दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 03 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 24 जून 2025, वार : मंगळवार, तिथि : चतुर्दशी 19:00, नक्षत्र : रोहिणी 12:54
योग : शूल 09:35, करण : विष्टि 07:33
सूर्य : मिथुन, चंद्र : वृषभ 23:45, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
अमावस्या प्रारंभ 19.00
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मेष राशीच्या जातकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस असला तरी, खर्चही वाढतील. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.
वृषभ – वृषभ राशीच्या जातकांनी सकारात्मक रहावे. कामाचा जास्त ताण जाणवत असेल तर, थोडा वेळ विश्रांती घ्या. घाईने, विचार न करता खर्च करणे टाळा. अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल मिळेल.
मिथुन – प्रामाणिकपणे आपले काम करत रहा. त्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी जाणवणारा ताण घरी न आणणे चांगले. तणाव कमी करण्यासाठी आवडते संगीत ऐका.
कर्क – कामातून ऊर्जा अनुभवता येणार आहे. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. स्वप्ने साकार होण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सज्ज व्हा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. त्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक.
सिंह – आनंद आणि समृद्धी द्विगुणित होणार आहे. कौटुंबिक नात्यातील तणावही दूर होईल. अनुभवांचा मोठा फायदा होईल. काही नवीन प्रयत्नांना यश येईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.
कन्या – दिवसभर सकारात्मक परिणाम जाणवेल. मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी इतर गोष्टींबाबत माहिती घ्याल. नवीन घर, फ्लॅट इत्यादीच्या खरेदीसाठी उत्तम दिवस. कुटुंबात शुभ कार्यामुळे वातावरण आनंदी असेल.
हेही वाचा – आयुष्यातील संगीत…
तुळ – काही जुन्या समस्यांमुळे मन अस्वस्थ होईल. मुलांची एखादी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण कराल. मात्र त्यासाठी कराव्या लागलेल्या खर्चामुळे चिंता वाढू शकते. उत्पन्न लक्षात ठेवून खर्च करा. जोडीदाराला नवीन नोकरी मिळू शकते.
वृश्चिक – घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. मुलांच्या कारकिर्दीला एक चांगले वळण मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उत्तम दिवस. व्यावसायिकांनी अधिक सजगतेने व्यवहार करावेत.
धनु – अतिशय उत्तम दिवस असेल. प्रत्येक कामात चांगले यश मिळेल. त्यामुळे सर्व कामे सहजपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कामानिमित्त प्रवासही करावा लागू शकतो. फक्त बोलण्या-वागण्यात संयम ठेवा.
मकर – पालकांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी सरप्राइज पार्टीचे नियोजन कराल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर, एखादी चांगली ऑफर येऊ शकते.
कुंभ – अनेक समस्यांवर तोडगा मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची लोकप्रियता वाढेल. प्रॉपर्टी डीलिंग क्षेत्रातील जातकांचे काही मोठे सौदे होऊ शकतात. कायदेविषयक समस्येवरही मार्ग निघेल. फक्त थोडा धीर धरा.
मीन – अतिशय धावपळीचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी जोखमीचे काम अंगावर पडल्याने चिंता वाढेल. प्रवास करताना काळजी घ्या. एखादे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर, ते पूर्ण होइल. भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकता.
दिनविशेष
नाट्य अभिनेते नानासाहेब फाटक
एकच प्याला नाटकातील सुधाकरची भूमिका जिवंत करणारे अभिनेते नानासाहेब उर्फ गोपाळ गोविंद फाटक यांचा जन्म 24 जून 1899 रोजी झाला. धीरगंभीर आवाज आणि अत्यंत प्रभावी संवादफेक यांच्या जोरावर एकेकाळी मराठी नाट्यसृष्टी गाजवणारे अभिनेते म्हणून नानासाहेबांचा बोलबाला होता. आवाजाच्या प्रभावी वापरामुळे नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिकाच नानासाहेबांना मिळाल्या. मात्र याच्याच जोरावर अमाप यश, प्रसिद्धी आणि पैसा त्यांनी कमावला. रक्षाबंधन नाटकात त्यांनी साकारलेली गिरीधरची भूमिका खूपच गाजली. केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह प्रदान केले होते. मराठी रंगभूमीवरील या नटसम्राटाचे 8 एप्रिल 1974 रोजी निधन झाले.
हेही वाचा – विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव