळेल. मार्केटिंगशी निगडीत कामात विशेष फायदा होईल, परंतु अचानक मोठा खर्चही समोर येऊ शकतो.
मिथुन – दिवसाची सुरुवात थोडी आळसावलेली असेल, मात्र दुपारनंतर अत्यंत उत्साहाने कामे पूर्ण कराल. जबाबदाऱ्यांचे ओझे असेल. विचारांमध्ये एक नवा दृष्टीकोन स्वीकाराल.
कर्क – व्यवसायातून तुलनेत कमी नफा होण्याची शक्यता असली, तरी घरातील वातावरण आनंदी आणि शांतीपूर्ण असेल. प्रदीर्घ प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या इच्छा मुलांवर लादणे टाळा. अहंकारावर नियंत्रण ठेवा.
सिंह – अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरीत उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहील. आत्मपरीक्षणाद्वारे नकारात्मकता दूर करता येईल. विचारवंतांशी संबंध दृढ होतील.
कन्या – वैयक्तिक आयुष्यातील समस्या कमी होतील. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. राजकारणातील लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक भेटीगाठी होतील.
तुळ – बहुतांश कामे वेळेआधी पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी दिवस फायदेशीर ठरेल. जुन्या कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये लाभ होतील.
वृश्चिक – क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस काहीसा अडचणींचा जाईल. जोडीदाराचे आरोग्य चिंतेचे कारण ठरू शकते. इतरांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका.
धनु – सकाळी अपूर्ण राहिलेली कामे संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकतात. जीवनशैलीबद्दल गाफील राहू नका. नोकरदार व्यक्ती साइड बिझनेस सुरू करण्याच्या योजना आखू शकतात. कुटुंबातील सदस्यांचे मत फायदेशीर ठरेल. महत्त्वाच्या कामांमधील विलंब टाळा.
मकर – नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने सकारात्मक चिन्हे दिसू शकतात. दिवसाची सुरुवात थोडी तणावपूर्ण असेल, परंतु नंतर गोष्टी सुधारतील. काही लोक तुमच्या चांगल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू शकतात, मात्र त्यामुळे खचून जाऊ नका.
कुंभ – इतरांना त्रास होईल, असे कोणतेही काम करू नका. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आपल्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना नवी गोष्ट शिकण्यात अडचणी येऊ शकतात. परदेशी प्रवासातही अडथळ्यांचा सामना करावा लागेल.
मीन – कामाच्या ठिकाणी असलेल्या अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामात यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. स्पर्धक फार त्रास देणार नाहीत. अपचनाशी संबंधित समस्या निर्माण होतील.
दिनविशेष
भारतीय क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय क्रिकेट इतिहासात 25 जून 1983 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. 42 वर्षांपूर्वी याच दिवशी कर्णधार कपिल देव याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजला 43 धावांनी हरवून भारताने चषकावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत पोहोचण्याआधी भारताने सहापैकी चार सामने जिंकून ‘ब’ गटात आरामात प्रवेश केला. उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडला ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताने हरवले. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाज रॉजर बिन्नी याने सर्वाधिक म्हणजे 18 विकेट्स घेतल्या तर कर्णधार कपिल देवने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात केलेल्या नाबाद 175 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या होती. याच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित 2021 साली 83 हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.